किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची

Submitted by वैनिल on 27 November, 2017 - 21:56

किशोरचे सर्व अंक सर्वांसाठी आंतरजालावर सहज उपलब्ध करून देऊन किशोरच्या व्यवस्थापनाने एक अतिशय सुखद धक्का दिला आहे. ह्या उपक्रमाबद्दल त्यांचे आणि संबंधितांचे कौतुक करावे तितके कमीच ! जवळपास ५५० अंक आता किशोरचा खजिना ह्या दुव्यावर उपलब्ध आहेत.

किशोर एकदा हातात आल्यानंतर त्यातल्या दर्जेदार लेखांचा आणि कवितांचा फडशा पाडल्याशिवाय अंक काही खाली ठेववत नसे. कित्येकदा जेवतानाही त्यावरून बोलणी खाल्ली आहेत आणि एकदा शेजार्‍यांच्या घरात अडकून राहण्याचा पराक्रमही केला आहे. Happy किशोरच्या जुन्या अंकांनी कित्येकांच्या लहानपणीच्या गोड आठवणींना आता उजाळा मिळेल.

'अजब देशात', 'सागरकैद', 'चीनचे प्राचीन शोध', 'ज्ञानवृक्षाच्या पारंब्या' अशा कित्येक लेखमालांच्या आठवणी माझ्या मनाच्या एका कप्प्यात कित्येक वर्षे दडून राहील्या होत्या. आता ह्या खजिन्यात त्या मिळतील, पण अर्धसहस्र अंकांमध्ये त्या शोधता शोधता इतर लेखांमध्ये हरवून जायला होतंय. तोही एक सुखद अनुभव आहेच, परंतु त्या सदाबहार लेखांची एक सूची बनवून इथे ठेवण्याचा विचार आहे. ज्यांना ठराविक लेख हवे असतील, त्यांना ही सूची उपयोगी पडू शकेल. तुम्हाला आणखी काही लेख माहिती असतील किंवा सापडले असतील तर सांगा, तेही ह्या सूचीत जोडले जातील.

लेखमाला

कथा / लेख

लघु लेख

  • माझे १४ वे वर्ष - लता मंगेशकर, ना.ग.गोरे, मालती बेडेकर, ना.श्री.बेंद्रे, चंदू बोर्डे, विजय तेंडुलकर, रा.ज.देशमुख - नोव्हेंबर १९७२
  • अशी होती आमची शाळा - ना.सी.फडके, अनंत काणेकर, व्हा.अ‍ॅ. भास्करराव सोमण, सौ. कमला फडके, अजित वाडेकर, उमाकांत ठोमरे - नोव्हेंबर १९७३
  • मला आठवते ते असे - यशवंतराव चव्हाण, व्ही. शांताराम, डॉ. वसंतराव देशपांडे, मंगेश पाडगांवकर - नोव्हेंबर १९७६
  • बालपणीचा काळ सुखाचा - पु.ल.देशपांडे, सुनिल गावस्कर, डॉ. श्रीराम लागू, जयवंत दळवी, मु.शं.किर्लोस्कर - नोव्हेंबर १९७८

नाट्यछटा

  • अर्जुन साखरे - वडापाववाला - सौ. वसुधा पाटील - मे १९८१

कविता

नाटुकली / एकांकिका

चित्रकथा

तळटीपः
किशोर, चांदोबा आणि इतर मासिकांबद्दल चर्चा करण्याकरता हा अजून एक धागा: "किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं"

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@यक्ष, एवढी 'धन्य'राशी एक यक्षच देऊ शकतो. आनंदाने स्वीकारु. Happy
@anudon, 'छोटूचा रुसला टॉवेल' - बरोबर. धमाल नाट्यछटा आहे ती.
@अंजली_१२, नक्की काय दिसत नाहीये? browser बदलून पहा.

