आज डॉक्टरकडून निघालो आणि केमिस्टच्या दुकानात शिरलो. रात्रीचे साडेदहा उलटून गेल्याने वर्दळ अशी नव्हतीच. मोजून दोन गिर्हाईक. मी आत शिरताच त्यातील एक बाहेर पडले. आता फक्त एक बाई तेवढी होती. सोबत तिचा चारपाच वर्षांचा मुलगा. आणि दुकानातील पोरे.
बाईच्या हातात औषधांची मोठी लिस्ट होती आणि त्या छोट्याची काहीतरी चुळबूळ चालू होती. काही विशेष नाही. आजूबाजूच्या काचेच्या कपाटांमधील वस्तू कुतूहलाने बघत होता. त्याने आपल्याजवळच राहावे म्हणून बाई सारखी ओरडत होती. डाफरल्यासारखेच ओरडत होती. मला तो सूर जास्त भावला नाही. पण नवल म्हणजे दिसायला ती बाई ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेली एक मॉडर्न मम्मा असली तरी शुद्ध मराठीमध्ये बोलत होती. खरे तर हे एक अत्यंत दुर्मिळ चित्र बघून मला थोडेसे बरेही वाटत होते. पण तिचे ते ओरडणे... ते थोडेसे इरीटेट करत होते.
दुकानातील पोरं त्या छोट्याची मजा एंजॉय करत होती. तसा काही विशेष मस्ती करत नव्हता पण ते एक असते ना, लहान मुल म्हटले की आपण जरा कौतुकाने बघतो. त्यातला प्रकार होता. लहान मुलांनाही अश्यावेळी त्या कौतुकाच्या नजरा झेलायला आणि सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनायला आवडते. त्याची मम्मा त्याला पुन्हा पुन्हा जवळ खेचत होती आणि हा पुन्हा पुन्हा त्या काचेच्या कपाटांजवळ जात होता. "आरोह, जाऊ नकोस तिकडे. एकदा सांगितलेले समजत नाही का. ईकडे ये. मार खाशील नाहीतर..." बाईचे ओरडणे चालूच होते.
एकदाची त्या बाईची खरेदी आटपली आणि जाण्याआधी ती मुलाला जवळ घेत स्वेटर कम जॅकेट घालायचा प्रयत्न करू लागली. मुलगा काही कारणामुळे नकार देऊ लागला. तसे तिची सटकली आणि तिने खाडकन त्याच्या एक मुस्कटात मारली. "मगाशी तुला हे घालायचे होते ना, आता का नाटकं करत आहेस?" पुन्हा ओरडली. मुस्कटात मारलेल्या चापटीचा(?) आवाज खणखणीत आला होता. मी स्वत: या बाबतीत मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर बाळगून असल्याने मलाच उगाचच जास्त मारलेले वाटले की काय म्हणून मी दुकानातल्या पोरांचे भाव पाहिले. ते सुद्धा बावरले होते. मगाशी जे हसत त्या मुलाकडे बघत होते ते नजर चोरू लागले. मुलगा रडला नाही, पण हिरमुसला. त्याला या अपमानाची सवय असावी. पण तो देखील आता आमच्यापासून नजर चोरू लागला. बहुतेक त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला होता. वाईट वाटले. जास्त वाईट याचे वाटले की या प्रकारात आपण काही करू शकत नाही किंवा काय करावे हे आपल्याला समजत नाही.
लहान मुलांना मारावे की नाही हा वेगळा विषय झाला. त्यावर कुठे कुठे चर्चा झालीही असेल. त्याबाबत माझे मत जरी मारू नये असे असले तरी ठिक आहे, ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोण. शेवटी आईबाप आहेत, पोरांच्या भल्याचाच विचार करणार. पण हे शिस्त आणि संस्कार लावण्यासाठीचे मारणे घराच्या चार भिंती आड नाही का करता येणार? असे चारचौघात मारल्याने लहान मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जात नसेल का? की लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असा काही नसतोच??
आज काय करायचे हे मला पटकन सुचले नाही. पण पुढच्यावेळी मात्र मी अश्या आईबापांना नक्की झापणार....
