काय करावे ??

Submitted by raina on 4 December, 2017 - 19:10

मोहना यांचा "अनुभव" वाचला आणि डोळ्यात पाणी आले. वाटले इथे माझा अनुभव शेयर करावा.
मी ४० + ची आहे. अमेरिकेत येऊन आता ८ वर्षे झाली. भारतात २ वर्षे QA म्हणून Tech Mahindra मध्ये काम केले होते. मग दोन मुली आणि डिपेन्डन्ट व्हिसा यामुळे १० वर्षे काम करता आले नाही.
दोन वर्षांपूर्वी H४ EAD मिळण्याआधी मी खूप खुश झाले, आता आपल्याला काम करता येईल म्हणून. मुली पण आता मोठया म्हणजे कळत्या वयाच्या (८,१३) झाल्या होत्या त्यामुळे मी आता जॉब करायला मोकळी होते. नवऱ्याचा पण सपोर्ट होताच.
मी परत IT मध्ये जायचे म्हणून तयारी चालू केली. परत सगळे रिफ्रेश केले. ISTQB चे सर्टिफिकेशन्स (३) केले. कोर्सेरा वर काही courses पण केले. सगळी जैयत तय्यारी केली. खूप अभ्यास केला.
जानेवारी २०१६ ला EAD मिळाले. वाटले आता अप्लाय केला कि लगेच जॉब मिळेल.
पण लवकरच माझा भ्रमाचा भोपळा फुटला. एकही interview कॉल येईना. भारतीय consultant कॉल करत. पण ७/८ वर्षे fake अनुभव लावावा म्हणून सांगत, मला ते काही पटत नव्हते. मग म्हटले जो जॉब मिळतो तो करावा आणि QA जॉब बघत राहावा. मग math instructor म्हणून after स्कूल प्रोग्रॅम मध्ये लागले.
Substitute Teaching पण करून पहिले पण आवडले नाही. IT जॉब search चालूच होता. मी माझा खरा अनुभव टाकून सगळीकडे अप्लाय करत होते, पण नो लक, एकही interview कॉल आला नाही. सगळे तेच fake resume वाले.
मग दुसरे काही ऑपशन्स बघितले, business म्हणावा तर ग्रीन कार्ड नाही त्यामुळे इन्व्हेस्ट करायची हिम्मत नाही. दुसरे जॉब्स सॅलरी एक्दम कमी, काय करावे कळेना. अजून मी instructor म्हणूनच काम करत आहे.
मोठी लेक आता १०th ला आहे. आतापर्यंत gc मिळेल ती कॉलेज ला जाईपर्यंत असे वाटत होते. पण आताच्या परिस्थितीत असे वाटत नाही. International स्टुडन्ट म्हणून इथल्या कॉलेजच्या फिया प्रचंड आहेत ज्या परवडण्यासारख्या नाहीत आजच्या परिस्थितीत. भारतात परत जावे तर मुलींना अड्जस्ट होणे कठीण आणि तिथे पण NRI फीस. ना घर का ना घाट का अशी हालत.
माझ्या सोबतच्या नॉन technical बॅकग्राऊंड च्या माझ्या मैत्रिणींना QA जॉब मिळाला. लिटरली आयुर्वेद आणि physiotherapy असे बॅकग्राऊंड आहे.
नवरा म्हणतोय आता तू पण कर मग fake अनुभव लावून लेकीसाठी. इथे कॉस्ट ऑफ लिविंग पण खूप आहे. सेविंग म्हणावे तसे नाही. मी फक्त एन्ट्री लेवल जॉब्स पाहत आहे पण काहीही फायदा नाही कारण आताचा (current) experience IT मध्ये नाही म्हणून जॉब मिळत नाही, हे एक चक्र आहे. खूप चिडचिड होतेय आणि कळत नाही काय करावे. मला माहित आहे खूप जणींची अशीच परिस्थिती असेल , तुम्हाला काही मार्ग माहित असेल तर सांगा.

