जोतिष वैद्यक २

Submitted by अविनाश जोशी on 11 November, 2017 - 01:37

जोतिष वैद्यक २
गेल्या लेखात असे दिसते की बऱ्याच जणांना विषय कळला नाही. काही बाबी खालील प्रमाणे ..
१. या विषयाचा आणि भविष्याचा सबंध नाही.
२. प्रत्येक वैद्यकीय पद्धतीत चिकित्सा, अनुमान आणि उपचार असे भाग असतात. जोतिष वैद्यक हे चिकित्सा प्रकारातील आहेत उपचार पद्धतीतील नाही. ज्या प्रमाणे रेनल प्रोफाइल किडनीची चिकित्सा करते, किडनीवर उपचार करत नाही.
३. कुठल्या गोष्टींचा परिणाम कुठे कशावर होईल हे सांगणे अवघड असते. मागे लिहिल्याप्रमाणे हवामानातल्या बटरफ्लाय इफेक्ट सारखे असते. हवामान शास्त्रातील बटरफ्लाय इफेक्ट फारच प्रसिद्ध आहे. तो खालील प्रमाणे ...
Lorenz to realize that long-term weather forecasting was doomed. His simple model exhibits the phenomenon known as "sensitive dependence on initial conditions." This is sometimes referred to as the butterfly effect, e.g. a butterfly flapping its wings in South America can affect the weather in Central Park.
४. कुठलेही खडे महागाईचे पाहिजेत असे शास्त्र म्हणत नाही. १० लाख रुपयाच्या हिऱ्या ऐवजी १० रुपयाचा स्फटिकही चालतो. अर्थात हा भाग उपचाराचा झाला चिकित्सेचा नाही.
५. प्रत्येक प्रथेत चिकित्सा पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. ऍलोपॅथीमध्ये शरीराचे विविध विश्लेषण केले जाते, आयुर्वेदात नाडी परीक्षा असते, TCM मध्ये पंचतत्त्वांची शरीरावर होणारे परिणाम पहिले जातात तर होमिओपॅथीमध्ये प्रश्नोत्तरे महत्वाची असतात.
६. चिकित्सेत नाडी परीक्षा किंवा जोतिष वैद्यक हे passiv चिकित्सा समजली जाते. कारण यात रोग्याकडून काही रिस्पॉन्स अपेक्षित नसतो.
७. आज न पटणाऱ्या किंवा अशक्य वाटणाऱ्या किंवा धादांत खोट्या वाटणाऱ्या अनेक गोष्टी नंतर पटतात. जगदीशचंद्र बोसांनी संगीताचा परिणाम झाडांच्या वाढीवर होतो हे दाखवून दिले.
८. प्रकाशाला वस्तुमान असते हे आइनस्टाइन च्या थेअरी ऑफ रेलॅटिव्हिटी चे एक फलित होते. ग्रॅव्हिटेशनल लेंसिन्ग होऊन प्रकाश वाकेल असे त्याने १९१५ च्या थेअरी मध्ये मत व्यक्त केले. पण बाकीच्यांना ते सिद्ध करायला ९० वर्षे लागली.
९. आइनस्टाइन , मॅक्सप्लॅंक, डी ब्रॉगोली, श्रोडिंगर यांच्या २० व्या शतकातील सुरवातीला केलेल्या संशोधनामुळे सर्व पदार्थ लहरी रूपात असू शकतात ( दगड सुद्धा) असे सिद्ध झाले ( वेव्ह इक्वेशन आणि quantum मेकॅनिकस)
१०. सुनामी, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्ती या वरून या शास्त्राचा खरे खोटेपणा जाणून घेणे अज्ञानी पणाचे आहे. ही चिकित्सा पद्धत आहे आणि समूहातल्या प्रत्येक माणसाला वेगळ्या रीतीने लागू पडते.
११. मागील लेख बघावा https://www.maayboli.com/node/६४४२४
१२. ग्रहांचे होणारे परिणाम ढोबळ मानाने वरील लेखात आहेत आता जन्माच्या वेळेस हे ग्रह कुठे आहेत आणि कुठल्या राशीत आहेत यावरून तब्यतीचे निदान होऊ शकते
१३. पत्रिकेत बारा दिशा कल्पिलेल्या असतात. जन्माच्या वेळी आकाशात असलेली ग्रह स्थिती या पत्रिकांवर मांडली जाते. मुख्य ४ दिशा आणि ८ उपदिशा असे १२ दिशांची ही आकृती बनलेली असते. या घरात कुठला ग्रह कुठे आहे आणि त्याचे इतर ग्रहांशी कशा तर्हेने संबंध आहेत यावर चिकित्सा अवलंबून असते.
