काही मराठी वाक्ये

Posted
11 months ago
शेवटचा प्रतिसाद
11 months ago
Time to
read
<1’

खालील मराठी वाक्ये वाकप्रचार बरोबर आहेत का

१)आज त्याने वामकुक्षी उजव्या कुशीवर घेतली

२) हे माझे स्वता:चे वैयक्तिक मत आहे

३) त्याचा रागाचा मरक्यूरी चढला पण तो मसूर गिलून गप्प बसला

४) आज मला खुप घाई (ची) लागली मग मी अठरा रूपयाची रिक्षा करून धावत आलो

५) नागपुर मध्ये हया वर्षी गम्मत झाली मुलांपेक्षा मुलींचीच लग्न जास्त झाली

६) मला अभ्यासाला वेळ नाही त्यामुळे मी अभ्यास न करता सरळ उजळणी च करतो

७) पूर्वी च्या काळी मूली स्वयंवर करायच्या तसे मुले स्वयंवध करायची का ?

८) मला जेवणा नंतर मुखशुद्धि लागते ती मात्र अगदी पोटभर

९) आज लोकल गाड्या वेळेवर धावत होत्या अगदीच रुळावर आल्या म्हणायच्या

१०) वाऱ्याने माझ्या तीन काडया विझल्या मग त्याने सरळ पाचवी काडी पेटवली ती मात्र लगेच पेटली

केदार साखरदांडे

विषय: 
प्रकार: 

हा हा हा हा... ही वाक्ये कुठे वाचली/ऐकली आहेत कि सुचली आहेत केदार१२३ Happy
माझी मते खाली देत आहे. जाणकार काही चुका असतील तर सुचवतीलच. Happy

१)आज त्याने वामकुक्षी उजव्या कुशीवर घेतली -
वामकुक्षी ही डाव्या कुशीवरच जाते, उजव्या नाही आणि त्या मागे शास्त्रीय कारण आहे. वामकुक्षी म्हणजे झोप नव्हे. अन्यथा मी रात्रभर वामकुक्षी घेतली असेही

२) हे माझे स्वता:चे वैयक्तिक मत आहे - द्विरुक्ती आहे.

३) त्याचा रागाचा मरक्यूरी चढला पण तो मसूर गिलून गप्प बसला - मसूर कि मूग? Happy

४) आज मला खुप घाई (ची) लागली मग मी अठरा रूपयाची रिक्षा करून धावत आलो - खर तर असा म्हटलं तर चालेल...

५) नागपुर मध्ये हया वर्षी गम्मत झाली मुलांपेक्षा मुलींचीच लग्न जास्त झाली - कोणत्या निकषावर.. नागपुरात किती मुलं किती मुली?

६) मला अभ्यासाला वेळ नाही त्यामुळे मी अभ्यास न करता सरळ उजळणी च करतो - अभ्यास = सराव = उजळणी

७) पूर्वी च्या काळी मूली स्वयंवर करायच्या तसे मुले स्वयंवध करायची का ? - स्वयंवध? म्हणजे?

८) मला जेवणा नंतर मुखशुद्धि लागते ती मात्र अगदी पोटभर - पोटभर म्हणजे खूप अश्या अर्थाने बरोबर.

९) आज लोकल गाड्या वेळेवर धावत होत्या अगदीच रुळावर आल्या म्हणायच्या - हो.

१०) वाऱ्याने माझ्या तीन काडया विझल्या मग त्याने सरळ पाचवी काडी पेटवली ती मात्र लगेच पेटली - तांत्रिक दृष्ट्या हे बरोबर आहे. काड्याना क्रमांक दिले असतील तर.