Group content visibility: 
Use group defaults

रैना,
तुम्हाला नोकरीबाबत मी काही सल्ला देवू शकत नाही पण तुमच्या लेकीसाठी काही माहिती-
तुमच्या स्टेटचे रेसिडेन्सीचे, इन स्टेट ट्युशनचे नियम बघितले का? बरेचदा हायस्कूल ज्या स्टेटमधे पूर्ण केले त्या स्टेटच्या इनस्टेट ट्युशन साठी डिपेंडंट मुले क्वालिफाय होतात. त्याचवेळी हे ट्युशनचे नियम त्या स्टेटमधील वेगवेगळ्या युनिवर्सिटीजसाठी वेगवेगळे असतात. तुम्ही तुमच्या स्टेटमधील युनिवर्सिटींची एक यादी करा आणि प्रत्येक ठिकाणी चौकशी करा. त्या शिवाय http://www.collegeconfidential.com/ या फोरमवर देखील चौकशी करा. तुम्हाला आणि तुमच्या लेकीला शुभेच्छा!

आयटी इट सेल्फ इस गोइन्ग थ्रू अ चर्न. ए आय व ऑटोमेशन मुळे बरेच जॉब्ज एंटायर क्याटेगरीज आर व्हॅनिशिन्ग. बिसाइड्स कर्मा इज अ थिंग यू नो. तर ते समजून घेउन. इतर क्षेत्रात जसे अ‍ॅडमिन, सेल्स मार्केटिंग एस ए पी वगिअरे मध्ये अ‍ॅप्लाय करा व बघा. ज्या लोकेशन ला लोक्स जात नाहीत तिथे जायची तयारी असेल तर जॉब आहेत. पोर्टल वर सीवी टाकून ठेवल्या का. लिंख्ड इन प्रोफाइल बनवा. आता मुलींचे कॉलेज शिक्षण म्हणजे खर्चाचे दिवस आहेत. धीर सोडू नका. इथे टीसी एस चे सेकंड इनिंग वाले एक पोर्टल आहे त्यावर सीव्ही लिहा. मी पत्ता शोधून इथे लिंक देते. आमच्या फील्ड मध्ये जी टॉप कंपनी आहे जिवदान तिथे पोर्टल वर नेहमी १००-२०० नोकर्‍या असतात त्यात आयटीवाल्या पण असतात . त्यांचे आयटी सेंटर युरोपात, अमेरिकेत सिनसिनाटीत काही जॉब्स असतात.

फेक अनुभव ह्याला माझे मत नाही. अश्या गोष्टी पकडल्यावर तुमची इंटेग्रिटी पूर्ण फील्ड मध्ये न ष्ट होते एका क्षणात.

Hi Raina,
I been in similar situation. So few things from my experience may help you.
1. Update Linkedin profile. Mention 'Actively looking'. Put all keywords in there. . eg. Functional, UAT, SIT, performance testing, etc. Try to get in touch with professionals there. Request your previous colleagues to endorse you.
2. Make resume less than 3 pages.
3. Search for Project coordinator, technical writer, Jr. BA positions. Don't restrict yourself.
4. Remove dates from your resume, if you think your gap in your experience is affecting your prospects. But if they ask, tell them true dates. (Provide information, on need to know basis)
5. Try for work experience.

अमेरिकेत निवृत्तीचे वय सामान्यपणे ६५ असे गृहित धरले जाते. ४० वय म्हणजे अजून २५ वर्षे करियरची आहेत. भावनिक विचार करण्यापेक्षा काय आवडते, काय शक्य आहे, आणि काय उत्तम जमते याचे गणित मांडून नियोजन करायला हवे. गणित शिकवण्यातही बर्‍यापैकी पैसे मिळतात (मान फार मिळतो Wink ). त्या अनुषंगाने काही संसाधने (रिसोर्सेस) हवे असतील तर सांगू शकेन.