चूभूदेघे,
ऋन्मेष
ॠन्मेषा, धन्यचवाद,
ॠन्मेषा, धन्यचवाद,
इथे अजुन लिहू नका, हे सांगण्याची स्टाईल आवडली.
नक्की कशाबद्दल वेगळा धागा काढायचा, हे जरा सांगणार का?
मित्रा, आपल्या देशात नेट आली ना? त्या दिवसापासून वापरतोय रे मी. मसं, याहू, ऑर्कुट, हे अन ते. बरंच पाहिलंय
हिशोब इतर कुणि मांडला, तरच चुकता करतो मी.
परत जिप्सीचा गणपतीतला
परत जिप्सीचा गणपतीतला फोटोवाला धागा अन त्यातल्या लहान मुलांच्या फोटोजबद्दलचे वाहत्या पानावरचे रेफरन्सेस(च) आठवून(च) द्यायला(च) हवेत(च) का?
°>>>>>>>
जिप्सया नव्हे माझ्या गणपती मिरवणूक फोटो चा दंगा होता तो. मला त्यावेळी निरुपद्रवी वाटलेल्या फोटोवरून इतका मोठा बाऊ करण्यात आला होता की मी जणू काही समाजविघातक कृत्य करतोय, शेवटी वैतागून सगळे धागे उडवून टाकले, त्यानंतर परत फोटो टाकण्याच्या फंदात पडलो नाही.
जिप्सयाला ही हैराण केले होते,तो तर माबोच सोडून गेला होता.
परत जिप्सीचा गणपतीतला
परत जिप्सीचा गणपतीतला फोटोवाला धागा अन त्यातल्या लहान मुलांच्या फोटोजबद्दलचे वाहत्या पानावरचे रेफरन्सेस(च) आठवून(च) द्यायला(च) हवेत(च) का? >>> अॅक्चुअली यू नो व्हॉट एकदा आठवण करून च द्याच. एक्झॅक्टली काय झाले होते त्या धाग्यावर ते पुराव्यासह लिहाच. मग अवश्य बोलू त्यावर. मागेही एकदा तुम्ही जिप्सी आणि पेडोफेलिया हा एक आंधळा कांगावा सुरु केला होता आणि त्यावर उत्तर द्यायला कोणी तरी तिथे त्या वेळेच्या चर्चेच्या लिन्क्स पोस्ट केल्या तर पळून गेला होतात सोयीस्कर रित्या त्या आपल्या ह्यांच्यासारखेच .
असो हे विषयांतर झाले.
इथे अजुन लिहू नका, हे
इथे अजुन लिहू नका, हे सांगण्याची स्टाईल आवडली.
>>>>
काहीही लिहिले तरी तुम्ही उलटा अर्थ काढणार असाल तर अवघड होईल.
एकतर तुम्ही डॉक्टर आहात हे आधीच्या पोस्टला मला माहीत नव्हते. (तुम्ही ईब्लिस आहात का?) वर कोणीतरी तुम्हाला डॉक्टर म्हटले म्हणून समजले. त्यामुळे तुम्हाला याबाबत चार गोष्टी, चार संदर्भ ईतरांपेक्षा जास्त माहीत असतील या हेतूने लिहा म्हणालो. अर्थात तिथेही तुमचे मत पटले नाही तर तुमच्याशी वाद जरूर घालणार, भले तुम्ही डॉक्टर असाल आणि मी सामान्य माणूस.
तसेच सविस्तर आणि वेगळ्या धाग्यात यासाठी लिहा म्हणालो की तुम्ही ईथे वादासाठी म्हणून लिहिणार असाल तर तुमच्याकडे खरेच जे काही ज्ञान असेल त्याचा फायदा कोणालाच होणार नाही. बाकी या धाग्यात लिहाल आणि माझ्या धाग्यावरचे प्रतिसाद वाढवाल तर मला आनंदच आहे. मी तुम्हाला वेगळ्या धाग्यात लिहायला सांगणे हा खरे तर माझा त्याग आहे
बाकी मूळ मुद्दा राहिलाच.
बाकी मूळ मुद्दा राहिलाच.
