रोलर पेनने काढलेली डिझाईन्स

Submitted by विद्या भुतकर on 22 November, 2017 - 16:52

मध्ये मंडला डिझाईन्स काढण्याचं खुळ लागलं होतं. ते जरा कमी झालंय. काही दिवसांपूर्वी असंच एका उशीवर एकदम सोपी डिझाईन पाहिली होती. ती पूर्ण आठवली नाही म्हणून जमेल तशी ही फुलं काढली. आणि ते पूर्ण झाल्यावर इतकं छान वाटलं. ते काढताना एकसलग पेनने वळणं घेत रेषा मारायला मजा आली. एकदम स्ट्रेस बस्टर.

19883964_1660995660641069_4258846661564099202_n.jpg

काल बसल्या बसल्या ही पुढची दोन काढली. त्यातलं एक(सूर्य,लाटा असलेलं) पिंटरेस्ट वरून पाहून काढलं आहे. आता अजून काही काढून बघायची म्हणत आहे. Happy एकदम सोपे आणि एक रोलर पेन असेल तर सहज कुठेही काढता येतील अशी आहेत. पेन्सिलने मोठे आकार काढून घ्यायचे आणि मग पेनाने सलग रेषा काढत राहायचं.
Happy
23844614_1833514316722535_3790104364596419721_n.jpg23722369_1833514306722536_2360122005517618473_n.jpg

वेगवेगळे पॅटर्न्सही पाहिले नेटवर असेच पेनने बनवलेले.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसते आहे.
हे बघून मलाही असे काही करावेसे वाटत आहे Happy

मस्त !!!!!

सुंदर

९६क - मस्तच एकदम. फुलान्चे आतल पॅटर्न छान दिसत आहेत. Happy
सोनाली, एस - गो फॉर इट. Happy एकदा घेऊन बसलं की नादच लागतो.
सर्वांचे आभार.

विद्या.

सुरेख आहेत डिझाइन्स ! तीन ही आवडली !
मी करायचो काही काळापुर्वी ! मजा येते.
डिझाइन्स/ डुडल्सच्या सरावानं रेषेमध्ये ज्याम सुधारणा होते, कलाकृती आणखी आणखी ग्रेसफुल व्हायला लागतात.

आणखी डिझाइन्स/ डुडल्स पहायला आवडतील, विद्याजी !