तुम्हाला नोकरीबाबत मी काही सल्ला देवू शकत नाही पण तुमच्या लेकीसाठी काही माहिती->> त्यात आजुन एक भर

ओहायो स्टेट मध्ये H4 ला स्टेट युनि मध्ये स्टेट फी मिळते हे मी स्वानभुवावरुन सांगु शकतो. . तसेच ह्या स्टेट मध्ये H4 ला दोन प्रसिध्ध युनि मध्ये स्कॉलरशिप पण मिळते आणि त्यात एका युनि मध्ये शिक्षण फुकट पण होउ शकते. पण ह्या साठी ओहायो स्टेट मध्ये दिड वर्ष राहाणे अनिवार्य आहे.
तुम्ही राहाता त्या स्टेट चे नियम चेक करा. तसेच बाजुच्या स्टेट मध्ये पण चेक करा. आणि जरुरी असेल तर बाजुच्या स्टेट मध्ये राहायला मुव्ह व्हा (जर तुमच्या स्टेट मध्ये H4 ला स्टेट फी नसेल तर आणि बाजुच्या स्टेट मधे असेल तर. त्या स्टेट चे रेसिडंसी रुल पण चेक करा) त्यात्य तुमचे बर्यापैकी पैसे वाचतिल.

भारतात १५ वर्षाच्या मुली साठी NRI फी लागेल (engineering, dental साधारणतः ४-5 लाख रुपये प्रती वर्ष, मेडिकल सामन्य माणसाच्या आवाक्या बाह्रेर) . ८-१३ वर्षाच्या मुली साठी जर भारतात परत आला, आणि मुली भारताच्या नागरिक असतिल तर proper documentation करुन लोकल फी लागेल.

Raina

Don't give up hope and don"t compromise your integrity. I have been at the hiring ( and unfortunately firing sometimes ) end of this spectrum. Most hiring managers are extremely wary of such fake-experience resumes. Several companies conduct extensive background checks that highlight employment inconistencies immediately. A thorough credit check reveals a lot.

I would echo Swati2's suggestion - look at various college financing options. There is a lot financial aid available based on need.

Look into Agile development type roles as well. Certifications for Scrum Master,Product Owner are not very onerous. The cost is also not prohibitive. Try to take some classes at the local community college - this will help in networking and they may be able to help in placement .
Will you consider a job in the recruiting field itself ? If you have good communication skills, are very detail oriented and organized, like working with people, you may do very well in that field too.

Please give teaching another chance - if you don't like sub roles at a school district, try places like Kaplan and similar institutes, as well as community colleges.

Good luck to you and don't get discouraged. There is a large percent of US population with one bread-winner and they are able to make college work for their kids somehow.

भारतात १५ वर्षाच्या मुली साठी NRI फी लागेल (engineering, dental साधारणतः ४-5 लाख रुपये प्रती वर्ष >> I think NRIs can easily manage these fees Happy We residents also have to pay this much fees if our children are going to pvt collages.

नाण्याची दुसरी बाजू सांगतो - फेक रिसुमे सगळेच बनवतात, काही लोक फेक अनुभव टाकतात, तर काही फेक टेक्नॉलॉजी. म्हणजे काम एका टेक्नॉलॉजी मध्ये केले असेल पण मार्केट मध्ये जिला डिमांड आहे ती लोक ऍड करतात रिसुम मध्ये.
गुलटे असं करून करून टॉप लेव्हल ला गेले आहेत इथे. मराठी माणूस मागे पडतो.

काल इथे पोस्ट लिहिल्यापासून काहीतरी खटकत होतं

मी ४० + ची आहे. अमेरिकेत येऊन आता ८ वर्षे झाली. भारतात २ वर्षे QA म्हणून Tech Mahindra मध्ये काम केले होते. मग दोन मुली आणि डिपेन्डन्ट व्हिसा यामुळे १० वर्षे काम करता आले नाही. >> या टाइमलाइनची सुसंगती लागत नाहीये मला .
अमेरिकत आठ वर्षे झाली. मग डिपेंडंट व्हिसा मुळे १० वर्षे काम करता आले नाही हे कसे काय ?
आता जर ४०+ आहात. साधारण २२-२४ वर्षांपासून पासून नोकरी करायची संधी असणार . दोन वर्षे टेक महिंद्रा मधली नोकरी आणि १० वर्षे डिपेंडंट व्हिसाची धरली तरी १२ वर्षे. उरलेली ६-८ वर्षे दुसरी कसली नोकरी / व्यवसाय होता का ? त्या अनुभवावर आधारित काही नोकरी / व्य्वसाय करु शकता का ?