धन्यवाद सर्वांना. सूची वाढवलीये. अजून येऊ द्या ... Happy

किशोरमध्ये लिहिणारे प्रा. ना. वा. कोगेकर म्हणजे फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य कोगेकर का? त्या काळी तिथे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या लेखनात/आठवणींत त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख वाचायला मिळतो.

>> किशोरमध्ये लिहिणारे प्रा. ना. वा. कोगेकर म्हणजे फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य कोगेकर का?
हे "विज्ञानयुग" मध्ये पण लिहित असत. लेख अतिशय छान असायचे. खूपच माहितीपूर्ण आणि रस निर्माण होईल असे लिखाण.

दुर्गा भागवतांच्या लहानपणच्या आठवणी भन्नाट आहेत. त्यांचा उपद्व्यापीपणा, जखमा, वेदना सहन करायची जिद्द ही त्यांच्या पुढील आयुष्याची चुणूक दाखवते. त्या सर्व गोष्टी ह्या त्यांच्या आत्मचरित्रातून घेतल्या आहेत असे वाटते. आत्तापर्यंत फक्त नोव्हेंबर १९७४ चा अंक मिळाला ज्यात त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे पण अजूनही वाचल्या आहेत.

शांता शेळके, वसंत बापट, विंदा करंदीकर ह्यांच्यासारखे प्रसिद्ध कवी आणि अनेक मोठे लेखक ह्या अंकाकरता नियमित लेखन करत असत हे मोठे कौतुकाचे आहे.

मस्त. ही अनुक्रमणिका वाढत जावो.
सरोजिनी बाबरांची एक लघुकथा वाचली. अतिवास यांच्या आंजीच्या कथांची आठवण झाली.

एक कथा आठवते, किशोरमधली आहे का ते ठाउक नाही पण एक छोटी मुलगी नाराज असते मम्मीवर. मम्मी जाहिरातीतल्या बाईसारखी आक्खी विक्सची डबी बोटावर घेवुन विक्स लावत नाही, पावसात भिजुन आलं की न ओरडता हसतमुखाने केस पुसुन देत नाही, चॉकलेट बिस्कीट्स देत नाही, छोट्या भावाकडेच जास्त लक्ष देते वगैरे वगैरे. मग तिच्या वाढदिवसाला मम्मी पपा, आजोबा वगैरे काहीतरी सरप्राईझ देतात अशी. कुणाला आठवली तर प्लीज सांगणे.

एका मुलाची गोष्ट होती. तो सकाळी उठायला त्रास देतो मग आई त्याला सरळ नळाखाली बसवते मग तो चहा अन दहा असा हट्ट करतो. म्हणजे चहा अन दहा बिस्किटं. माहितीय का कोणला? ही बातमी कळल्यापासून उगीच ही गोष्ट आठवतीय सारखी.

एक ठमाकाकूंच्या मोहन ची गोष्ट होती ना.
इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी.

'छोटूचा रुसला टॉवेल', 'भोपळ्या राक्षस' आणि 'अज्ञानाची काशीयात्रा' मिळाले ! ... सूचीत जोडले आहेत.

एक (बहुतेक शोभा बोंद्रे लिखीत) मस्त गोष्ट होती. लहान मुली आपल्या साध्या बाहुल्यांशी खेळत असतात आणि मैत्रिण चकाचक बार्बी घेऊन येते, मग यांच्या बाहुल्या फिक्या वाटू लागतात, मग या खूप मेहनत करुन एक बाहुला लग्नासाठी सजवतात तितक्यात ती मैत्रिण बार्बीचा मित्र केन विकत घेऊन येऊन त्यांचा पोपट करते अशी काहीतरी(मी नीट सांगत नाहीय पण छान होती ती गोष्ट.)

same pinch mi_anu Happy

कालच reply लिहिणार होते तुझ्या post वर. किशोर बद्दल वाचून मला सगळ्यात आधी ह्याच दोन गोष्टि आठवल्या होत्या.
पहिल्या गोष्टितल्या मुलीचे नाव बबली आहे. आणि barbie च्या गोष्टितल्या दोन बहिणी अंजू-मंजू बहुतेक. त्याची मामेबहिण आलेली असते अमेरिकेवरुन barbie gheun. खडूस मामी पण असते. मस्त होती ती गोष्ट. Happy

आईचा वाढदिवस नावाची गोष्ट कोणाला मिळाली तर कळवा.

