जोतिष वैद्यक २

Submitted by अविनाश जोशी on 11 November, 2017 - 01:37

जोतिष वैद्यक २
गेल्या लेखात असे दिसते की बऱ्याच जणांना विषय कळला नाही. काही बाबी खालील प्रमाणे ..
१. या विषयाचा आणि भविष्याचा सबंध नाही.
२. प्रत्येक वैद्यकीय पद्धतीत चिकित्सा, अनुमान आणि उपचार असे भाग असतात. जोतिष वैद्यक हे चिकित्सा प्रकारातील आहेत उपचार पद्धतीतील नाही. ज्या प्रमाणे रेनल प्रोफाइल किडनीची चिकित्सा करते, किडनीवर उपचार करत नाही.
३. कुठल्या गोष्टींचा परिणाम कुठे कशावर होईल हे सांगणे अवघड असते. मागे लिहिल्याप्रमाणे हवामानातल्या बटरफ्लाय इफेक्ट सारखे असते. हवामान शास्त्रातील बटरफ्लाय इफेक्ट फारच प्रसिद्ध आहे. तो खालील प्रमाणे ...
Lorenz to realize that long-term weather forecasting was doomed. His simple model exhibits the phenomenon known as "sensitive dependence on initial conditions." This is sometimes referred to as the butterfly effect, e.g. a butterfly flapping its wings in South America can affect the weather in Central Park.
४. कुठलेही खडे महागाईचे पाहिजेत असे शास्त्र म्हणत नाही. १० लाख रुपयाच्या हिऱ्या ऐवजी १० रुपयाचा स्फटिकही चालतो. अर्थात हा भाग उपचाराचा झाला चिकित्सेचा नाही.
५. प्रत्येक प्रथेत चिकित्सा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. ऍलोपॅथीमध्ये शरीराचे विविध विश्लेषण केले जाते, आयुर्वेदात नाडी परीक्षा असते, TCM मध्ये पंचतत्त्वांची शरीरावर होणारे परिणाम पहिले जातात तर होमिओपॅथीमध्ये प्रश्नोत्तरे महत्वाची असतात.
६. चिकित्सेत नाडी परीक्षा किंवा जोतिष वैद्यक हे passiv चिकित्सा समजली जाते. कारण यात रोग्याकडून काही रिस्पॉन्स अपेक्षित नसतो.
७. आज न पटणाऱ्या किंवा अशक्य वाटणाऱ्या किंवा धादांत खोट्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी नंतर पटतात. जगदीशचंद्र बोसांनी संगीताचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो हे दाखवून दिले.
८. प्रकाशाला वस्तुमान असते हे आइनस्टाइन च्या थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी चे एक फलित होते. ग्रॅव्हिटेशनल लेंसिन्ग होऊन प्रकाश वाकेल असे त्याने १९१५ च्या थेअरी मध्ये मत व्यक्त केले. पण बाकीच्यांना ते सिद्ध करायला ९० वर्षे लागली.
९. आइनस्टाइन , मॅक्सप्लॅंक, डी ब्रॉगोली, श्रोडिंगर यांच्या २० व्या शतकातील सुरवातीला केलेल्या संशोधनामुळे सर्व पदार्थ लहरी रूपात असू शकतात ( दगड सुद्धा) असे सिद्ध झाले ( वेव्ह इक्वेशन आणि quantum मेकॅनिकस)
१०. सुनामी, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्ती या वरून या शास्त्राचा खरे खोटेपणा जाणून घेणे अज्ञानी पणाचे आहे. ही चिकित्सा पद्धत आहे आणि समूहातल्या प्रत्येक माणसाला वेगळ्या रीतीने लागू पडते.
११. मागील लेख बघावा https://www.maayboli.com/node/६४४२४
१२. ग्रहांचे होणारे परिणाम ढोबळ मानाने वरील लेखात आहेत आता जन्माच्या वेळेस हे ग्रह कुठे आहेत आणि कुठल्या राशीत आहेत यावरून तब्यतीचे निदान होऊ शकते
१३. पत्रिकेत बारा दिशा कल्पिलेल्या असतात. जन्माच्या वेळी आकाशात असलेली ग्रह स्थिती या पत्रिकांवर मांडली जाते. मुख्य ४ दिशा आणि ८ उपदिशा असे १२ दिशांची ही आकृती बनलेली असते. या घरात कुठला ग्रह कुठे आहे आणि त्याचे इतर ग्रहांशी कशा तर्हेने संबंध आहेत यावर चिकित्सा अवलंबून असते.
१४. आपण फक्त ९ ग्रह, १२ राशी आणि १२ दिशा एवढाच विचार केला तरी ६००,००,००,००० जास्त कॉम्बिनेशन्स होतात (१२* १२ !) यावरून चिकीत्सेची गुंतागुंत लक्षात येऊ शकते यातच ग्रहांची स्पष्ट स्तिथी मांडत गेल्यास हा आकडा किती तरी पटीने फुगतो. संगणक यायच्या अगोदर असा तौलनिक अभ्यास करणे खरोखरच अवघड होते.