मुलींचे इमिग्रेशन स्टेटस तुम्ही लिहिले नाही. मुली भारतीय नागरिक असल्या तर भारतात जाउन एन आर आय फी लागणार नाही. मुली अमेरिकन नागरिक असल्या तर त्यांना इथे इन स्टेट स्कॉलरशिप , स्टुडंट लोन वगैरे मिळू शकते .

धन्यवाद सर्वांना मन मोकळे करून थोडे बरे वाटले . स्वाती २ h४ ला in स्टेट फीस असते हे मला पहिल्यांदाच समजले. थँक you so much.
मेधा सांगते उलघडून वेळ मिळाला कि.

रैना, ’अनुभव’ वाचून तुम्हाला मनमोकळं करता आलं हे चांगलं झालं. इथे मिळणार्‍या माहितीचा उपयोग व्हावा ही इच्छा. मी अमेरिकेत आल्यावर कम्युनिटी कॉलेजमधून पदवी घेतली. (भारतातला डिप्लोमा) भारतात मी बी. कॉम. एम. ए. केलं असल्यामुळे (शास्त्राची पार्श्वभूमी नसल्याने) प्रवेशापूर्वी काही अभ्यासक्रम पूर्ण करावे लागले. शिकत असतानाच समर स्टुडंट म्हणून तिथेच काम करायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावरही मग तिथेच काम करत राहिले. सांगायचा मुद्दा हा की असाही प्रयत्न करता येईल. कम्युनिटी कॉलेजची फी कमी असते आणि त्या त्या राज्यात एक वर्ष राहिलेले असलात जास्त शुल्क भरावं लागत नाही.

माझ्या काही मैत्रीणींनी चार्टर/मॉटेंसरी शाळा स्वत:च्या सुरु केल्य़ा आहेत नोकरी मिळत नाही म्हणून आणि त्यांचे हे व्यवसाय भरभराटीला आले आहेत. शिकवण्याची आवड असेल तर विचार करु शकता याचा. ऑनलाईन शिक्षक म्हणूनही हल्ली खूपजणं काम करतात. बदली शिक्षकांचं काम आवडलं नाही तर त्यात नवल नाही. मी ३ वर्ष केलं आहे त्यामुळे कल्पना आहे.

मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत - बरीच मुलं कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन २ वर्षाचा अभ्यासक्रम स्वस्त पडतं म्हणून तिथे पूर्ण करतात. तिथे त्यांनी पूर्ण केलेला अभ्यासक्रम विद्यापीठात ग्राह्य धरला जातो आणि विद्यापीठात करावी लागणारी दोन वर्ष कमी होतात. थोडक्यात चार वर्षाचा अभ्यासक्रम दोन वर्षात होतो त्यामुळे खर्चात बचत होते. या पर्यायाचा विचार करु शकता.

थोडक्यात निराश न होता मार्गक्रमण चालू राहू दे :-).

रैना - परिस्थिती समजतो. धिराने घेणे महत्वाचे आहे.

ज्या जागेसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्यान्ना काय काय हवे ते तुमच्या resume मधे आणता येते का ? नोकरी मधे भला मोठा गॅप असणे हे नॉर्थ अमेरिकेसाठी नवे नाही, त्यामुळे तुम्हाला खुपही त्रास व्हायला नको.

सरळ सान्गायचे माझ्यासाठी माझे कुटुम्ब प्राधान्य १ आहे, जबाबदारी होती, आणि पुर्ण वेळ मुलान्कडे लक्ष दिले. जो वेळ मिळेल त्या मधे स्वत: ला अपडेट करत होते, काही तरी शिकत होते (काय शिकत होते याची लिस्ट ठेवा).

