माझा विरंगुळा ( भरतकाम )

Submitted by मनीमोहोर on 20 November, 2017 - 15:00

भरतकाम - शिवणकामाची मला लहानपणापासूनच फार आवड. शाळेत असताना आम्हाला होतं शिवणकाम आणि भरतकाम . मी अगदी हौसेने आणि मन लावून ते करत असे. भरतकामाचे माझे नमुने शाळेच्या नोटीस बोर्ड वर ही लावले जात असत. पण हे सगळं फक्त सातवी आठवी पर्यंतच. नंतर नव्हते हे विषय शाळेत.
त्याकाळी म्हणजे पन्नास एक वर्षापूर्वी हे चित्र नसे घरोघरी पण आमच्या घरी मात्र वडिलांना मुलींनी शिवणकाम, भरतकाम वैगेरे केलेले आवडत नसे. आम्हाला घरकाम ही ते करू देत नसत. त्यांचा शिक्षणावर जास्त भर होता. घरकाम, स्वयंपाक किंवा शिवणकाम वैगेरे आयुष्यात नंतर केव्हाही करता येईल. आत्ता तुमच अभ्यास करण्याचं वय आहे तेव्हा चांगला अभ्यास करा, भरपूर वाचन करा , असं ते आम्हाला सांगत असत. मी जर दुसऱ्या कुठल्या घरात जन्माला आले असते तर मॅट्रिक नंतर शिवणाचा कोर्स करून शिवण टीचर झाले असते . कारण तेव्हा शिवणामध्ये टीचर सोडून दुसरा काही ऑप्शन असतो हे आम्हाला माहिती पण नव्हतं. पण तसं घडायचं नव्हतं . ते स्वतः शिकलेले होतेच आणि शिक्षणाचा त्यांनी जणू ध्यासच घेतला होता. म्हणून आम्हा सगळ्या भावंडांना त्यांनी पदव्युत्तर पर्यंतच शिक्षण तर दिलचं पण इतर अनेकांना ही त्यांनी शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. आम्ही लहान गावात राहायचो म्हणून कॉलेज शिक्षणासाठी फार ऐपत नसताना ही आम्हाला त्यांनी हॉस्टेल वर ठेवलं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी शिवण टीचर काही होऊ शकले नाही.

नंतर घर नोकरी ह्यात शिवणाची आवड पुरवायला वेळच मिळाला नाही . आता निवृत्तीनंतर वेळ आहे म्हणून ह्या आवडीने परत उचल खाल्ली . शिवणकाम करणं आता नाही जमणार पण भरतकाम जमू शकेल ह्या विचाराने छोटी छोटी प्लेन झबली विकत आणली, भरतकामाची लाकडी रिंग, लहान सुया , रेशीम हे ही विकत आणलं आणि झबल्यांवर थोडं थोडं भरतकाम करायचं ठरवलं. खूप वर्षांची गॅप पडल्यामुळे येईल की नाही असं वाटत होतं आणि टाके कोणते कसे वैगेरे पण विसरायला झालं होतं. पण नेट मदतीला धावून आलं. सगळं online मिळालं. अगदी छाप सुद्धा . थोडंसं भरतकाम केल्यावर ती झबली जास्त छान दिसू लागली . आणि स्वतः काही केल्याचं समाधान ही मिळालं.

हे मी केलेले काही नमुने .
1)
IMG_20170107_151918082.jpg

2)
IMG_20170118_223149.jpg

3)

IMG_20170103_234534.jpg

4)
IMG_20161226_001604.jpg

5)
IMG_20170717_191001439.jpg

6)
IMG_20170703_244458096.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, दक्षिणा, चिन्नू धन्यवाद.

हे माझं अगदीच छोटसं काम मी मायबोलीमुळे चार लोकांना दाखवू शकले म्हणून मायबोली चे ही खूप खूप आभार.

खूप छान ममो.दुसर्‍या क्रमांकातल्या झबल्याला तिरकी टीप घातलीत का?
शक्य झाल्यास प्रत्येक फोटोतल्या टाक्याचे नाव लिहाल का.

अदिति, देवकी धन्यवाद.

देवकी, ससा आणि चिमणी साखळी टाक्याने भरले आहे. फुलपाखरू उलट्या टीपेने .

5 नं ची फुलं एका छोट्या गोलाच्या मध्यातून सुरू होणाऱ्या बटनहोल टाक्याने काढली आहेत. 6 नं ची आणि सश्याच्या बाजूची फुलं अळीच्या टाक्याने भरली आहेत.

दोन नं ची तिरपी बॉर्डर तीन पदरी रेशीम घेऊन गव्हाच्या टाक्याने केली आहे. 4 ची बाही Y स्टीच ने भरली आहे आणि 6 ची बॉर्डर शिलाई च्या पांढऱ्या धाग्यावर रेशीम एकदा वरून आणि एकदा खालून फिरवून केली आहे .

Pages