१५. त्यामुळेच रोगाचे निदान अतिशय बारकाईने करणे शक्य होऊ शकते. उदा . डोके दुखणे याला ऍलोपॅथीत रोग्याने सांगणे एवढेच चिकीत्सा आहे. फार तर शारीरिक तपासणी करून डॉक्टर वेदनाशामक गोळी देईल. याच्या उलट TCM मध्ये (ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन) मध्ये ७२० प्रकारची डोकेदुखी वर्णन केली आहे
१६. जोतिष वैद्यक चा अभ्यास करणाऱ्याला या शास्त्रा बरोबरच शरीर शास्त्राची जुजबी माहिती असणे आवश्यक असते. या चिकित्से नंतर उपचार कोणत्याही पद्धतीने करावेत. त्यावर खडे किंवा जप किंवा पूजाच करायला पाहिजे असे नाही. चिकित्सेने कदाचित शस्त्रक्रिया ही आवश्यक असू शकते.
१७. वरील काही हजार कोटी चिकित्सा सभवांपैकी काही थोड्या चिकित्सा आपण क्रमशः बघू
१८. एकाच अवयवावर वेगवेगळे ग्रह प्रभाव पडू शकतात. आणि त्याचा उदगम ही वेगळ्या ग्रहांमुळे असू शकतो. उदा. तोल जाणे याचे कारण मेंदू विकार असू शकते, स्नायू विकार असू शकतो, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असू शकतो, रक्तदाब असू शकतो, कानाचा विकार असू शकतो किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. या सर्वांची चिकित्सा हे शास्त्र करू शकते.
१९. या चिकित्सेचा एक मोठा फायदा म्हणजे रोगी समोर असायची आवश्यकता नसते. त्याची जन्मवेळची ग्रहस्थिती आणि वर्तमान ग्रहस्तिथी यावरून चिकित्सा करणे शक्य असते.
२०. तीन महिन्या पूर्वी झालेल्या एका उदाहरणात एका गर्भवती बाईचा नातेवाईक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली आहे आणि आत्ता ५ वा महिना आहे पण शस्त्र क्रिया आवश्यक आहे का अशी त्याची विचारणा होती. शस्त्रक्रिया केव्हा होईल असेही त्याला विचारायचे होते. ग्रहस्थिती पाहता शस्त्र क्रिया ताबडतोब होणे आवश्यक होते. ग्रह स्थिती पाण्याच्या संबंधी शस्त्रक्रिया दाखवत होती. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे सांगितले. शस्त्रक्रिया सिझेरियन सारखी नसून रोगयाच्या पोटातील पाण्यासंबंधी आहे असे सांगितले या मुळे त्यांना मानसिक आधार वाटला. शस्त्रक्रिया किडनी निकामी झाल्यामुळे होती. (मुलाची)
२१. कुठल्याही पद्धतीत मानसिक बल महत्वाचे असते. योग्य चिकित्सेची त्याला निश्चितच मदत होते.
२२. क्रमशः ही चिकित्सा कशी करावी त्यातील महत्वाचे भाग कोणते हे मी विवेचन करेनच. अजूनही काही माहिती हवी असेल तर प्रतिसादात कळवावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधुनिक विज्ञानातील संकल्पना ज्या घासून पुसून सर्व बाबींचा विचार करून व गणिताच्या आणि प्रात्यक्षिकांच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या आहेत त्याचा स्वतःला हवा तसा विद्रुप वापर करणे हे भोंदू आणि बुद्धीभ्रष्ट लोकांचे लक्षण आहे. उपरोल्लेखीत सर्व शास्त्रीय संबंध हे चुकीच्या पद्धतीने का ओढून ताणून बसवलेले आहेत. सुज्ञ वाचकांनी त्यास बळी पडू नये.
Gravitational lensing हा शोधनिबंध आइन्स्टाईनने 1935साली लिहिला. 1915साली मांडली व 1919ला सूर्यग्रहणादरम्यान सिद्ध झाली ती थेअरी ऑफ रिलेटीव्हीटी. तुम्हाला दोहोतला फरक कळत नाही मात्र आईन्स्टाईन, श्रोडिंगर, बोहर सारख्या ज्ञानी मनुष्याच्या आयुष्यभराच्या मेहनतीचा स्वतःच्या भोंदूबाजीत वापर करून घ्यायला जमतो. लाज वाटली पाहिजे. बटरफ्लाय प्रिन्सिपल, नॉन लिनीअर सिस्टम यांचा संबंध ग्रह ताऱ्याच्या तुमच्या कुडमुड्या ज्योतिषाशी लावता तेव्हा लोरन्झ आणि पोंकारेच्या तुम्हाला कणभर ना कळलेल्या सिध्दांतांचा तुम्ही भ्रष्ट उपयोग करता. दगडाचे लहरी रूपातील अस्तित्व असले शब्द लिहिताना क्वांटम सिद्धांताचे हवे तसे आणि भंपक interpretation करता.