खोटे बोलण्याची अवशक्ता नाही. आणि तुम्ही expert आहात हे सान्गत नाही आहात, पण ज्या कामासाठी अर्ज करत आहात त्यातले जास्तित जास्त 'key words' तुम्हाला तुमच्या resume मधे आणायला हवेतच. जुजबी ओळख असेल तर resume मधे 'familiar with **** ' असे लिहायला काही हरकत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या विषया बद्दल माहिती करुन घ्यायची.

(अ) advt निट अभ्यासा, काय आणि कोणते शब्द तुमच्या resume मधे सहज पणे आणता येतात?
(ब) नेट वर्क - जवळपास ८० % जागा नेटवर्क मुळे मिळतात. सर्व ओळखीच्या लोकान्ना तुम्ही नोकरीच्या शोधात आहात हे सान्गायचे. यात मुलीला/ मुलाला शाळेत सोडताना त्यान्च्या पालकान्ना पण 'अगदी सहजपणे' मेसेज पास करायचा. कुठे कसा दगड लागेल हे सान्गता येत नाही.

मनापासुन शुभेच्छा.

रैना,
मी तुम्हाला कसलाही सल्ला देवू शकत नाही पण माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा.

ह्या अशा धाग्या-प्रतिसादांमुळे मायबोली अधिकच जवळची होते.

मी तुम्हाला कसलाही सल्ला देवू शकत नाही पण माझ्याकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा.

ह्या अशा धाग्या-प्रतिसादांमुळे मायबोली अधिकच जवळची होते.>>>>> अगदी अगदी.

खरंय. खुप चांगले सल्ले आलेत.
रैना, शुभेच्छा.
शिकवण्याची आवड व कला असेल तर प्रायवेट शिकवण्या तोवर घेता येतील. खुप गरज असते मोठ्या वर्गातील मुलांना. ७वी पासून वरती. खास करून गणित.

सॉरी खूप दिवसात इथे यायला जमले नाही. आधी खूप खूप धन्यवाद , खूप छान वाटले सर्वांचे प्रतिसाद वाचून.
आता नवीन काहीतरी करायचा हुरूप आला आहे. खूप चांगली माहिती मला इथे मिळाली. थोडं माझ्याबद्दल, मेधा याना सांगितल्याप्रमाणे. खूप चांगली माहिती मला इथे मिळाली.

मी पुण्याची १९९९ ला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीरिंग केले. त्या नंतर लग्न होईपर्यंत (२००१) छोटे जॉब्स इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री मध्ये केले . तेंव्हा IT ची सुरवात होती. लग्न झाल्यावर मुंबई, पुणे करण्यात गेले कारण नवऱ्याचा जॉब मुंबईला होता. २००२ आम्ही पुण्यात परत आलो, मोठी मुलगी पुण्यात झाली . तीला पाळणाघरात ठेवायची ईच्छा नसल्यामुळे, आणि सपोर्ट नसल्यामुळे जॉब केला नाही. मोठी लेक शाळेत जाऊ लागल्यावर मी SEED ला टेस्टिंग चा कोर्से केला. आणि तिथल्या प्लेसमेंट वर Tech महिंद्रा ला जॉब ला लागले. तोवर नवरा US ला आला होता .
मला लेकीला एकटीला वाढवायचे नव्हते म्हणून मी पण जॉब सोडून H४ वर आले(२००६).
२००७ ला धाकट्या मुलीचा जन्म झाला (कॅलिफोर्निया मध्ये).

२००९ ला आम्हाला व्हिसा एक्स्टेंशन न मिळाल्यामुळे आम्ही चेन्नई ला परत आलो. मी २००९-२०११ M.Tech केले चेन्नई ला. पण नवऱ्याला परत अमेरिकेत जायची संधी आली आणि त्याला इथले वर्क culture आवडले नव्हते आणि तो परत आला. मी मास्टर्स होईपर्यंत मुलींना घेऊन वर्षभर राहिले. That was a tough time for me and my girls. पण तो काळ पण खूप काही शिकवून गेला. आई वडील, सासू सासरे अधून मधून येत होते पण कोणालाही चेन्नईला येऊन माझ्याबरोबर जास्त काळ राहणे शक्य नव्हते. २०११ ऑगस्ट, मी मुलींना घेऊन परत आले मिनेसोटात (MN) .