तसंच एक मुलगी तिचा वाढदिवस अगदी वेगळ्या प्रकारे घरात कामं करणार्या लोकांना भेटी देऊन करते अशी एक कथा होती. तिचाही ठावठिकाणा कळवा.

आज एक गंमत नोटीस केली.

वर लिहिलेल्या तिन्ही चित्रकथा आणि त्याचे सगळे भाग (जवळजवळ 15) हे किशोरमध्ये पान 44 वरच छापले आहेत. शेवटी शेवटी तर मी अनुक्रमणिका बघणं सोडून डायरेक्ट पान 44 वर उडी मारली Happy

तिन्ही चित्रकथा आणि त्याचे सगळे भाग (जवळजवळ 15) हे किशोरमध्ये पान 44 वरच छापले आहेत >> तो तत्कालीन (डीटीपीपूर्व) टाईपसेटिंगचा परिणाम असावा.

एक 'दूधपाक' नावाची कथा होती. त्यात प्रवासाला जायला निघालेल्या आपल्या भाच्यांसाठी मामी सकाळी दूधपाक बनवतात आणि वरचा काढून त्यांना डब्यात देतात. नंतर उरलेला दूधपाक काढून ठेवत असताना त्यांच्या लक्षात येतं की त्या भांड्यात पाल पडली होती आणि त्यामुळे तो दूधपाक विषारी बनला होता. मग भाच्यांपर्यंत पोचण्यासाठी, त्यांना दूधपाक खाण्याच्या आधी थांबवण्यासाठी मामा/मामी/त्यांची मुलं जिवाचा आटापिटा करून त्यांचा पाठलाग करतात अशी काहीशी कथा होती. कोणाला माहिती आहे का की ती कुठल्या अंकात आहे?

मागे बालभरतीने जुने अंकाचे एक निवडक किशोर म्हणून संच प्रकाशित केले होते त्याचे ४ संच (छान हार्ड बाऊंड ) संग्रही मी बालभारती मधून घेऊन आलो!

इलेक्ट्रिक शॉक बसतो आणि वायर ला २ जण चिकटतात आणि लहान मुलगी वर्गात शिकलेल्या सायन्स चा उपयोग करुन धुण्याच्या काठीने त्यांना सोडवते अशी काहीतरी. > हो, शौर्याचे राष्ट्रपती पदक मिळालेल्या मुलीची कथा होती ती. मी वाचली गेल्या आठवड्यात पण कोणत्या अंकात ते आता लक्षात नाही. Sad

एक 'बिली आणि ठेंगूजी' कथा माझ्या आवडीची होती. १९७६ च्या दिवाळी अंकात आहे, पान नं १०९ वर. त्यातील बुधले च्या बुधले भरलेली सरबतं बघायला (चित्र) मला फार आवडायचं Happy

पियू? कोणत्या ३ गोष्टी?बाहुलीचं लग्न वगैरे का?
कोणत्या सालच्या पान ४४ वर?

>> अगं चित्रकथा.. बोलके खांब, दर्यादेशाची राजकन्या आणि सुवर्णघंटा. कोणत्या अंकात ते मूळ लेखातच दिलंय बघ वैनील यांनी

वोके.एकंदर पूर्ण किशोरच परत सगळे डोळ्याखालून घालायला हवे.
एक हातूपातू ची गोष्ट होती.लहान मुलाकडून हातूपातू नावाच्या लहान भावाचा मृत्यू होतो अशी कहीतरी.किशोर मध्येच होती का आठवत नाही.

Pages