या असल्या लोकांचे मूर्खशिरोमणी दीपक चोप्राचा इथे व्हिडीओ पाहा.
https://youtu.be/Z17sIJyQ3oY

मुद्दे मांडून लिखाण केलेले आवडले. मुद्दा २२ मध्ये उल्लेख केलेले विवेचन वाचण्याची अतिशय उत्सुकता आहे.
बाकी खडे / रत्नांचा उपचारासाठी वापर होऊ शकतो यावर विश्वास नाहीये.

दवणे सर
आपल्या तारखा आणि विषय १००% बरोबर नाहीत. आपण खालील पुस्तक वाचा
Schrödinger stayed in Dublin until retiring in 1955. He had a lifelong interest in the Vedanta philosophy of Hinduism, which influenced his speculations at the close of What Is Life? about the possibility that individual consciousness is only a manifestation of a unitary consciousness pervading the universe.[Schrödinger addressed the problems of genetics, looking at the phenomenon of life from the point of view of physics. He paid great attention to the philosophical aspects of science, ancient and oriental philosophical concepts, ethics, and religion. He also wrote on philosophy and theoretical biology.

कुठल्या तारखा बरोबर नाहीत? कुठला विषय बरोबर नाही? श्रोडिंगरच्या तथाकथित वेदांतातील अभ्यासाचा या वरच्या लेखाशी व मी लिहिलेल्या पोस्टशी काय संबंध?

४. कुठलेही खडे महागाईचे पाहिजेत असे शास्त्र म्हणत नाही. १० लाख रुपयाच्या हिऱ्या ऐवजी १० रुपयाचा स्फटिकही चालतो. अर्थात हा भाग उपचाराचा झाला चिकित्सेचा नाही.
------- हौस म्हणुन बाळगायला काही हरकत नाही. तुमची एपत असेल, बजेटमधे बसत असेल, समोरचा इम्प्रेस होत असेल तर बाळगा ना लाखा लाखाचे दगड. पण केवळ हौस/ शौक म्हणुन.
सर्व प्रकारच्या दगडान्चे उपचार मुल्य शुन्य आहे.

<<६. चिकित्सेत नाडी परीक्षा किंवा जोतिष वैद्यक हे passiv चिकित्सा समजली जाते. कारण यात रोग्याकडून काही रिस्पॉन्स अपेक्षित नसतो.>>
-------- रिस्पॉन्स केवळ पैशाच्या स्वरुपात अपेक्षित आहे....

<<७. आज न पटणाऱ्या किंवा अशक्य वाटणाऱ्या किंवा धादांत खोट्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी नंतर पटतात. जगदीशचंद्र बोसांनी संगीताचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो हे दाखवून दिले.>>
-------- विज्ञानात दावे सिद्ध करावे लागतात. केलेला दावा पडताळता यायला हवा. reproducibility, validity ला अनन्यसाधारण महत्व आहे. केलेला दावा सिद्ध करता येत नसेल, इतरान्ना पडताळता आला नाही तर तो विज्ञान जगत मानत नाही.
नवी माहिती कळाल्यावर काल केलेला दावा पण नव्या माहितीच्या आधारावर तपासणीला उतरला नाही तो फोल ठरतो.
विज्ञानात थापेबाजीला थारा नाही.