आरारा एकीकडे तुम्ही "खरंच पुस्तक वाचून मुलं मोठी करायची असतील, तर जरा चाईल्ड सायकॉलॉजीची अधिकृत, पियर रिव्ह्यूड, चांगली पुस्तके वाचा." असं म्हणता आणि दुसरीकडे:
"अन्यथा, "मुलांना समजवून सांगतांना गुडघ्यावर बसणे" असली अमेरिकन कल्पना डोक्यात बसते.
आपल्या देसी काँटेक्स्टमधे मुलांइतकं लहान होऊन गुडघ्यावर बसत नाहीत. त्या मुलाला उचलून कडेवर घेतात, मग समजवतात. अन त्यात कुणाला वावगं वाटत नाही, वाटायलाही नको, पण त्या 'तिकडे' मुलाला टिचरने 'हग' दिली तरी पेडोफिलियाची केस होते, मुला/मुलीला कडेवर उचलून घ्यायची हिम्मत यांच्यात उरलेली नाही.. " असली विधानं करता. एक तर ते "जिप्सी आणि पेडोफिलिया " प्रकरणासारखं खोडसाळ जनरलायजेशन तरी आहे किंवा मग लुक्स लाइक तुम्हाला अॅक्सेस असलेला आणि इत्थंभूत माहिती असलेला ग्रह आमच्या अमेरिकेचा डु आय्डी असावा
हा नक्की काय प्रकार आहे हे
हा नक्की काय प्रकार आहे हे गुगल करून बघावं म्हटलं तर पहिलीच लिंक ही मिळाली.
https://goodmenproject.com/featured-content/put-your-hands-up-and-step-a...
As a young, male teacher in the New York City Public School system, I was taught (by the New York City Board Of Education itself), if a student should ever initiate a hug with me, the most appropriate response would be for me to put my hands up in the air (as opposed to embracing the student). Essentially, if a student gave me a hug, I was supposed to act like I was getting arrested.
भारतीय आणि अमेरिकन पेरेटिंग
भारतीय आणि अमेरिकन पेरेटिंग कन्सेप्टझ वेगवेगळ्या आहेत हे पटतंय. आरारा काय म्हणत आहेत तो मूळ मुद्दा बरोबर आणि relevent आहे. बऱ्यापैकी सार्कझम आहे त्यांच्या पोस्टमधे( पूर्वीच्या झक्की आयडी च्या पोस्ट कश्या असायच्या!) पण ज्यांना सारकाझम कळतं नाही अथवा कळवून घ्यायचा नाही, तिथे मग शब्दांचा किस पडतो .
अन्यथा, "मुलांना समजवून
अन्यथा, "मुलांना समजवून सांगतांना गुडघ्यावर बसणे" असली अमेरिकन कल्पना डोक्यात बसते. >>> गुडघ्यावर बसा नाहीतर कडेवर घ्या. मुलाच्या लेव्हलला जाऊन समजावणे महत्वाचे. काही पालकांना कडेवर घेणे सोयीचे असे तर काही पालकांना गुडघ्यावर बसणे सोयीचे असेल. काही पालक वेळ, काळ, स्थळ बघून ह्या दोन्हीपैकी कोणती पद्धत वापरायची ते ठरवत असतील!!
पण त्या 'तिकडे' मुलाला टिचरने 'हग' दिली तरी पेडोफिलियाची केस होते, मुला/मुलीला कडेवर उचलून घ्यायची हिम्मत यांच्यात उरलेली नाही >>> डेकेयरमध्ये सगळ्या केयरटेकर्स अगदी लहान मुलांची डायपर बदलण्यापासून सगळी कामे करतात. हग केल्यावर पेडोफिलियाची केस होते असे काहीही नाहीये. लहान मुलांशी संबंधित कोणतेही काम करण्याआधीच पेडोफिलियासाठी कसून बॅकग्राऊंड चेक केला जातो.
