आज डॉक्टरकडून निघालो आणि केमिस्टच्या दुकानात शिरलो. रात्रीचे साडेदहा उलटून गेल्याने वर्दळ अशी नव्हतीच. मोजून दोन गिर्हाईक. मी आत शिरताच त्यातील एक बाहेर पडले. आता फक्त एक बाई तेवढी होती. सोबत तिचा चारपाच वर्षांचा मुलगा. आणि दुकानातील पोरे.
बाईच्या हातात औषधांची मोठी लिस्ट होती आणि त्या छोट्याची काहीतरी चुळबूळ चालू होती. काही विशेष नाही. आजूबाजूच्या काचेच्या कपाटांमधील वस्तू कुतूहलाने बघत होता. त्याने आपल्याजवळच राहावे म्हणून बाई सारखी ओरडत होती. डाफरल्यासारखेच ओरडत होती. मला तो सूर जास्त भावला नाही. पण नवल म्हणजे दिसायला ती बाई ब्ल्यू जीन्स आणि ब्लॅक टॉप घातलेली एक मॉडर्न मम्मा असली तरी शुद्ध मराठीमध्ये बोलत होती. खरे तर हे एक अत्यंत दुर्मिळ चित्र बघून मला थोडेसे बरेही वाटत होते. पण तिचे ते ओरडणे... ते थोडेसे इरीटेट करत होते.
दुकानातील पोरं त्या छोट्याची मजा एंजॉय करत होती. तसा काही विशेष मस्ती करत नव्हता पण ते एक असते ना, लहान मुल म्हटले की आपण जरा कौतुकाने बघतो. त्यातला प्रकार होता. लहान मुलांनाही अश्यावेळी त्या कौतुकाच्या नजरा झेलायला आणि सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनायला आवडते. त्याची मम्मा त्याला पुन्हा पुन्हा जवळ खेचत होती आणि हा पुन्हा पुन्हा त्या काचेच्या कपाटांजवळ जात होता. "आरोह, जाऊ नकोस तिकडे. एकदा सांगितलेले समजत नाही का. ईकडे ये. मार खाशील नाहीतर..." बाईचे ओरडणे चालूच होते.
एकदाची त्या बाईची खरेदी आटपली आणि जाण्याआधी ती मुलाला जवळ घेत स्वेटर कम जॅकेट घालायचा प्रयत्न करू लागली. मुलगा काही कारणामुळे नकार देऊ लागला. तसे तिची सटकली आणि तिने खाडकन त्याच्या एक मुस्कटात मारली. "मगाशी तुला हे घालायचे होते ना, आता का नाटकं करत आहेस?" पुन्हा ओरडली. मुस्कटात मारलेल्या चापटीचा(?) आवाज खणखणीत आला होता. मी स्वत: या बाबतीत मुलांसाठी सॉफ्ट कॉर्नर बाळगून असल्याने मलाच उगाचच जास्त मारलेले वाटले की काय म्हणून मी दुकानातल्या पोरांचे भाव पाहिले. ते सुद्धा बावरले होते. मगाशी जे हसत त्या मुलाकडे बघत होते ते नजर चोरू लागले. मुलगा रडला नाही, पण हिरमुसला. त्याला या अपमानाची सवय असावी. पण तो देखील आता आमच्यापासून नजर चोरू लागला. बहुतेक त्याचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला गेला होता. वाईट वाटले. जास्त वाईट याचे वाटले की या प्रकारात आपण काही करू शकत नाही किंवा काय करावे हे आपल्याला समजत नाही.
लहान मुलांना मारावे की नाही हा वेगळा विषय झाला. त्यावर कुठे कुठे चर्चा झालीही असेल. त्याबाबत माझे मत जरी मारू नये असे असले तरी ठिक आहे, ज्याचे त्याचे विचार आणि ज्याचा त्याचा दृष्टीकोण. शेवटी आईबाप आहेत, पोरांच्या भल्याचाच विचार करणार. पण हे शिस्त आणि संस्कार लावण्यासाठीचे मारणे घराच्या चार भिंती आड नाही का करता येणार? असे चारचौघात मारल्याने लहान मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जात नसेल का? की लहान मुलांना सेल्फ रिस्पेक्ट असा काही नसतोच??