<<१२. ग्रहांचे होणारे परिणाम ढोबळ मानाने वरील लेखात आहेत आता जन्माच्या वेळेस हे ग्रह कुठे आहेत आणि कुठल्या राशीत आहेत यावरून तब्यतीचे निदान होऊ शकते>>
--------- हे असत्य विधान आहे. जन्माच्या वेळी ग्रह कुठे जरी असले तरी त्यामुळे तुमच्या तब्येतीचे कुठलेही निदान होत नाही. हे केवळ अशक्य आहे.
प्रत्येकाला आरोग्याचे प्रश्न असतील, असतातच पण त्याचा आणि जन्माच्या वेळेस ग्रह कुठे आहेत याचा अजिबात सम्बन्ध जोडता येत नाही.
कृपया थापेबाजीला बळी पडू नका.

<<१४. आपण फक्त ९ ग्रह, १२ राशी आणि १२ दिशा एवढाच विचार केला तरी ६००,००,००,००० जास्त कॉम्बिनेशन्स होतात (१२* १२ !) यावरून चिकीत्सेची गुंतागुंत लक्षात येऊ शकते यातच ग्रहांची स्पष्ट स्तिथी मांडत गेल्यास हा आकडा किती तरी पटीने फुगतो. संगणक यायच्या अगोदर असा तौलनिक अभ्यास करणे खरोखरच अवघड होते.>>
---------- केवळ ९ ग्रहामुळे ६००,००,००,००० जास्त कॉम्बिनेशन्स होतात
कोट्यावधी ग्रह-तारे आपल्या विश्वात आहेत (सुर्यासारखे कोट्यावधी सुर्यमाला अस्तित्वात आहेत... त्यान्चे ग्रह.... ) मग किती कॉम्बीनेशन्स होणार ?

<<१६. जोतिष वैद्यक चा अभ्यास करणाऱ्याला या शास्त्रा बरोबरच शरीर शास्त्राची जुजबी माहिती असणे आवश्यक असते. या चिकित्से नंतर उपचार कोणत्याही पद्धतीने करावेत. त्यावर खडे किंवा जप किंवा पूजाच करायला पाहिजे असे नाही. चिकित्सेने कदाचित शस्त्रक्रिया ही आवश्यक असू शकते.>>>
------- शस्त्रक्रिया कोण करणार ?
जोतिष वैद्यकाने केलेली चिकित्सा कुठलाही डॉक्टर केराच्या टोपलित टाकणार.

<<१७. वरील काही हजार कोटी चिकित्सा सभवांपैकी काही थोड्या चिकित्सा आपण क्रमशः बघू>>
------- अरे बापरे.... मायबोली खतरे मे है...

<<१८. एकाच अवयवावर वेगवेगळे ग्रह प्रभाव पडू शकतात. आणि त्याचा उदगम ही वेगळ्या ग्रहांमुळे असू शकतो. उदा. तोल जाणे याचे कारण मेंदू विकार असू शकते, स्नायू विकार असू शकतो, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असू शकतो, रक्तदाब असू शकतो, कानाचा विकार असू शकतो किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. या सर्वांची चिकित्सा हे शास्त्र करू शकते.>>
------- शरिराच्या कुठल्याही अवयवावर, विश्वातला कुठल्याही ग्रहाचा काडीमात्र फरक पडत नाही. असा सम्बन्ध जोडता येत नाही.

<<१९. या चिकित्सेचा एक मोठा फायदा म्हणजे रोगी समोर असायची आवश्यकता नसते. त्याची जन्मवेळची ग्रहस्थिती आणि वर्तमान ग्रहस्तिथी यावरून चिकित्सा करणे शक्य असते.>>
------- अशी चिकित्सा वेळेचा आणि पैशाचा निव्वळ अपव्यय आहे. आरोग्याचे प्रश्न असतील तर सरळ कुठलाही डॉक्टर गाढायचा.

थोडक्यात आवरतो....
मायबोलीवर असे भम्पक धागे खपवले जाणे मला अत्यन्त धोक्याचे वाटते. विज्ञानाच्या नावाखाली, त्याचा आडोसा घेत भोळ्या, अज्ञानी, अडचणीत सापडलेल्या पिडलेल्या लोकान्ची फसवणुक मला मान्य नाही.

प्रत्येक वैद्यकीय पद्धतीत चिकित्सा, अनुमान आणि उपचार असे भाग असतात. जोतिष वैद्यक हे चिकित्सा प्रकारातील आहेत उपचार पद्धतीतील नाही. ज्या प्रमाणे रेनल प्रोफाइल किडनीची चिकित्सा करते, किडनीवर उपचार करत नाही.
<<

कोणत्याही वैद्यकात तीन भाग असतात.
या जोतिश "वैद्यकात" फक्त चिकित्सा(!?) आहे.
मग हे "वैद्यक" कसे झाले?