इथे आल्यावर छोटी लेक Preschool आणि मोठी ४th ला होती. मी या काळात दोघींच्या शाळेत volunteering चालू केले, ड्रायविंग शिकले. मग नवऱ्याचा प्रोजेक्ट संपल्यावर शिकागो ला शिफ्ट झालो. इथे आल्यावर २०१६ ला मला EAd मिळाले. पुढचे सगळे तुम्हाला माहीतच आहे.

I feel bad that a single interview call didn't come on my genuine resume. If I fell in interview, I do understand that some where i am less and I need to build but I didn't get any opportunity to prove myself. My problem is that...

मेधा तुमचा प्रतिसाद " मुलींचे इमिग्रेशन स्टेटस तुम्ही लिहिले नाही. मुली भारतीय नागरिक असल्या तर भारतात जाउन एन आर आय फी लागणार नाही. मुली अमेरिकन नागरिक असल्या तर त्यांना इथे इन स्टेट स्कॉलरशिप , स्टुडंट लोन वगैरे मिळू शकते" >>>>
मोठी मुलगी भारतीय आहे , पण भारतात माझ्या माहिती प्रमाणे जर बाहेर ११,१२th झाले असेल तर मेडिकल, इंजिनेरींग ला NRI consider करतात. हे चुकीचे असेल तर सांगा please..
आणि इथे पण त्यांना इंटरनॅशनल स्टुडन्ट मानतात. पण स्वाती २, यांनी सांगितल्याप्रमाणे आता चौकशी करणार आहे. कोणाला इलिनॉईस (Illinois) मध्ये H४ ला In State Tuition आहे का, हे माहित असेल तर सांगा कृपया . It will be really a great help and will solve my lot of problems. छोटी अमेरिकन आहे, अजून लहान आहे तिचा प्रश्न नाही. मोठीचीच काळजी आहे

निव्वळ resume वर जॉब मिळत नाही असे माझे कॅनडातले निरीक्षण आहे. resume वाचण्यापर्यन्त तर पोहोचायला हवे ?

८० % जागा या internal उमेदवारान्साठी असतात किव्वा नेटवर्क मुळे मिळतात. सगे-सोयरे नसले तरच बाहेरच्या व्यक्तीला विचारात घेतले जाते, मग अशा वेळेस तुमचे कव्हर लेटर खुप महत्वाचे ठरते, त्यामधे त्यान्ना योग्यता वाटली तर मग resume. कॉल येत नाही म्हणजे कव्हर लेटर पुन्हा पुन्हा पडताळा. योग्यता म्हणजे निव्वळ शैक्षणिक आर्हता, अनुभव नाही तर त्यान्ना त्या जागेसाठी 'फिट' ठरेल असा उमेदवार.

I feel bad that a single interview call didn't come on my genuine resume. >>> यात तुमच्यात काहीतरी कमी असण्यापेक्षा हायरिंग प्रोसेस मधल्या खाचाखोचांमुळे हे होत आहे हे लक्षात घ्या. नुसता रेझ्युमे एचआर च्या चाळण्यांमधून पुढे सरकतच नाही. भरपूर अनुभव असलेल्या लोकांचेही तसेच होते. रिकृटर्स ची मदत घ्या अजून घेतली नसेल तर.

उदय यांनी वरती लिहीले आहे ते बरेचसे पटले.

करन्ट अनुभव नसणे किवा लुप मधे नसणे हा मोठा अडथळा असतो, मी यातुन गेलिये /जातिये
एम एस न करता पण आय्टी जॉब मिळवायला किवा स्पेसिफिकली टेस्तीन्ग चा जॉब मिळवायला कोणते सर्टिफिकेशन करावे लागेल
आय्टी मधे फायनास्षिल सिक्युरिटी मिळते ती आवस्यक वाटते.