मुद्दा हा, की आपल्याकडे मुलांना मोठं करायची पद्धत वेगळी आहे. आपल्यात मुलांना आपल्या उंचीवर आणून मग समजवण्याची पद्धत आहे. ट्रीट देम अॅज अॅन अॅडल्ट/फ्यूचर अॅडल्ट. >>> फ्यूचर अॅडल्ट म्हणून ट्रीट करायचे असेल तर कडेवर घेणे कसे काय योग्य आहे? आणि तसे ट्रीट करायचे असे तर तुमच्या पोस्टमध्ये तुम्ही म्हटले आहे की "सेल्फ रिस्पेक्ट, प्राय्वसी, पर्सनल स्पेस असल्या संकल्पना एतद्देशिय संदर्भांत निरुपयोगी/इर्रिलेव्हंट आहेत," ते कसे काय? अॅडल्ट/फ्यूचर अॅडल्टच्या बाबतीत ह्या सर्व संकल्पना नाकारून कसे चालेल?
रात्री इतक्या उशीरा
रात्री इतक्या उशीरा केमिस्टकडे लहान मुलाला घेवून आलेली आई आधीच दिवसभराच्या वडवडीने थकलेली, कावलेली असणार. मूलही झोपेची वेळ उलटून गेल्याने जरा जास्तच एक्साईट झालेले, दंगा मूडमधे असावे. अशावेळी त्या गडबड करणार्या मुलाची कौतुकाने मजा बघण्या ऐवजी दुकानातल्या मुलांनी त्याच्याशी संवाद साधला असता किंवा तुम्हीही 'बाळा , आई बोलावतेय ना, जा. आईजवळ उभा रहा. गडबड केली तर हे दुकानातले दादा /काका ओरडतील हं' असे काहीतरी बोलून त्याला जरा आवरले असते तर कदाचित त्या आईला जरा मदत झाली असती आणि नंतरचा माराचा प्रसंग टळला असता. नंतर झापण्यापेक्षा आधीच ताण कमी करायला , परीस्थिती काबूत आणायला मदत करावी. पालक झाले तरी माणूसच. काही वेळा सगळ्या बाजूंवर दिवसभर लढून थकलेले असतात त्यात मुलाचे वर्तन चिडचिडीत भर घालते. मूल इझी टार्गेट, हात उठला. नंतर त्या आईला बाळाला मारल्याचे वाईटही वाटले असणार.
लहान मुलाला सेल्फ रिस्पेक्ट असतो पण त्या जोडीला काय चूक काय बरोबर हे समजत नसते, काही वेळा समजत असले तरी त्या क्षणी वळत नसते. मुलाचा सेल्फ रिस्पेक्ट दुखवायचा नाही पण त्याच जोडीला फाजिल अभिमानाला खतपाणीही घालायचे नाही हे तसे कठीण काम. यात शॉर्टकट्स नाहीत. मुलाचे चुकीचे वर्तन थांबवणे, पुन्हा तसे वर्तन घडणार नाही म्हणून उपाय करणे, त्याशिवाय काही बाबतीत मूल उपद्व्याप करेल हे गृहित धरुन आधीपासून सजग रहाणे, आपल्या स्वतःच्या वर्तनातही शिस्त आणि सातत्य ठेवणे हे जाणीव पुर्वक करावे लागते. मुलाला चुकीच्या वर्तनाबद्दल समजावून सांगणे, योग्य ती शिक्षा देणे, वर्तन सुधारायला वेळ देणे, छोट्या बदलांची नोंद घेवून कौतुक करणे, योग्य पर्याय निवडायला शिकवणे हे झटपट होत नाही. वेळ द्यावा लागतो. चार पावलं पुढे, दोन पावलं मागे असा प्रकार असतो. आपल्या देहबोलीतून , वावरातून मुलाबद्दल विश्वास दाखवला, वयानुरुप जबाबदारी देवून ती पार पाडल्याबद्दल कौतुक केले की मुलाचा सेल्फ रिस्पेक्ट वाढीस लागतो. मग आईबाबांचा धाक म्हणून नव्हे तर स्वतःसाठी , एक ऑनर म्हणून म्हणून मूल योग्य पर्याय निवडू लागते. चूक झाली तरी आपणहून कबुली देणे, परीणामांची जबाबदारी स्विकारणे, पुन्हा असा प्रसंग आल्यास काय करावे याबद्दल पालकांशी संवाद साधणे होवू लागते.