फक्त चिकित्सा उर्फ तपासणी म्हणजे उदा. तुझ्या पार्श्वस्थानी Uranus आहे म्हणून तुला मूळव्याध आहे, हे सांगून झाले. मग इथून पुढे या सगळ्या भोंदुगिरीचा उपयोग काय?

असो.

या महोदयांना या भंपकगिरीवर भाळणारे अनेकानेक मूर्ख बकरे मिळोत. व त्यां(बकर्‍यां)चे त्यांच्या मूर्खपणामुळे जे काही व्हायला हवे तेच होवो, हीच सदिच्छा!

So, Mr. Joshi is slowly trying to establish himself as expert of these method so he can get more gullible souls to test them and guide them.

ह्या लेखातले बहुतांशी "मुद्दे" अत्यंत भंपक आणि एकमेकांशी आणि आधीच्या लेखाशी कुठलाही संबंध नसलेले आहेत. अगदी बादरायण संबंधही ह्याला म्हणवत नाही. स्वतःच्या विधानांना स्वतः आधार द्यायची जबाबदारी तर लेखकाने कधी घेतलेलीच नाही, ह्याउलट टवणे सर म्हणतात त्याप्रमाणे वैज्ञानिकांच्या आयुष्यभराच्या शोधाचा वापर स्वतःच्या भोंदू विधानांसाठी करून घेण्याचा शहाजोगपणा लेखात आणि प्रतिसादांत दिसतो. टवणे सरांच्या प्रतिसादाशी अगदी सहमत. ह्या असल्या थापेबाजीला लोकांनी बळी पडू नये.

लिहत राहा तुम्ही सर. पुढचा भाग येऊद्या लवकर. पब्लिक फोरमवर लेख प्रकाशित केलात तर दोन्ही बाजूने प्रतिसाद येणारच. तुम्ही दुसरयाचे दुकान बंद करून आपले सुरू करत असाल तर समोरून विरोध हा होणारच. संत आईनस्टाईनलाही झाला होता तर तुम्ही आम्ही काय चीज आहोत. पण आजच्या तारखेला प्रत्येकाला व्यक्त व्हायचा आणि आपली बाजू मांडायचा अधिकार घटनेने दिला आहे.
असो, पर्सनली मला वाचायला मजा येत आहे. तुमचा लेख आणि विरोधात आलेले प्रतिसाद, तुर्तास दोन्ही बाजू पटत आहेत. तुमच्या पुढच्या लेखांत चित्र अजून क्लीअर होईल अशी आशा..

असो,

एक प्रश्न - जसे लग्नाचा मुहुर्त काढतात तसे अपत्य साधारणपणे कधी प्लान करावे हे नऊ महिन्यानंतरच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून चांगला काळ कोणता हे ठरवू शकतो का? शक्य असल्यास हे व्यवसाय म्हणून कोणी करते का? मला ट्राय करायला आवडेल. झालेच तर फायदा, नुकसान काही नाहीच. चार पैसे जातील, पण ते केव्हाही कमावता येतील.

लोकांची बाकी मला एक मजा वाटते, एका स्थिर दगडाच्या मूर्तीवर डोके टेकवून देव देव करतील. मात्र फिरत्या ग्रहतारयांवर अविश्वास दाखवतील.
कोणी श्रद्धेच्या नावावर काहीही खपवले तर चालते, त्याला विरोध करून का एखाद्याची श्रद्धा आणि भावना दुखवावा असा विचार करतील. पण शास्त्राचा आधार घेत काही सांगत असेल तर त्याला त्याची बाजू मांडायलाही विरोध.
तरी बरंय हा धागा धार्मिक विभागात आहे Happy
यावरून एक शंका - या शास्त्राचा हिंदू धर्माशी काही संबंध?

जसे लग्नाचा मुहुर्त काढतात तसे अपत्य साधारणपणे कधी प्लान करावे हे नऊ महिन्यानंतरच्या ग्रहस्थितीचा अभ्यास करून चांगला काळ कोणता हे ठरवू शकतो का?
>> ग्रहस्थितीचा अभ्यास करण्यापेक्षा तुला आणखी कसला तरी नीट अभ्यास करायला लागेल असं दिसतंय...