१४. आपण फक्त ९ ग्रह, १२ राशी आणि १२ दिशा एवढाच विचार केला तरी ६००,००,००,००० जास्त कॉम्बिनेशन्स होतात (१२* १२ !) यावरून चिकीत्सेची गुंतागुंत लक्षात येऊ शकते यातच ग्रहांची स्पष्ट स्तिथी मांडत गेल्यास हा आकडा किती तरी पटीने फुगतो. संगणक यायच्या अगोदर असा तौलनिक अभ्यास करणे खरोखरच अवघड होते.
१५. त्यामुळेच रोगाचे निदान अतिशय बारकाईने करणे शक्य होऊ शकते. उदा . डोके दुखणे याला ऍलोपॅथीत रोग्याने सांगणे एवढेच चिकीत्सा आहे. फार तर शारीरिक तपासणी करून डॉक्टर वेदनाशामक गोळी देईल. याच्या उलट TCM मध्ये (ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन) मध्ये ७२० प्रकारची डोकेदुखी वर्णन केली आहे
१६. जोतिष वैद्यक चा अभ्यास करणाऱ्याला या शास्त्रा बरोबरच शरीर शास्त्राची जुजबी माहिती असणे आवश्यक असते. या चिकित्से नंतर उपचार कोणत्याही पद्धतीने करावेत. त्यावर खडे किंवा जप किंवा पूजाच करायला पाहिजे असे नाही. चिकित्सेने कदाचित शस्त्रक्रिया ही आवश्यक असू शकते.
१७. वरील काही हजार कोटी चिकित्सा सभवांपैकी काही थोड्या चिकित्सा आपण क्रमशः बघू
१८. एकाच अवयवावर वेगवेगळे ग्रह प्रभाव पडू शकतात. आणि त्याचा उदगम ही वेगळ्या ग्रहांमुळे असू शकतो. उदा. तोल जाणे याचे कारण मेंदू विकार असू शकते, स्नायू विकार असू शकतो, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स असू शकतो, रक्तदाब असू शकतो, कानाचा विकार असू शकतो किंवा इतर अनेक कारणे असू शकतात. या सर्वांची चिकित्सा हे शास्त्र करू शकते.
१९. या चिकित्सेचा एक मोठा फायदा म्हणजे रोगी समोर असायची आवश्यकता नसते. त्याची जन्मवेळची ग्रहस्थिती आणि वर्तमान ग्रहस्तिथी यावरून चिकित्सा करणे शक्य असते.
२०. तीन महिन्या पूर्वी झालेल्या एका उदाहरणात एका गर्भवती बाईचा नातेवाईक डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सांगितली आहे आणि आत्ता ५ वा महिना आहे पण शस्त्र क्रिया आवश्यक आहे का अशी त्याची विचारणा होती. शस्त्रक्रिया केव्हा होईल असेही त्याला विचारायचे होते. ग्रहस्थिती पाहता शस्त्र क्रिया ताबडतोब होणे आवश्यक होते. ग्रह स्थिती पाण्याच्या संबंधी शस्त्रक्रिया दाखवत होती. त्यांना तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे सांगितले. शस्त्रक्रिया सिझेरियन सारखी नसून रोगयाच्या पोटातील पाण्यासंबंधी आहे असे सांगितले या मुळे त्यांना मानसिक आधार वाटला. शस्त्रक्रिया किडनी निकामी झाल्यामुळे होती. (मुलाची)
२१. कुठल्याही पद्धतीत मानसिक बल महत्वाचे असते. योग्य चिकित्सेची त्याला निश्चितच मदत होते.
२२. क्रमशः ही चिकित्सा कशी करावी त्यातील महत्वाचे भाग कोणते हे मी विवेचन करेनच. अजूनही काही माहिती हवी असेल तर प्रतिसादात कळवावे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवाहन व आव्हान या दोन्ही पातळ्यांवर प्रबोधन करावे लागते. अंनिस कधी आव्हान करते तर कधी आवाहन. आव्हान हे फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी. आवाहनात साद आहे. जी लोकांना भावते. त्यात खुमखुमीचा वास नसतो. पण आव्हानात तो असतो.

११ नंबरच्या मुद्यामधे लिंक https://www.maayboli.com/node/६४४२४ अशी न देता https://www.maayboli.com/node/64424 अशी दिली तर त्यावर टिचकी मारून ती उघडता येऊ शकेल असे वाटते.

Pages