ज्योतिष वैद्यक
जन्माच्या वेळेला असलेली ग्रहस्थिती आणि सद्य ग्रहस्थिती यावर आधारित वैद्यकीय चिकित्सा सांगितलेली आहे. मी प्रथमच हे सांगू इच्छितो की माझा यावर विश्वास नाही किंवा अविश्वासही नाही. या शास्त्राचा अभ्यासक मात्र मी जरूर आहे आणि त्यात काही विलक्षण अनुभव ही मी घेतलेले आहेत.
ढोबळमानाने खालील प्रमाणे ग्रहांचे शरीरावर परिणाम असतात.
सूर्य :
पित्ताशय, वर्ण, पोट, रोग प्रतिरोधक क्षमतेची कमतरता, मेंदू विषयक रोग, डोळे, हृदय आणि अस्थी रोग, कुष्ठ रोग, ताप , चक्कर येणे, फिट येणे, रक्तस्त्राव इत्यादी
चंद्र :
हृदय आणि फुफुस संबधी रोग, डाव्या डोळ्याचे विकार, अनिद्रा, अस्थमा, किडनी संबधी रोग, मधुमेह, कावीळ, अपेंडिक्स, मानसिक रोग,
मंगळ:
जखम, विषबाधा, ताप, कापणे, भाजणे, लागणे, रक्तदाब, गाठी, कॅन्सर , मूळव्याध ,कुष्ठ, खाज येणे, मान आणि घसा संबंधी रोग, अपघात, फोड येणे,
बुध:
छाती आणि नसा संबंधी रोग,नाक चे रोग, ताप, त्वचेचे आणि तोंडाचे रोग, वेड लागणे, कावीळ, बोलण्याचे दोष, घसा, स्नायू रोग, अस्थीभंग इत्यादी ..
गुरु :
लिव्हर, किडनी संबंधी रोग, कावीळ, कान, दात, जीभ, डोके या संबंधी रोग, स्थूलता, मधुमेह , स्मरणशक्ती चे रोग, मज्जासंस्थेचे रोग, यकृत रोग, पचन संबंधी रोग इत्यादी ..
शुक्र :
दृष्टी संबंधी रोग, गळ्याचे रोग , चक्कर येणे, नंपुसकता, गुप्तरोग, मादक द्रव्यांमुळे होणारे रोग, कावीळ, अंतःस्रावी ग्रंथींचे रोग
शनी:
अशक्तपणा, पोट आणि गुडघे दुखी, दात आणि त्वचा संबंधी रोग, बहिरेपणा, खोकला, दमा, अपचन, स्नायू विकार मांसपेशीयांचे विकार, पक्षघात इत्यादी ..
राहू :
मेंदू चे विकार, अशक्तपणा, जंत, उंचावरून पडणे, वेडेपणा पशु किंवा जनावरे यांच्यापासून होणारी इजा, कुष्ठ रोग, कॅन्सर, तीव्र वेदना, पोटातील किडे, ऍलर्जी, विषारी वस्तूंपासून होणारे त्रास इत्यादी ..
केतू:
रक्ताचे, त्वचेचे दोष, वात विकार, दुर्बलता, आळशीपणा , न कळणारे रोग , कुत्र्याचे चावणे, शरीरावर ऍलर्जी आणि जखम होणे, सुस्ती येणे इत्यादी ...
जन्मपत्रिका म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मवेळेला आणि जन्मस्थानाला असलेली ग्रहस्थिती. यावरून त्या व्यक्तीची जन्मजात आरोग्य संपदा कशी असेल याचा अंदाज बांधता येतो. अर्थातच अतिशय गणिती असलेल्या या विषयात खालील गोष्टी संबंधित असतात.
