दीक्षितांचं राज्य

Submitted by अविनाश जोशी on 16 November, 2017 - 00:31

दीक्षितांचं राज्य
इंदोर च्या पाण्यात काय विशेष आहे माहित नाही. ओकानंतर आता राजे सुयश दीक्षित. इंदोर चा तरुण संगणक अभियंता.
१. बाजीरावने अटकेपार झेंडे लावले तर सुयशनी इजिप्त आणि सुदान पलीकडे जाऊन झेंडा रोवला.
२. इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर कुणाचाच नसलेला बीर तवील नावाचा २००० स्केवर किलोमीटरचा उजाड प्रदेश आहे. सुयश दोन्ही बाजूंच्या सैन्यांना चुकवून ७ नोव्हेंबर त्या प्रदेशात गेला आणि त्यांनी तिथे झेंडा रोवला.
३. त्या प्रदेशाला त्याने दीक्षितांचे राज्य (Kingdom of Dixit ) म्हणून घोषित केले आणि अर्थातच स्वतःला त्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित केले
४. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे जागेवर हक्क सांगितल्यावर तिथे शेती करणे जरूर असते (त्याचे म्हणणे) त्या करिता तेथे त्यांनी दोन बिया पेरल्या आणि पाणी घातले.
५. त्याला तिथे दोन पाली किंवा सरडे दिसल्या त्यांना राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
६. दीक्षित राज्याच्या घटनेत राजा बरोबर राष्ट्रपती पद पण आहे ते त्याने आपल्या वडिलांना बहाल केले आहे.
७. युनो ची मेम्बरशिप मिळावी म्हणून तो अर्ज करणार आहे.
८. त्याचा दावा कृतपत टिकेल याविषयी संशय आहे कारण कुठल्याही प्रदेशावर दावा दुसरे सार्वभौम राष्ट्रच करू शकते असा आंतराष्ट्रीय संकेत आहे.
९. त्याचा दावा खरा आहे त्यालाही काही पुरावा नाही
१०. या पूर्वीही त्या जागेवर असे दावे झालेले आहेत. सुयश च्या म्हणण्याप्रमाणे जर ती लोक परत आली तर युद्ध होऊ शकेल.
११. जून २०१४ मध्ये एका अमेरिकन शेतकऱ्याने तिथे जाऊन हक्क सांगितला होता Jeremiah Heaton असे त्याचे नाव त्याच्या ६ वर्षाच्या मुलीला खरी राजकन्या व्हायचे होते त्याने बीर तावील चे नाव किंग्डम ऑफ नॉर्थ सुदान असे ठेऊन स्वतःला राजा आणि मुलीला राजकन्या घोषित केले होते.
१२. अजूनही काही दावे त्या जागेवर आहेत
१३. सुयशने लोकांनी KoD चे नागरिकत्व घावे असे आव्हान केले आहे.
बघा कुणाला इंटरेस्ट असला तर ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिम्बा, वीजपाणी कशाला तोडायला हवं? सेडिशन लॉ लावून आत टाका. फारतर ॠचं खरं नाव 'हबि शेख' आहे, त्याला ४ बायका नाहीतर गफ्रे आहेत, स्वतंत्र देश बनवून तिथे बाँब बनवून भारतावर हल्ला करण्याचा त्याचा कट आहे, वगैरे मेसेजेस सोशल मीडियातून फिरवा. हाकानाका. Proud

दहशतवादी घोषित केले की खेळ खल्लास का आमचा.. आम्ही लढू त्याविरुद्ध.. खुद्द भारतात मानवतावाद्यांची एक मोठी टीम उतरेल आमच्या सपोर्टला.. तिथे खरोखर दहशतबादी कारवाई करणारया कसाबला त्यांनी एवढे वर्षे पोसले, आम्ही तर मूळातच निर्दोष आहोत.

<<बाजीरावने अटकेपार झेंडे लावले तर सुयशनी इजिप्त आणि सुदान पलीकडे जाऊन झेंडा रोवला.>>
-------- अटकेपार झेन्डा राघोबान्नी लावला होता असे इतिहासात वाचले आहे.

