पासपोर्ट काढणे एक विनोदी व्यथा.... आणि अखेर व्यथेचा अंत........

Submitted by निर्झरा on 4 December, 2017 - 05:59

https://www.maayboli.com/node/64297 या आधीचे लेखन येथिल लिंकवर बघता येईल.

वरील धाग्यात सांगितल्याप्रमाणे पासपोर्ट ऑफिस मधे पुन्हा पोलिस व्हेरिफिकेशन साठी रिक्वेस्ट टाकली. आम्ही त्यांचा फोनची दोन दिवस वाट बघितली. शेवटी तिथे जाऊन भेटायचे ठरले. त्याच्या आदल्या रात्रीच पुन्हा एक मेसेज आला की पोलिसाने त्याच्या रिपोर्ट सबमीट केला. न भेटता अथवा पुन्हा व्हेरीफिकेशन न करता त्याने कसा रिपोर्ट पाठवला याचा आम्हि विचार करत होतो. शेवटी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटायचे ठरले. त्या प्रमाणे आईला घेऊन तिथे गेलो. पासपोर्ट ऑफिस मधून आलेला मेसेज दाखवला. पण त्याने काहीही ऐकून न घेता आम्हाला सांगीतले की तुमच काम तिकडेच होईल.त्याच्या हातात काही नाही.
रिकाम्या हातानेच आम्ही बाहेर पडलो. दुसर्‍या दिवशी पासपोर्ट ऑफिस मधे गेलो. त्यांनीही आता काहि होणार नाही. दंड भरून तुमच अ‍ॅप्लीकेशन बंद करा सांगीतल. तस दंडाचे फक्त पाच हजार भरले आणि बाहेर पडलो.
आमच्या सारख्या प्रेझेंट अ‍ॅड्रेस न टाकलेल्या अनेक केसेस होत्या. त्यात काही विद्यार्थीपण होते. त्यांना पाचशे रुपये ईतका दंड होता.
यात मला काही पडलेले प्रश्नः-
१. जर ईतका दंड घेतच आहेत तर आहे त्याच फॉर्म मधे चेंजेस करून का घेता येत नाहीत?
२ जर व्यक्ती ज्येष्ठ असेल तर ही पद्धत सोपी का करत नाहीत?
३ जर पोलिसाने अ‍ॅड्रेस अपडेट करून घ्या म्हणून सांगीतले तर त्याच्या एन ओ सी वर आहे त्याच फॉर्म मधे पोलिसाच्या रिमार्क वर पत्ता का जोडता येऊ नये?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पासपोर्ट मिळाला की सांगा. आणि त्यात कोणता अ‍ॅड्रेस टाकला ते पण सांगा.
बहिणीच्या मुलाला पासपोर्ट काढायचा आहे. मुलगा १००० किमी लांब हॉस्टेल वर राहातो. term break, दिवाळी , क्रिस्मस ला घरी येतो. त्यामुळे present address काय टाकायचा ही मोठी समस्या आहे. अ‍ॅप्लिकेशन, पोलिस व्हेरिफिकेशन मध्ये थोडा जरी डिले झाला तरी देखिल प्रोब्लेम येईल असे वाटते.

साहिल, त्याच्या पर्मनंट अ‍ॅड्रेस जो घरचा आहे, जिथे राशन कार्डवर त्याचे नाव आहे तोच समजला पाहिजे. शिक्षणासाठी दूर राहत असेल म्हणून तो अ‍ॅड्रेस ग्राह्य धरत नाहीत.