आज काय करायचे हे मला पटकन सुचले नाही. पण पुढच्यावेळी मात्र मी अश्या आईबापांना नक्की झापणार....
चूभूदेघे,
ऋन्मेष
सुमुक्ता +१. मुलांशी अशा
प्रत्येकालाच सेल्फ रिस्पेक्ट असतो. अगदी छोट्या बाळाला सुद्धा स्ट्रेंजर्सने येऊन गालगुच्चे ओढलेले आवडत असेलच असे नाही, पण ते बोलत नसल्याने त्याला गृहित धरले जाते.
सुमुक्ता +१. मुलांशी अशा बाबतीत बोलायचे असेल तेव्हा गुढघ्यावर बसूनच बोलले पाहिजे. माझ्या मुलाच्या ऑटीझममुळे व्हर्बल कमांड्स फॉलो करणे हे त्याला खूप अवघड जाते. पण त्याच्या लेव्हलला येऊन सांगितल्यास थोडा तरी फरक पडतो.
मारण्याबद्दल विरोधच आहे. पण एखाद वेळेस आई त्रासलेली असते तेव्हा हे होऊ शकते हा बेनिफिट ऑफ डाउट द्यायला हवा. पण ह्याहीपेक्षा जबरी मेथड आहे ती म्हणजे आवाजाचे विविध टोन. तो टोन ऐकू आल्या आल्या मूल चुकीची गोष्ट करणे थांबवेल हे नक्की. बर्याचदा पालक ओरडताना बोलून जातात की असं करू नकोस, मी तुला हे देणार नाही मग. किंवा तत्सम कॉझ/ कॉन्सिक्वेन्सेस.. प्रिव्हिलेजेस काढून घेणे इत्यादी.. ते पालकांकडून पाळले गेले पाहिजे. नाहीतर मुलांना समजते, आई नुसती बोलते, करत काही नाही. तशी चांगलीच मॅनिप्युलेटीव्ह असतात मुलं!
या केसमध्ये तरी मुलाला
या केसमध्ये तरी मुलाला चारचौघात इन्सल्ट होईल असं मारायला नको होतं, असं वाटलं.
पण काही काही मुलं पालकांच्या सेल्फ रिस्पेक्टचा चारचौघात भाजीपाला करून स्वतःला हवं ते साधून घेण्याची ट्रिक शिकलेली असतात; असं वाटतं. अभिनेत्री सरिता जोशींनी सांगितलेलं की त्यांची मोठी मुलगी केतकी हट्ट पुरवला नाही, तर रस्त्यावर सरळ लोळण घ्यायची. तिची मुलगीही तेच करू लागली म्हणे.
अभिनेत्री सरिता जोशींनी
अभिनेत्री सरिता जोशींनी सांगितलेलं की त्यांची मोठी मुलगी केतकी हट्ट पुरवला नाही, तर रस्त्यावर सरळ लोळण घ्यायची. >>> आमच्याकडे कन्या लहान असताना रस्त्यात पाणीपुरी खाण्यासाठी रस्त्यात बसली होती, काही न बोलता पुढे चालू लागले, गुमान पळत मागे आली
परत रस्त्यात अडवले नाही.
अनघा
अनघा
मुलांशी निगोसीएशन करायला
मुलांशी निगोसीएशन करायला आम्ही दोन ऑप्शन्सचा पर्याय वापरतो. पर्याय देताना चित भी मेरी पट भी मेरी असे पर्याय द्यायचे.
उदा. त्याला बाहेर घेऊन कुठेतरी मेन सिटीमध्ये जायचं आहे. पण तो कार मध्ये जाऊया म्हणून हट्ट करत बसलाय तर मी त्याला दोन पर्याय देतो की एक तर बाईक वर जायचं नाहीतर घरी बसायचं. काय करतोस सांग असं विचारल्यावर तो बाईक वर यायला तयार होतोच. कारण घरी बसण्यापेक्षा बाहेर जाणे त्याला नक्कीच आवडणार.