प्रत्येकाचा विचार वेगवेगळा असतो आणि त्यांचे दृष्टीकोनही वेगळे असतात. त्यांच्या विचारांचा आपण सन्मान करायला हवा. पण तात्विक मुद्दे नसले कि वैयक्तिक पातळीवर मुद्दे येतात . त्यांची दखल घेण्याची जरूर नाही.

जोशी, मी वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता का? ते प्रश्न तुमच्या प्रतिसादाला उद्देशून आहेत.
तुमचे क्वांटम स्थिती (दगडाची वेव्ह) व ग्राव्हिटॅशनल लेंसिंग वरचे चुकीचे उद्धृत केलेले संदर्भ हे factual आहेत. तत्त्व वगैरे द्या सोडून बाजुला, त्याची तरी उत्तरे द्या.

जरुर

Gravitational Lensing
It is generally thought that 1919 experiment was conclusive, but many accusations against data have beeb made, including none other than Hawking.
in 1919 by the British astronomer Arthur Eddington. Eddington reported observing the bending of light during a total eclipse, as predicted by Einstein. But some have claimed that he cooked his books to make sure that Einstein was vindicated over Newton, because Eddington had already decided that this must be so.
Now, even physicists who celebrate Einstein's theory commonly charge Eddington with over-interpreting his data. In his Brief History of Time, Stephen Hawking says of the result that: "Their measurement had been sheer luck, or a case of knowing the result they wanted to get." Hawking reports the widespread view that the errors in the data were as big as the effect they were meant to probe. Some go further, saying that Eddington deliberately excluded data that didn't agree with Einstein's prediSwiss astronomer Fritz Zwicky further predicted in 1937 that galaxy clusters could act as gravitational lenses. In other words, light coming from objects can bend around entire galaxy. This would allow obsvers to view objects behind this massive galaxy cluster.
In 1979, astronomers Dennis Walsh, Bob Carswell, and Ray Weymann observed two identical quasars or quasi-stellar objects. Further observation revealed that these objects were actually one quasar that appeared as two separate objects. This is the first observation of galactic gravitational lensing.ction.

जोशी तुम्ही लिहा बिनधास्त् आणि खरोखर ईतके सगळे चवताळलेल्या श्वानासारखे अंगावर येत असुनही लिहिता. त्यासाठी तुम्हाला हत्ती ही उपमाच योग्य् आहे. माझ्याकडुन मनापासुन शुभेच्छा. Happy

जोशी, तुमचे बरेचसे धागे गेल्या काही दिवसांपासून पाहिले, त्यातील काही वाचलेही, आता सर्व धागे व्यक्तीशः मला पटणारे जरी नसले तरी तुमच्या मुद्देसूद मांडणीबद्दल नक्कीच कौतूक वाटते. आपल्याला पटत नसले तर आपला मुद्दा वैयक्तीक टीका करून ठसवण्याचा प्रकार इथे दिसतोय. एखाद्याला जो विचार पटतो तो मांडल्यावर 'मायबोली खतरे मे' येते हे तर जामच भारी आहे. पटतंय तर घ्या नाहीतर सोडून द्या अशी सोय नसते बहुदा इथे...असो...
वर भूषण यांनी म्हणल्याप्रमाणे त्यासाठी तुम्हाला हत्ती ही उपमाच योग्य् आहे. माझ्याकडुन मनापासुन शुभेच्छा. Happy

ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद मधील काही भाग उधृत करीत आहे. जिज्ञासूंनी मूळ जरुर वाचावे
लिंक http://mr.upakram.org/node/1065