आयटीमध्ये ऑटोमेशनमुळे जॉब खूप कमी होणार आहेत.तुम्हाला करंट आय्टीमधला अनुभव नसला तरी दुसरे ऑप्शन ट्राय करुन बघा.
एज हा फॅक्टरही महत्वाचा आहे,हरी अप.

रैना... तुम्ही प्रोजेक्ट coordinator किंवा बुसिनेस analyst जॉब try करा..
Actual coder किंवा टेस्टर साठी अमेरिकेत भरपूर exp मागतात.

नेटवर्किंग करायचा सल्ला तुम्हाला वर अनेक लोकांनी दिलाच आहे. त्याबद्दलच थोडं अधिक :
तुमच्या कामाच्या क्षेत्रातील काही meetup groups/ society/ chapters तुम्ही रहाता त्या गावात किंवा जवळपास आहेत का याचा शोध घ्या. त्यांच्या meetings काही काळ attend करा. त्यात काही volunteering च्या संधी मिळाल्या तर जरूर जा.
एखादी conference वगैरे असेल तर ती ही attend करा. registration fee साठी थोडे पैसे खर्च करायला लागतील. पण मिळणार्‍या जॉबसाठी investment म्हणून त्याकडे बघा.
अश्या तर्‍हेने केलेल्या नेटवर्किंगचा मला बराच फायदा झाला आहे.

शाळेत शिकवण्याचा अनुभव आहे हे लिहिलंत त्यावरुन - बर्‍याच शाळा , कॉलेजांमधून इंस्ट्रकशनल टेक्नॉलॉजी सपोर्ट अशा स्वरुपाच्या पोझिशन्स असतात. ग्रेडिंग टूल्स, ऑनलाइन प्रेझेण्टेशन टूल , रिसर्च साठी कोलॅबोरेशन एनेबल करणारे टूल्स हे सर्व इम्प्लिमेंट करणे, मेंटेन करणे, प्राध्यापक/ शिक्षक/ विद्यार्थी यांना असे टूल्स वापरायला शिकवणे, मदत करणे अशा स्वरुपाचं थोडं आयटी, थोडं एजुकेशन फिल्ड अशा प्रकाचे काम असते. शाळेत नोकरी करता करता हे टूल्स शिकून त्या रोल मधे ट्रांझिशन करु शकता.

रैना, तुमचा अनुभव वाचला, तुमचा प्रयत्न तुम्ही चालू ठेवला आहे हे छान.. काही गोष्टी सुचवाव्याशा वाटतात.. तुम्ही स्वतःच्या पात्रतेला साजेशी, योग्य पगाराची नोकरी शोधात आहेत हे खूप छान .. परंतु कधी कधी नकळत आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि त्यामुळे आपण पुढचे पाऊल योग्य दिशेने उचलू शकत नाही. तुम्ही तुमच्या लेखात लिहिले आहे कि तुम्ही बदली शिक्षकाची नोकरी करून पहिली पण ती आवडली नाही, इतर अनेक नोकऱयां मध्ये पगार खूप कमी आहे. या वरून मला असे दिसते कि तुम्हाला नोकरी मिळू शकते, फक्त ती तुमच्या क्षेत्रातील किंवा तुम्हाला अपेक्षित पगाराची नाही.. कदाचित अशी एक नोकरी केली कि त्यातून इतर पुढचे मार्ग दिसायला लागतील, नवीन ओळखी होतील, नवीन अनुभव मिळतील, नव्या संधी दिसतील, त्यातुन नवीन दारे उघडत जातील. तुम्हाला योग्य नोकरीसाठी अनेक शुभेच्छा!

अननस, तुम्ही मागच्या वर्षीचे धागे वर काढुन काढुन प्रतिसाद देत आहात. बहुदा अनेकांचे प्रश्न सोल्व झाले असावेत म्हणून हे धागे मागे गेले.

गढे मुर्दे उखाडनेमे कोई मतलब नही असं मला वाटतं

Pages