बर्गरचा वगैरे हट्ट केला की एक तर डोसा मिळेल किंवा मग घरी जाऊन जेऊ या असं म्हणलं की तो डोसा खायला तयार होतो. कारण मुळात त्याला बर्गर खायची हौस असण्यापेक्षा घरच्या चवी पेक्षा वेगळं काहीतरी खायचं आहे ते पण हॉटेल मध्ये.
अजून लहान असल्यामुळे त्याला ही ट्रिक कळत नाहीये की आम्ही फक्त आमच्या सोयीचेच पर्याय त्याला देतोय, तो आपला त्याला काहीतरी मिळालंय म्हणूनच खुष होतो.
मोठा झाल्यावर काहीतरी वेगळी ट्रिक शोधावी लागेल.
इथे त्या आईला सरळ सांगता आले असते की दोन पर्याय आहेत, एक तर हे जॅकेट घाल आणि गाडीवर चल किंवा मग चालत घरी जाऊ या/ इथेच बसू या वगैरे..... अर्थात हे करायला ती स्वतः त्या मनस्थितीत नसेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याची चिडचिड मुलावर निघाली असेल, तर भाग वेगळा. हे आपल्यासारख्या तिर्हाईत व्यक्तीला कसे माहीत असणार?
काचेच्या कपटाकडे जाणे, दंगा
काचेच्या कपटाकडे जाणे, दंगा करणे, पळापळ करणे, ओरडणे वगैरे क्षुल्लक गोष्टींकडे आम्ही लक्षच देत नाही. मुलं हे सगळं करणार नाहीतर कोण करणार?
बाहेरच्याना मारणं, ओरडणं,
बाहेरच्याना मारणं, ओरडणं, कंट्रोल करणं दिसतं पण ही देवाघरची फुलं कधीकधी कसा देव आठवायला लावतात ते दिसत नाही
सेल्फ रिस्पेक्ट ही संस्कारित
सेल्फ रिस्पेक्ट ही संस्कारित भावना आहे असे मला वाटते. त्याची बीजे कदाचित लहान मुलापाशी असतीलही. पण ती खुलवल्या शिवाय त्याचा औपचारिक सेल्फ रिस्पेक्टमध्ये अविष्कार होऊ शकणार नाही. गालगुच्चे न आवडणे याला सेल्फ रिस्पेक्ट मानणे बरोबर वाटत नाही. इतरांकडून रिस्पेक्ट मिळायची सवय असणाऱ्यांनाच सेल्फ रिस्पेक्ट असू शकतो. मुलांमध्ये मोठेपणी जर आत्मसन्मान असावा अशी इच्छा असेल तर लहानपणा पासून तशी मशागत करायला लागते.
असतो तर. सेल्फ रिस्पेक्ट
असतो तर. सेल्फ रिस्पेक्ट प्राण्यांना पण असतो तर माणसात/ लहान मुलात का नसावा? पण काही जण त्याचा गैरफायदा पण घेतात. मी ९ वी मध्ये असतांना माझ्या हट्टी पणाबद्दल माझ्या आई बाबांनी माझ्या सायन्सच्या सरांना सांगीतले होते. त्या काळात शिक्षक लोक हे घरच्या सारखेच मानले जायचे म्हणून. पण सरांनी क्लास मध्ये टोमणे मारुन नकोसे केले होते. सर शिकवण्यात वाघ होते, पण बोलायला अतीशय खवचट. त्याचा मला मानसीक त्रास झालाच.