६३) आतापर्यंत ज्योतिषांना काय आव्हाने दिली गेली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?
डॉ. अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने बुवाबाजी चमत्कार यांच्या वर हल्ला करण्यासाठी जगभरात जाहीर आव्हान दिले. त्यात फलज्योतिषाविरुद्धही आव्हान होते.
१ ते ३ डिसेंबर १९८५ मध्ये तिसरे आखिल भारतीय ज्योतिष संमेलनात हेच आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पाच सहाशे ज्योतिषांसमोर मांडले होते. आव्हान खालील प्रकारचे होते.
१) दहा अचूक जन्मवेळांची माहिती वा कुंडल्या दिल्या जातील. तसेच दहा हातांचे ठसे दिले जातील त्यातून संबंधीत 'व्यक्ति स्त्री आहे की पुरुष?` व 'जिवंत आहे की मृत?` एवढेच अचूक सांगायचे.
२) वरीलप्रमाणे दहा कुंडल्या वा हाताचे ठसे दिले जातील त्या आधारे संबधीत व्यक्तीचे शिक्षण, विवाह, अपत्य, अपघात, व्यवसाय व उत्पन्न याबाबत भविष्यकथन करावे. ऐशी टक्के अचूक उत्तरे आल्यास आम्ही ज्योतिष हे शास्त्र मानू.
३) वरीलप्रमाणे कुंडल्या वा हाताचे ठसे पाच नामवंत ज्योतिषांना भविष्य पहाण्यासाठी देउ ( या पाच ज्योतिषांची निवड ही महामंडळानेच करावी) त्यांना वेगवेगळया खोलीत बसविले जाईल. त्यामुळे नामवंत ज्योतिषांची शास्त्रीय भविष्ये सत्यापासून व एकमेकापासून कशी दूर जातात याची जाणीव समाजाला होईल. असे होते की नाही याची तपासणी महामंडळानेच करावी.
या आव्हानांवर बरेच अकांडतांडव करण्यात आले. पण आव्हान स्वीकारण्यास कुणी होकार दिला नाही. या आव्हानानिमित्ताने वादविवाद अनेक लोकांशी झाले. त्यात मुंबईतील दिवंगत अभिनेते शाहू मोडक, सांगलीचे बॅंक अधिकारी गिरीश शहा, पुण्याचे अंकज्योतिषी एम कटककर, कोल्हापूरच्या डॉ. भावना मेहता (एम.बी.बी.एस.) यांचा सामावेश होता.
डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी १९८५ च्या ज्योतिषसंमेलनात वैद्यक ज्योतिषाच्या सेमिनारमध्ये खालील विधाने केली होती :-
१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते. धनभारित व्यक्तिमधे आत्मिक सामर्थ्याने रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानाने भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तिंनी पाणी दिले तरी त्याचे औषध बनते.
२) गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे आधी कळते.
३) डॉ. पुरंदरेंनी ऑपरेशन करुन एक जुळे काढले. त्यांचे पोषण करणारी वार एकच होती. वैद्यकशास्त्र सांगते की अशी जुळी भावंडे अगदी एकसारखी असतात. परंतु तेवढया वेळात चंद्राने नक्षत्र बदलल्याने त्या मुली पूर्णपणे वेगळया रंगरुपाच्या, गुणाच्या झाल्या.
हे दावे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचेवर येते असे आव्हान लोकसत्तेच्या १९.१.८६ च्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 'भविष्याचे भ्रमजाल` या लेखातून दिले. परंतु या बाबत त्यांचा कुठलाही प्रतिसाद आलेला नाही.
पत्रिकेतील ग्रहस्थितीवरुन रोगनिदान हे जवळजवळ ८० ते ८५ टक्के बरोबर येते. परदेशात जवळजवळ ६० ते ६५ टक्के डॉक्टर मंडळी याचा आपल्या वैद्यकव्यवसायात उपयोग करुन घेतात. असे विधान कोल्हापूरच्या डॉ.भावना मेहता यंानी केले होते. त्यावर त्यांना असे जाहीर आव्हान दिले होते:-
१) परदेशात ६० ते ६५ टक्के डॉक्टर याचा वापर करतात यासाठी सबळ पुरावा सादर करावा. कुठल्या मेडिकल जर्नल मध्ये हे प्रसिद्ध झाले आहे?