मुलाला मारणे किंवा टोकाचे निष्ठूरपणे बोलणे हा सोपा पर्याय! मूल चुकीचे वागते, तुम्ही रिअॅक्ट होता. काही वेळा मुलाला गंभीर दुखापत झाली असती या भीतीपोटी, काही वेळा परक्यासमोर मुलाच्या वर्तनामुळे मान खाली घालायला लावली म्हणून चिडून , काही वेळा मुलाला वळण लावताना मारणे हाच उपाय माहित आहे/योग्य वाटतो म्हणून, तर काही वेळा तुम्ही मेल्ट डाऊन पॉइंटला आलेले असता त्यात मुलाचे वर्तन ही शेवटची काडी आणि मूल इझी टार्गेट म्हणून. मूल दुबळे आहे तेव्हा हात उगारता. मार बसतो या धाकापोटी मूल तात्पुरते का होईना नीट वागते. जसे मोठे होते तसे बरेचदा मार बसेल या धाकापोटी बर्याच गोष्टी पालकांपासून लपवून ठेवते. कुठलातरी भलताच राग पालकांनी आपल्यावर काढला, आपल्याला मार /ओरडा बसला हे देखील मुलाच्या हळूहळू लक्षात येवू लागते. अशावेळी मुलांना दुबळे-एकाकी वाटते. त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावतोच, शिवाय मनात पालकांबद्दल चा आदर, आपलेपणाही कमी होतो. त्यामुळे आपला तोल गेला, हात उठला तर नंतर त्याबद्दल मुलाशी बोलावे. समजूत घालावी. त्याचे वागणे चुकले आणि काळजीपोटी, रागापोटी आपलेही वागणे चुकले हे कबुल करावे, पुन्हा असे होवु नये म्हणून काय करायचे याबद्दल बोलावे. बरेचदा मुलं गळ्यात पडून माफ करुन टाकतात आणि उपाय सुचवून आपल्याला चकीतही करतात.
अमेरीकेत मिठी मारणे हे फार कॉमन आहे. काही वेळा या मिठी मारणे प्रकारातून मोठ्यांकडून मुलांचा गैरफायदा घेतला जावु शकतो. त्यामुळे मुलाला नातेवाईक , ओळखीची इतर मंडळी, टिचर, पास्टर वगैरे ऑथॉरिटी असलेली लोकं यांना मिठी मारण्यासाठी फोर्स करु नका असे सांगतात. मूल एखाद्या मोठ्या व्यक्तीला मिठी मारायला तयार नसेल तर त्याच्या इच्छेविरुद्ध काही घडू देवू नका, त्याला 'नाही' म्हणायचे असेल तर सपोर्ट करा असे सांगतात. मात्र मूल आपणहून मिठी मारणार असेल तर चालते. आमच्या इथे मुलं टिचरना हग देतात, मुलांचा काही कारणाने मेल्ट डाऊन झाला तर टिचर जवळ घेवून समजूत घालतात. मुलं आपल्या पुर्वीच्या टिचरना देखील गुडमॉर्निंग हग द्यायला येतात. उठसुठ कुणी चुकीचे निष्कर्ष काढून तक्रारी करत नाही. मिडलस्कूल्/हायस्कूलमधे या मिठी प्रकाराला वेगळा रंग येवू शकतो हे लक्षात घेवून नियम्/गाईडलाइन्स बदलतात. बर्याच शाळांत विद्यार्थ्यांच्या आपापसातील मिठ्यांवर मात्र बंधने आहेत. मारहाण करणे हा गुन्हा आहे मात्र आमच्या स्टेटमधे शाळेत शिक्षा म्हणून corporal punishment लिगल आहे. ही शिक्षा फार कमी वेळा दिली जाते तसेच एकंदरी गुन्हा काय हे विचारात घेवून , ठरवून दिली जाते. मारकुट्या मास्तरांनी शुल्लक कारणावरुन मनमानी हात साफ करुन घेणे यात बसत नाही. बाकी देशात एलिमेंटरी स्कूलमधेदेखील कुठल्या टिचरने कधी प्रेमाने मिठी मारल्याचे, जवळ घेवून समजावून सांगितल्याचे आठवत नाही.