आताची पिढी तर एकदम सुपर फास्ट. आमच्या इथली लहान मुले पार एकमेकांची अक्कल काढुन बोलतात. त्यात आई वडील पण सामिल. माझ्या मुलीने, वय वर्षे ११ बाहेर खेळणेच सोडलेय. मुल चूकीचे वागत असेल तर पाठीत धपाटा घालणे एकवेळ ठीक, पण काही पालक फारच हिंसक असतात. ते मुलाला डोक्यात/ गालावर / कानशीलावर पण मारतात. माझ्या नात्यातल्या एका स्त्रीने तिच्या मुलाला डोक्याच्या मागच्या भागावर इतके जोरात मारले की आम्ही पाहुन चिडलो. कारण बराच वेळ त्याला दुखत होते. उगाच मेंदूवर फटका बसला असता म्हणजे! बरं या बाईसाहेब नाजुक नाही तर एकदम आडदांड आहेत शरीराने. कुठे कसे वागावे हे आधी पालकांनाच शिकवले पाहीजे, म्हणजे मुले पण आपोआप शिकतील.
हिमांशू +१
हिमांशू +१
लेख बर्यापैकी आवडला.
लेख बर्यापैकी आवडला.
माझ्या भाच्याच्या बाबतीत मी स्वतः अनुभवलेला किस्सा सांगतो:
तो माझ्या गावी उन्हाळ्याच्या सुट्टीत राहण्यासाठी आलेला. वय वर्षे ७. १०- १५ दिवस मस्त मजेत राहिला. अचानक त्याच्या आईचे आणि मामीचे थोडेसे वाजले म्हणून त्याची आई त्याला फोन करून म्हटली की 'बास झाली सुट्टी. उद्द्याच्या उद्या घरी ये'. त्याच्या मोठ्या बहिणीने हे त्याला सांगीतले. तेव्हा तो जे म्हणाला ते ऐकूण मला त्याच्या तोंडून नित्शे, रॉबर्ट नॉझिक, फ्रेडरिक हायेक असलं कुणीतरी बोलल्याचा भास झाला.तो म्हटला "ती कोण मला ये म्हणून सांगणारी? ही बॉडी माझी आहे, तिचा काय संबंध? माझ्या बॉडीचं काय करायचं हे मी ठरवणार. आई असली म्हणून काय झालं?" आणि हे उगाच मोठ्यांचं ऐकूण काही पोरटे करतात तसल्या ल्हाचारपणे नाही बरं का एकदम जेन्युईनली आणि कन्व्हिक्शनने. या शब्दात काडीमात्र फरक केलेला नाही. तेव्हा मला या पिढीतील अतीप्रचंड स्वाभिमान, स्वतःची डिग्नीटी, स्वत्व याविषयीची जाणीव याची कल्पना आली.
सारांशः आजच्या पिढीतील लहानग्यांना सेल्फ रिस्पेक्ट आहे/ असतो आणी ते चांगलंय.
असतो ना मुलांना सेल्फ
असतो ना मुलांना सेल्फ रिस्पेक्ट पण काही वेळा पर्याय नसतो . मुलं प्रचंड नाठाळ असतात ऐकतच नाहीत . बर तुम्ही सांगितलेल्या प्रसंगात तो सारखा काचेच्या कपाटाजवळ जात होता . आईला वाटलं असेल त्याच्या हातून काही तोड फोड होणार नाही ना . आपण सुद्धा सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर मुलांना ओरडतोच कि याला हात लावू नको . त्याला हात लावू नको . उद्या काच बीच फुटली / शोकेसमधली औषध फुटली तर आईच्याच डोक्याला ताप नाही का ? पालक रागावले नाही तरी पब्लिक बोलतच . तो /ती किती उलाढाल्या करतोय पण आई - वडील काहीच रागावत नाहीत ? दोन्ही साईड ने पब्लिक बोलणारच आणि बोलतातच रागावले तरी /नाही रागावले तरी . मारलं तरी /नाही मारलं तरी .पालकांनी काय करावं ?