उदय धन्यवाद !!
28 एप्रिल 1757 रोजी रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्‍वात थोरले तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे यांनी अत्‍यंत खडतर प्रवास करून आताच्‍या पाकिस्‍तानात असलेला अटकेला किल्‍ला जिंकला. त्‍यातून 'अटकेपार झेंडे' ही मन प्रचलित झाली.
नेमके कुठे आहे अटक ?
हे शहर पाकव्‍याप्‍त पंजाब प्रांतांतील तालुक्‍याचे ठिकाण आहे. येथे नॉर्थ वेस्टर्न रेल्‍वचे स्टेशन असून, येथील सिंधूनदीच्या काठावर अटकचा किल्ला आहे. पूर्वीच्‍या काळी ही नदी पार करून किल्‍ल्‍यावर पोहोचणे अत्‍यंत अवघड होते. परंतु, मराठ्यांनी हा किल्‍ला जिंकला.

सात हजार पुस्तके लायब्ररीत असलेली अभ्यासू आणि व्यासंगी व्यक्ती दैनिक भास्करमधून जसेच्या तसे कॉपी पेस्ट करते तेव्हा आश्चर्य वाटते. असो.

What is wrong with taking refer from anywhere?
नवीन Submitted by अविनाश जोशी on 17 November, 2017 - 13:01

>> हाच प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा होता, जेव्हा इतरांवर गुगल करण्याबद्दल शेरेबाजी केली होती.

दुसरे असे की, दुसरीकडून रेफरन्स घेण्याबद्दल काहीच आक्षेप नसतो. घ्यावाच लागतो. फक्त तो रेफरन्स नीट तपासून योग्य आहे की नाही याची शहानिशा करावी लागते. यु कान्ट जस्ट कॉपि पेस्ट फ्रॉम anywhere अ‍ॅन्ड कॉल इट अ‍ॅज अ रेफरन्स.

इतरांवर गुगल करण्याबद्दल शेरेबाजी केली ???
कधी , जरा सन्दर्भ द्याल का ?
खरे म्हण्जे अटक बद्दल माझ थोड confusion झाल.
Few days back this town was referred in Delhi smog. I was puzzled and hence search
Of course original blunder of Bajirao was entirely mine. Excuse for english. but writing Marathi in this software is very difficult for me. I use Google API for Marathi, which is much simpler

इयत्ता दहावीपर्यंत च्या इतिहासात हे सर्व शिकवले जाते. सगळ्यांनाच बाजीरावची दिल्ली धडक आणि राघोबांची अटकेपार मोहिम ठसठशीत ठावूक असते. बेसिक आहे हे. दोन अधिक दोन चार इतके.

आयुष्यात पहिल्यांदाच बाजीरावला अटकेपार पोचवणारे तुम्हीच पहिले अभ्यासू भेटला आहात. ज्यासाठी तुम्हाला दिव्यभास्कर सारख्या कचरा देणार्‍या वेबसाईटचा आधार घ्यावा लागला. असो.

इतरांवर गुगल करण्याबद्दल शेरेबाजी केली ???
कधी , जरा सन्दर्भ द्याल का ?

>> जिथे तुमच्याकडे सात हजार पुस्तकांच्या लायब्ररी असल्याची जाहिरात केली आहे तिथेच शोधा, सापडेल.

आधी कोणीही जिथे पोहोचलेले नाही अशा निर्जन आणि महासागरात अतिशय दूरवर असलेल्या बेटांवर खलाशी पोहोचल्याच्या घटना इतिहासात घडलेल्या आहेत. जेंव्हा जेंव्हा असे होते तेंव्हा ते खलाशी ज्या देशाचे आहेत तो देश त्या बेटांवर अधिकार सांगतो. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अशा भूभागावर मालकीहक्क सांगता येत नाही. तिथे एखादा देशच आपले मालकीहक्क सांगू शकतो.

२०१४ मध्ये जेंव्हा याच भूभागावर एका अमेरिकन व्यक्तीने अगदी असाच दावा केला होता तेंव्हा यावर बराच काथ्याकुट झाला होता. इच्छुकांनी इथे वाचा.

कमॉन, एक चार्म म्हणून पण काही चीज असते. >> आजकाल पोरही चार्म् शोधुन राह्यली हिरोंमध्ये स्वप्निल च काही खर नाही. Happy

कमॉन, एक चार्म म्हणून पण काही चीज असते.....ई! स्वनिल आणि चार्म, उंहू. >> हा हा हा. स्वप्नील ला काहि जण थालीपीठ म्हणतात, खरे आहे का ?

स्वप्नील रात्रभर भिजून फुगलेला राजमा आहे आणि सुबोध रात्रभर भिजून फुगलेला काबुली चना..

Pages