दीक्षितांचं राज्य

Submitted by अविनाश जोशी on 16 November, 2017 - 00:31

दीक्षितांचं राज्य
इंदोर च्या पाण्यात काय विशेष आहे माहित नाही. ओकानंतर आता राजे सुयश दीक्षित. इंदोर चा तरुण संगणक अभियंता.
१. बाजीरावने अटकेपार झेंडे लावले तर सुयशनी इजिप्त आणि सुदान पलीकडे जाऊन झेंडा रोवला.
२. इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर कुणाचाच नसलेला बीर तवील नावाचा २००० स्केवर किलोमीटरचा उजाड प्रदेश आहे. सुयश दोन्ही बाजूंच्या सैन्यांना चुकवून ७ नोव्हेंबर त्या प्रदेशात गेला आणि त्यांनी तिथे झेंडा रोवला.
३. त्या प्रदेशाला त्याने दीक्षितांचे राज्य (Kingdom of Dixit ) म्हणून घोषित केले आणि अर्थातच स्वतःला त्या प्रदेशाचा राजा म्हणून घोषित केले
४. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे जागेवर हक्क सांगितल्यावर तिथे शेती करणे जरूर असते (त्याचे म्हणणे) त्या करिता तेथे त्यांनी दोन बिया पेरल्या आणि पाणी घातले.
५. त्याला तिथे दोन पाली किंवा सरडे दिसल्या त्यांना राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात आले.
६. दीक्षित राज्याच्या घटनेत राजा बरोबर राष्ट्रपती पद पण आहे ते त्याने आपल्या वडिलांना बहाल केले आहे.
७. युनो ची मेम्बरशिप मिळावी म्हणून तो अर्ज करणार आहे.
८. त्याचा दावा कृतपत टिकेल याविषयी संशय आहे कारण कुठल्याही प्रदेशावर दावा दुसरे सार्वभौम राष्ट्रच करू शकते असा आंतराष्ट्रीय संकेत आहे.
९. त्याचा दावा खरा आहे त्यालाही काही पुरावा नाही
१०. या पूर्वीही त्या जागेवर असे दावे झालेले आहेत. सुयश च्या म्हणण्याप्रमाणे जर ती लोक परत आली तर युद्ध होऊ शकेल.
११. जून २०१४ मध्ये एका अमेरिकन शेतकऱ्याने तिथे जाऊन हक्क सांगितला होता Jeremiah Heaton असे त्याचे नाव त्याच्या ६ वर्षाच्या मुलीला खरी राजकन्या व्हायचे होते त्याने बीर तावील चे नाव किंग्डम ऑफ नॉर्थ सुदान असे ठेऊन स्वतःला राजा आणि मुलीला राजकन्या घोषित केले होते.
१२. अजूनही काही दावे त्या जागेवर आहेत
१३. सुयशने लोकांनी KoD चे नागरिकत्व घावे असे आव्हान केले आहे.
बघा कुणाला इंटरेस्ट असला तर ....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधुरी दीक्षित ला ब्रँड बनवावे..

चला अति शहाण्यांना नेपाळ ऐवजी इथे पाठवण्यात येत येईल

आणि अतिशहाण्यांना मर्दुमकी दाखवायला भरपूर स्कोपही आहे तिथे... शेवटी हिंदुराष्ट्राची स्थापना झाली एकदाची.

काही विशेष वाटला नाही लेख.
पण इथेही गरज नसताना तुमच्या मागे लागलेल्या उपटसुंभानी
घाण केलीच.
चला अति शहाण्यांना नेपाळ ऐवजी इथे पाठवण्यात येत येईल
>> दुसऱ्याला अतिशहाणे म्हटले की आपण शहाणे सिद्ध् होऊ असा तुमचा कयास असावा असे वाटते. बघा लोकहो यांना स्वत्:चा शहाणपणा सिद्ध् करावा लागतोय Happy
युनायटेड ऑफ कोथरूड मधल्या काही शहाण्यांनी त्वरित स्थलांतर करावे. >>> तुमच्या सल्ल्याची गरज नाही आम्हाला चांगले कळते कुठे जायचे आणि कुणाला कोठे पोहोचवायचे
Happy

दुसऱ्याला अतिशहाणे म्हटले की आपण शहाणे सिद्ध् होऊ असा तुमचा कयास असावा असे वाटते. बघा लोकहो यांना स्वत्:चा शहाणपणा सिद्ध् करावा लागतोय

>> लोल च लोल! टिपिकल आहे हे.... Happy दुसर्‍याचा काय कयास (म्हणजे अंदाज बरं का) असावा हे स्वतःच वाटायचा तो वाटून घेतात. म्हणजे दुसर्‍याचा काय अंदाज असेल ह्याचा हे आपल्या मनाजोगा अंदाज लावतात. आणि त्या स्वतःच्या वाटण्यावर लगेच विधान करु मोकळे की बघा लोकहो यांना स्वत्:चा शहाणपणा सिद्ध् करावा लागतोय.

कुठून इतकी अचाट बुद्धी इतक्या अफाट लॉजिक सह मिळत असेल? Rofl

राज कवीच्या मर्मावर पाय दिला Wink
आणि आम्ही तुमचा अतिशहांणपणा सिद्ध केला आहे ..
लपून बसलेल्यांना बाहेर पडावे लागले.