इथे राजासीचाही मुद्दा पटतोच आहे << ती बाई औषधे घ्यायला आली होती, रात्री दहाच्या पुढे - मुलासोबत . म्हणजे घरात कोणीतरी आजारी आहे आणि तिला कोणतीही physical support सिस्टिम (मूल कोणाकडे ठेवेल, कोणीतरी मूल बघेल) असं कोणी त्या क्षणी नाही. घरांत आजारपण चाललेले असेल तर मनःस्थिती पण ठिक नसते.>> शेवटी आई - मुलात कसला आलाय सेल्फ रिस्पेक्ट . आम्ही बहिणी तर लहानपणी आई जास्त आवडते असं सांगायचो आणि कारण काय तर ती आम्हाला मारते म्हणून आवडते . वडील म्हणजे अंगाला बोट सुद्धा लावणार नाहीत . ते पण लहान असताना आवडायचं नाही निदान मला तरी. मुलांना पण पालकांनी (आईने) मारलं तरी कळत कुठल्या कारणाकरता मारलाय ते आणि आपली काय चूक झालेय ते
मुलांना पण पालकांनी (आईने)
मुलांना पण पालकांनी (आईने) मारलं तरी कळत कुठल्या कारणाकरता मारलाय ते आणि आपली काय चूक झालेय ते
>>>>>>
हे खूप ईंटरेस्टींग आहे, मुलांना मारल्यावर कळते कुठल्या कारणासाठी मारलेय. पण त्याच समजूतदार मुलांना समजावून सांगितल्यावर कळत नाही
मी आधीच एका प्रतिसादात
मी आधीच एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे क्वचितप्रसंगी एखादा फटका अथवा ओरडा 'काही मुलांना' शिस्त लावण्यासाठी आवश्यक असतोच. लहान मुलांनी मस्ती करणे स्वाभाविक जरी असले तरी काही मुले अफाट असतात. माझा स्वतःचा भाचा लहानपणी एखाद्या गोष्टीचा हट्ट करून रस्त्यावरच थयथयाट करून बसायचा. एकदा त्याची ही खोड मोडायला त्याकडे दुर्लक्ष करुन त्याचे आई बाबा थोडे नजरेआड झाले, या आशेने की येईल पळत हट्ट सोडून. पण पठ्ठ्याने स्वतः उठून त्याला पाहिजे ती वस्तू त्या दुकानातून उचलून चलायला लागला. आता दुकानदाराने त्याला थांबवून विचारणा केल्यावर त्याच्या आई-बाबांना मध्यस्ती करुन एक फटका ठेवून देण्यावाचून काहीच गत्यंतर नव्हते. आता यात कोण करत बसेल सेल्फ रिस्पेक्ट चा विचार?
मुलाने आईबाबापेक्षा जास्त
मुलाने आईबाबापेक्षा जास्त स्मार्टनेस दाखवला की बिचारे मार खाते
मुलांना आत्मसन्मान असतो
मुलांना आत्मसन्मान असतो
आत्मसन्मानाला ठेच मार न खाता उदा. 'बॅड बॉय / बॅड गर्ल' वगैरे बोलल्यामुळे देखिल लागू शकते.
आणि ती ठेच लागू नये म्हणून मुले नीट (?) वागण्याची शक्यता असते.
म्हणून मग 'देऊ का मार ?' 'मी कट्टी घेईन' अशा धमक्या द्याव्या लागतात. काही जणांचा आत्मसन्मान दुखावला जायला नुसते बोलले तरी पुरते
काही जण हिंदी मधल्या लाथोंके भूत बातोंसे नही मानते ह्या प्रकारातच मोडतात. काही जण हळू हळू बेरड / कोडगे बनत
त्या पातळीवर पोचतात.
हे खूप ईंटरेस्टींग आहे,
हे खूप ईंटरेस्टींग आहे, मुलांना मारल्यावर कळते कुठल्या कारणासाठी मारलेय. पण त्याच समजूतदार मुलांना समजावून सांगितल्यावर कळत नाही.>>>>>हे अगदी खरे आहे ऋन्मेष.माझ्या ८वर्ष्याच्या भाच्याला नखे खायची सवय लागली होती.खुपदा प्रेमाने समजावून सांगून झाले भीति पण दाखवून झाली मात्र काहीच फरक नाही शेवटी हात तोंडात गेला की जो कुणी बघेल त्याने जोरात चापट मारायची हातावर असे ठरले आणि अमलात आणल्यापासून मोजून ३ऱ्या दिवशी नंतर नखे खाल्लेली दिसली नाहीत
नखे खायची सवय आपोआप जाते..