२) सोयीच्या कुठल्याही हॉस्पिटल मधले २० रुग्ण आम्ही देउ. त्यांच्या कुंडल्या पाहून त्यांनी रोगनिदान करावे. त्यासाठी ते डॉ.बी.एन. पुरंदरे, दिल्लीचे डॉ. जे.एन.राव यांची मदत घेऊ शकतात. ते सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. तसेच त्यानंतर पाच तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पॅनेल आधुनिक वैद्यकीय चाचण्या करुन आपल रोगनिदान देईल. तेही सीलबंद पाकिटात ठेवले जाईल. दोन्ही पाकिटे डॉक्टर व माजी न्यायमूर्ती यांच्या तटस्थ पॅनेलसमोर उघडली जातील. डॉ. भावना मेहतांनी ८० टक्के जरी अचूक रोगनिदान केलेले आढळले तरी त्यांचा दावा आम्ही मान्य करु.
यावर कुठलेही आव्हान स्वीकारले गेले नाही. ही आव्हाने सुरवातीला एक लाख, त्यानंतर दोन लाख व आता पाच लाख अशा रक्कमेपर्यंत गेली आहेत. ज्योतिषांच्या दाव्यानुसार त्यात थोडाफार बदल केला जातो.ही आव्हाने वेळोवेळी दिली जातात. पण एकूण ढाचा याच पद्धतीचा असतो. आव्हान देण्यात केवळ हेतू हा की लोकांचे लक्ष या निमित्ताने वेधले जाते व लोक त्यावर चिकित्सकपणे विचार करू लागतात. आव्हानाच्या निमित्ताने लोकांच्यासमोर महत्वाची गोष्ट आली की, पत्रिकेवरुन व्यक्ती स्त्री आहे का पुरूष? जिवंत आहे की मृत ? या साध्या गोष्टी सुद्धा सांगता येत नाहीत. अहो, तुम्हाला वर्तमान काळ नीट सांगता येत नाही तर तुम्ही भविष्य काळ काय सांगणार? या साध्या तर्कशुद्ध प्रश्नावर ज्योतिषाचे पितळ उघडे पाडण्यास मदत झाली. नंतरनंतर या ज्योतिषाच्या मर्यादा आहेत. ज्योतिषाचा वापर मार्गदर्शक म्हणून होतो. ते दैवी शास्त्र आहे. ते धर्माचे अंग आहे. त्याला भौतिक कसोटया लागू करता येत नाहीत. अशी भूमिका घ्यायला सुरवात केली. आव्हानाकडे दुर्लक्ष केले तरी आपल्या कडे येणाऱ्या गि-हाईकावर याचा काही परिणाम होणार नाही याची त्यांना खात्री असल्याने त्यांनी आव्हानाची दखल घेणे सोडून दिले.
आव्हान या प्रकाराशिवाय फलज्योतिषाची सत्यासत्यता पडताळणीसाठी काही प्रयत्न पूर्वीही झाले. सन १९३५ साली रा.ज.गोखले या पुणे येथील शिक्षक गृहस्थाने 'फलज्योतिषचिकित्सा` नावाचे एक पुस्तक लिहून त्याची सविस्तर चिकित्सा केली आहे. फलज्योतिषाची सत्यासत्यता तपासण्यासाठी एक निर्णायक समितीची स्थापना केली. भविष्यज्ञान प्राप्त करुन घेण्याच्या पद्धतीच्या पुरस्कर्त्यांस व तज्ज्ञास एक विनंती केली, आपली वर्तवलेली भविष्ये त्यांनी निर्णायक समितीकडे पाठवावी. त्यासाठी यथोचित पारितोषकही देण्याची तयारी ठेवली होती. पण त्यासाठी त्यांनी फलासंदर्भात अटी घातल्या.
१) ज्या गोष्टी करणे व्यक्तिच्या हातात आहे ( उदा. प्रवासास जाणे ) त्या संबंधी भविष्ये समिती विचारात घेत नाही.
२) भविष्य स्पष्ट म्हणजे निश्चितार्थक असले पाहिजे. अर्थात त्याचे स्वरुप व त्याचा काल नियमित पाहिजे.
३) भविष्य एका वर्षाचे आत व फार तर दोन वर्षाचे आत घडणारे असावे
४) कोणताही सिद्धांत अनेक उदाहरणांवरुनच सिद्ध होणे जरुरी आहे. यास्तव फले पुरेशी न मिळता बरीच मिळाल्यास, मिळालेल्या उदाहरणांवरुन होणारा निर्णय 'तात्पुरता खरा` असेच मानण्यात येईल.
५) भविष्य व्यक्तिस अनिष्ट ( उदा. आजार, मृत्यू, इ. स्वरुपाचे ) असल्यास ते गुप्त ठेवले पाहिजे.
६) भविष्य साधार म्हणजे नियमासह द्यावे.
या आवाहनात्मक प्रकाराचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही.

प्रकाशजी धन्यवाद
लेखाचा उद्देश भविष्याचा नाही . माझा तो व्यवसायही नाही. एक गणिती शास्त्र म्हणून अभटासक जरूर आहे.

>> या आवाहनात्मक प्रकाराचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही.<<<
संपुर्ण लेखात "आव्हान" हा शब्द वापरला आहे, हे "आवाहन" कुठुन आले? कुणाकरता ?
का ज्योतिषांना "आव्हान" करण्याच्या निमित्ताने "जनतेला ज्योतिषावर विश्वास ठेवु नये" अशा अर्थाचे अप्रत्यक्ष "आवाहन" अपेक्षित होते? ज्याचा आजवर परिणाम दिसुन येत नाही?

Pages