कुठून इतकी अचाट बुद्धी इतक्या अफाट लॉजिक सह मिळत असेल? Rofl >> तुम्ही ज्या बुद्धिने व ज्या लॊजिकने दुसऱ्याला अतिशहाणे ठरवता तिथुनच Happy

बाकी दशक्रिया चित्रपटाचा ट्रेलर उत्कृष्ट आहे
आवर्जून बघा..
दिलीप प्रभावळकर ,. मनोज जोशी, अदिती देशपांडे सारखे दिग्गज लोकांचा अभिनय आहे

>> १०. या पूर्वीही त्या जागेवर असे दावे झालेले आहेत. सुयश च्या म्हणण्याप्रमाणे जर ती लोक परत आली तर युद्ध होऊ शकेल.

या दीक्षितला स्किझोफ्रेनिया झाला असण्याची दाट शक्यता आहे. या आजारात व्यक्तीला स्वत:विषयी अवास्तव कल्पना तयार होतात. विविध भास होतात. आपण देव/राजे आहोत असे वाटू लागते. आपल्यावर हल्ला झाला तर भयंकर युद्ध वगैरे होऊ शकते अशा काल्पनिक जगात हे लोक वावरत असतात.

>> ११. जून २०१४ मध्ये एका अमेरिकन शेतकऱ्याने तिथे जाऊन हक्क सांगितला होता Jeremiah Heaton असे त्याचे नाव

त्याने आपल्या फेसबुकवर याबाबत सविस्तर लिहिले आहे. दीक्षितने केलेला उद्योग केवळ प्रसिद्धी स्टंट आहे असे त्याचे म्हणणे. बीर तवीलला जाण्यासाठी दीक्षितने त्याची मदत मागितली होती त्या मेसेजचा स्क्रीनशॉट पण त्याने दिला आहे. दीक्षितने काढलेला फोटो सुद्धा खोटा आहे प्रत्यक्षात दीक्षित तिथे गेलेला सुद्धा नाही असे त्याचे म्हणणे आहे. कारण तिथे जाण्यासाठी इजिप्शियन लष्कराची परवानगी लागते. इथे वाचा बातमी:

https://www.ndtv.com/offbeat/indian-declares-himself-king-of-kingdom-of-...

नवीन प्रदेश??

5000 वर्षाआधी हा प्रदेश वीरधवल ह्या हिंदू राजाचा होता, कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन झाला... असे पुन्हाओक यांनी लिहयन ठेवलेले मला स्वतःला सांगितल्याचे स्वप्नात पाहिल्याचे स्मरते...

एक शंका - जर मी एखाद्या दिवशी आमच्या कॉलनीमधील सर्व लोकांना दमात किंवा विश्वासात घेत, गच्चीवर माझ्या नावाचा वा चिन्हाचा झेंडा फडकावला आणि मी भारताचा हा भूभाग बळकावला अशी घोषणा केली तर माझ्याशी भारत सरकार थेट युद्ध करायला येणार की आमची केस युनो वगैरे असते तिथे जाईल?
काश्मीरप्रश्नासारखा आमचा प्रश्न चिघळत राहील की भारत सरकार उप्स सॉरी मोदी सरकार माझ्यावर कोणालाही न जुमानता चाल करून येईल आणि माझा सर्जिकल स्ट्राईक होईल?

सुबोध भावे हा मला फार मिळमिळीत कलाकार वाटतो. कठीण आहे त्याचा चित्रपट सहन करणे.

नाना.. कोणता पिक्चर?>> च्रप्स, भारतीय नावाचा आला होता काही वर्षांपूर्वी. त्यात सुबोध भावेचं गाव (संस्थान) महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात असतं अशी काहीशी आहे स्टोरी.

सरकार तुझ्या इमारतीचे वीज आणि पाणी तोडेल,
आणि इमारतीतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसास विना परवाना Bभारतात आला म्हणून अटक करेल Happy
आणि आर्णब तुझ्या जीवावर आठवडाभर जगेल.

सुबोध भावे हा मला फार मिळमिळीत कलाकार वाटतो. कठीण आहे त्याचा चित्रपट सहन करणे.>>>> सोपनील च्या बाबतीत आम्हाला सेम वाटते, त्यामुळे आम्ही पण त्याचे काहीच बघत नाही.Rolling Penguin

सिंबा असे कसे वीजपाणी तोडतील? आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांनुसार विकत घेऊ. आयात निर्यात करू भारताशी. ईतर देशांशीही करता येईलच. भारताने आम्हाला चारही बाजूंनी वेढलेले असल्याने त्यांना आम्हाला विशिष्ट कागदपत्रांची पूर्तता केल्यावर त्यांच्या देशात प्रवेश द्यावाच लागेल. जन्माने मिळालेला धर्म जात देश नकोय आम्हाला. आम्ही आमचा देश निर्माण करू आणि त्याचा विकास करू.

रश्मी काय हे..
उलट स्वप्नील तर पर्रफेक्ट उदाहरण आहे हे दाखवून द्यायला की सुबोधमध्ये नक्की काय कमी आहे. ते असते तर आज तो स्वप्नीलच्या जागी असता. अभिनय वगैरे ठिक आहे सुबोधचा पण ते हिरोवाले मटेरीअल मिसिंग आहे. त्याला पडद्यावर ईतर छोट्या मोठ्या साईड रोलमध्ये सहन करू शकतो. पण हिरो म्हणून नाही. कमॉन, एक चार्म म्हणून पण काही चीज असते..

Pages