नखे खायची सवय आपोआप जाते.. जबरदस्ती करु नाही.. न्युनगंडाने काही वेळा लागते.. कुठेतरी वाट मिळाली पाहिजे.. सांगत रहाव, पण चापट देउ न्ये नखे कुरतड्ली तर.. कोणी खात नसते.. दाताने तोडून फेकली जातात.. मी, माझी बहिण, आतेभाउ, चुलतबहिण एकदा असेच सग्ळेच सुटीत गोष्टीची पुस्तके वाचत बसलेलो असताना सहज पाहिले, तर सगळेच (हे एक आश्चर्यच) नखे कुरतडत, वाचत बसले होते..
"ती कोण मला ये म्हणून
"ती कोण मला ये म्हणून सांगणारी? ही बॉडी माझी आहे, तिचा काय संबंध? माझ्या बॉडीचं काय करायचं हे मी ठरवणार. आई असली म्हणून काय झालं?" >>
मुलगा हे असं बोललाय हे आईला कळल्यावर बुकललं नाही का तिने त्याच्या बाॅडीला???
"ती कोण मला ये म्हणून
"ती कोण मला ये म्हणून सांगणारी? ही बॉडी माझी आहे, तिचा काय संबंध? माझ्या बॉडीचं काय करायचं हे मी ठरवणार. आई असली म्हणून काय झालं?" >>
साॅरी पण अगदी राहावलेच नाही.
मुलगा हे असं बोललाय हे आईला कळल्यावर बुकललं नाही का तिने त्याच्या बाॅडीला???>>>
निधी actually मला पण हसायला
निधी actually मला पण हसायला आलं, पण विषय वेगळा म्हणून नाही टाकली स्मायली
हर्पेन, सहमत आहे. वर मी
हर्पेन, सहमत आहे. वर मी सुद्धा लिहिले आहे. मार देणे यानेच सेल्फ रिस्पेक्ट दुखावतो असे नाही. तसेच प्रत्येक मार हा देखील सेल्फ रिस्पेक्ट दुखावणारा असतो असे नाही.
माझ्या आईने क्वचित का होईना मला मारले आहे त्याने माझा सेल्फ रिस्पेक्ट कधीच दुखावला नाही. माझ्या वडिलांनी मला एखाद दुसरे वेळा चारचौघात ओरडले आहे त्याने मात्र दुखावला. हे त्यांच्याही लक्षात आल्याने पुन्हा ते तसे वागले नाहीत
वर आदू यांनी नखं खायची सवय सोडवायला चापटी मारायचा उपाय लिहिला आहे त्यातही सेल्फ रिस्पेक्ट दुखावला जाईल असे गरजेचे नसते. बरेचदा ओरडताना तुमच्या आवाजाचा टोन आणि मारतानाची तुमची बॉडी लॅगवेज फार महत्वाची ठरते.
नखे खायची न्युनगंडाने काही वेळा लागते >>>>>> सचिन तेंडुलकरलाही मैदानात नखे खायची सवय होती
नखे खायची सवय आपोआप जाते..
नखे खायची सवय आपोआप जाते.. जबरदस्ती करु नाही.>>>माझ्या २मैत्रिणींची अशी सवय अजूनही गेली नाहिये आणि खुप छान कॉन्फिडेंट सुद्धा आहेत त्यात( म्हंजे न्यूनगंड पण नाही कोणतच) so आपोआप जातेच असे नाही काही वेळा पालकनि लक्ष्य घालणे आवश्यक असते
Rule of thumb म्हणून खालचा
Rule of thumb म्हणून खालचा संस्कृत श्लोक follow केला तर parents / kids should be alright
लालयेत् पञ्च वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् / प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत् //]
Indulge a child for the first five years of his life, for the next ten years deal firmly with the child. Once the child is sixteen, treat him as a friend.