गुडघ्यावर बसून बोला/ कडेवर घ्या -रागाच्या भरात भडाभडा बोलले की मूल गोंधळून जाते. मुलाला आपण काय सांगतोय ते कळतेय का , मुलाला काही प्रश्न आहेत का/स्पष्टीकरण द्यायचे आहे का याचा अंदाज घेत नजर मिळवून , शांतपणे बोलणे, मुलाशी विचारपूर्वक संवाद साधणे अपेक्षित. आमच्याकडे मुलाला उचलून घेणे आणि गुढघ्यावर बसणे हे दोन्ही न जमणारे होते. तेव्हा आम्ही आपले सोफ्यावर किंवा कार्पेटवर फतकल मारुन बसायचो. शाळेत टिचर मुलाला थिंकिंग चेअरमधे बसवायची आणि स्वतः समोरच्या खुर्चीत बसायची.
सेल्फ रिस्पेक्ट, प्रायवसी, पर्सनल स्पेस याचा आणि कुटुंब विभक्त की २-३ पिढ्या एकत्र किंवा ४०० स्केअर फूट्ची जागा की प्रत्येकाला स्वतंत्र खोली याच्याशी काय संबंध? दुसर्या व्यक्तीच्या इच्छेचा आदर करणे, विनाकारण ढवळाढवळ न करणे हे करण्यासाठी मनापासून इच्छा हवी. तसे नसेल तर मोठ्या घरातही दरवाजाला कान लावून चोरुन ऐकणे , सेलफोन चेक करणे , आलेली मेल उघडणे वगैरे प्रकार चालणार. अजून एक म्हणजे प्रेमाने विचारपूस करणे, काळजीपोटी मार्गदर्शन करणे आणि ढवळाढवळ करणे यात फरक आहे आणि ज्याच्या बाबतीत होते त्याला व्यवस्थित जाणवते. भारतात एकंदरीतच बर्याच घरातून फ्युचर अॅडल्ट म्हणून ट्रीट करणे नसते. ना वयानुरुप जबाबदारी सोपवली जाते ना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. अगदी २५ शी उलटलेल्या मुलांनाही अॅडल्ट म्हणून वागवणे बर्याच घरात घडत नाही. मुलंही धाकापोटी भरपूर गोष्टी आईवडीलांपासून लपवतात.
स्वाती२, छान पोस्ट!
स्वाती२, छान पोस्ट!
स्वाती उत्तम पोस्ट ! +786
स्वाती उत्तम पोस्ट ! +786
आपलेही वागणे चुकले हे कबुल करावे >>>> हे फार गरजेचे आहे. जेव्हा आपण वड्याचे तेल वांग्यावर काढत मुलांना मारतो तेव्हा ती चूक त्यांच्यासमोर कबूलही करावी. उगाचच तुझ्या भल्यासाठी मारले असा खोटा आव दरवेळी आणू नये. तसे खरोखर जेव्हा असते तेव्हाच बोलावे. मुलांनाही या दोन्हींमधील फरक जाणवतो आणि कळतो.
स्वाती२ खूपच छान पोस्ट.
स्वाती२ खूपच छान पोस्ट. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.
हा व असे अनेक विषय आहेत की
हा व असे अनेक विषय आहेत की ज्यावर अमेरिकेची नि भारताची तुलना करणे योग्य वाटत नाही.
कारण भारतीय संस्कृति हजार वर्षाहून अधिक जुनी आहे.
अमेरिकेची संस्कृति अत्यंत क्षणिक असते. लांब दोरी असलेल्या लंबकाप्रमाणे एकदा या टोकाला तर एकदा त्या.
तर संस्कृती चा जो परिणाम होतो त्यावर लोकांचे वर्तन घडते
स्वाती २ अतीशय संतुलीत व
स्वाती २ अतीशय संतुलीत व मुद्देसुद पोस्ट. खरय, तुम्ही जे काही लिहीता त्यातुन बरेच शिकण्यासारखे असते. तुम्ही नाण्याच्या दोन्ही बाजूंचा विचार करता हे बघुन खूप बरे वाटले.
स्वाती २ नेहमी प्रमाणेच सर्व
स्वाती २ नेहमी प्रमाणेच सर्व मुद्दे पटले.
Pages