वरच्या उदाहरणातला मुलगा मार खाण्याच्या वयाचा आहे त्यामुळे आई बरोबर
हो पण मारायचीही पद्धत असते.
हो पण मारायचीही पद्धत असते. कसे, कुठे, किती मारावे याचे तारतम्य हवे.
मुस्कटात मारणे आणि पाठीवर धपाटा देणे यात फरक आहे.
तसे आणखी बरेच संस्कृत श्लोक आहेत. त्यातला एखादा आपल्यालाही लागू पडत असेल आणि तो फॉलो केला गेला तर कसे वाटेल, याचाही विचार करायला हवा.
Submitted by अतरंगी on 22
Submitted by अतरंगी on 22 November, 2017 - 13:02<<++१
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट
शेफारलेल्या, ऑल्मोस्ट अँटीसोशल वागणार्या दिवट्यांना अधूनमधून मुस्कटात दिलीच पाहिजे असे माझे सरळ मत आहे. एक खणखणीत बसली की लहान असो वा मोठे. दिवटे ठिकाणावर येतात अन राहतात. पनिशमेंट हा फर्स्ट चॉईसने करायचा उपचार नसला, तरी शिकण्याच्या क्रीयेतला महत्वाचा व अंगभूत भाग आहे.*
* शिक्षा, ही कुणी "केली"च पाहीजे असे नसते. आपल्या चुकीने आपल्याला जे शारिरिक नुकसान होते तीही शिक्षाच आहे. उदा. समोर दिसणार्या इलेक्ट्रिक सॉकेटमधे खिळा घालू नको, हे नीट सांगून समजत नसेल, तर पुढची पनिशमेंट २ प्रकारे होऊ शकते. १. विजेचा झटका बसणे. २. बापाच्या हातची कानाखाली बसणे. यातली क्र.२ जीवघेणी ठरण्याची शक्यता विजेच्या झटक्याच्या तुलनेत किती, त्याचा हिशोब ज्यानेत्याने आपण आपला करून घेणे.
अन शिक्षा करणे मान्यच नसणार्या, मुलांना फक्त समजवून सांगणार्या सगळ्या चाईल्ड सायकॉलॉजिस्ट लोकांना नम्र विनंती, की त्यांनी ( गोराक्षस, गोतस्कर, तमाम म्लेंछगण, अतिरेकी, चोर, दरवडेखोर इ. लोकां(साठी)च्या शिक्षा बंद करून, इंडियन पीनलकोडमधे उदा. चोरी केल्यास चोरी न करण्याबद्दल ७८ तास समुपदेशन. खून केल्यास, खून करणे कसे वाईट, ते वर्षभर समजवून सांगणे, इ. शिक्षा ठरवून टाकाव्या!
कधी कधी एक्सपिरन्समधून माणूस,
कधी कधी एक्सपिरन्समधून माणूस, आपण पुढे कसं वागावं हे शिकतो. मी आईचा प्रचंड मार खाल्लेली आणि बाबांनी एकही चापट न लगावलेली मुलगी असल्याने मी माझ्या मुलाला मार देणं टाळते. हे जनरल लिहीलंय, सर्वच वाचून.
मी शिक्षा केलीच पाहिजे असे
मी शिक्षा केलीच पाहिजे असे म्हणतो, याचा अर्थ उठता लाथ, बसता बुक्की अशी ट्रीटमेंट द्यायला हवी असे माझे मत नव्हे. मी स्वतः आजपर्यंत फक्त १-२-३ असे आकडे मोजण्यावरच थांबलेलो आहे.
पण असे अनेक नमुने पाहिले आहेत, की अगदी हात शिवशिवतात.. फक्त दिवट्यांना नाही, तर त्यांच्या बेजबाबदार आईबापांनाच खणकवावेसे वाटते.
ओहह मी तुमच्या एकट्याच्या
ओहह मी तुमच्या एकट्याच्या कमेंटवर नाही लिहीली, सर्व वाचून जनरल आहे ते. थांबा मी नीट तसं लिहीते वर.
Pages