१. पत्रिकेतील स्पष्ट ग्रहस्थिती
२. ग्रहाची खगोलशास्त्रीय स्थिती
३. प्रत्येक ग्रहाची नक्षत्र स्थिती
४. ग्रहाची अवस्था (बाल्य, तारुण्य, वार्धक्य)
५. ग्रह कुठल्या पादाने आला आहे
६. ग्रह, नक्षत्राच्या कुठल्या भागात आहे
७. ग्रहाचे एकमेकांशी होणारे योग्य, प्रतियोग
८. ग्रहांची अक्षवेदाअंश आणि षष्टी अंश स्थिती
असे व इतर अनेक पर्याय अभ्यासणे जरूर असते. येथे एक गोष्ट लाक्षत ठेवायला पाहिजे की पत्रिका व जोतिष हे भविष्याकरिता वापरले जाणे योग्य का अयोग्य हे म्हणणे मी मांडत नाही. किंबहुना या लेखाचा संबंध भविष्य विषयाशी अजिबात नाही. फक्त ग्रह स्थिती आणि शरीर स्थिती यांचा संबंध कसा मांडला आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे
ही झाली जन्म स्थिती. पुढची स्थिती पाहताना त्या वेळची ग्रहस्थिती आणि जन्म ग्रहस्थिती यांचा ताळमेळ बसवणे आवश्यक असते. त्या दोन्हीच्या संयोगातून त्या त्या वेळची शरीर स्थिती समजण्यास मदत होते.
ग्रहांच्या आणि पर्यायांनी शरीर स्वास्थ्याकरिता प्रत्येक ग्रहाच्या रंग, खडे, वस्त्र, फुले, वृक्ष असे सांगितले गेले आहे. या कलर थेरपी, अरोमा थेरपी, वनौषधी अशा विविध नैसर्गिक उपायांचा वापर आढळून येतो.
नऊ महा औषधी व ग्रह....ज्या ग्रहांच्या दोषामुळे जो विकार झाला आहे त्याचा नाश त्या ग्रहाचा वृक्ष करतो असे ज्योतिष वैद्यक शास्त्रात सांगितले आहे.
मांदार....रवी - केशरी रंग - माणिक
पळस...सोम - पांढरा रंग - मोती
खैर..मंगळ - लाल रंग - पोवळे
जाडेनबीरे.. बुध - निळा रंग - पाचू
पिंपळ...गुरू पिवळा रंग - पुष्कराज
उंबर...शुक्र - चित्र विचित्र रंग - हिरा
शमी...शनी - काळा रंग - नीलम
कळकी किंवा दुर्वा..राहू - निळा रंग - गोमेद
कुश(दर्भ)..केतू - काळा रंग - लसण्या
ऍलोपॅथी सारखेच या शास्त्रात ही गुंतागुंत बरीच आहे . चिकित्सेसाठी फक्त ग्रहस्थिती हीच पाया ठरते आणि एकच औषध न देता मिश्र उपचार करणे जरूर असते.
<<<कुठल्याही ग्रहाचा
<<<कुठल्याही ग्रहाचा मनुष्यजातीवर किव्वा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो याला काहीही पुरावा नाही. हे धादान्त खोटे, आणि दिशाभुल करणारे आहे. >>>>>>>
फारच धाडसी विधान. आपण बहुतेक कॉस्मिक रेज विषयी ऐकले नसावे. कित्येक हजार प्रकाशवर्ष दुरून येणारे हे रेज पृथ्वीवर बराच परिणाम करतात. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या ही काही परिणाम करतच असतात. आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींविषयी पूर्ण ज्ञान नाही. आणि त्यामुळेच आपण त्याला नाही म्हणणे हे चुकीचे आहे.>>>
------- कॉस्मिक रेज, ग्रॅव्हिटेशनल वेव्हज किव्वा कित्येक हजार प्रकाशवर्ष दुरून येणारे रेज ह्यान्चा शोध मनुष्यजातीला केव्हा लागला ?
माझ्या माहितीप्रमाणे हे सर्व आपल्याला मागच्या १२५ वर्षातच कळाले. हेन्री बॅक्वॅरेलने १८९५ मधे क्ष-रे चा शोध लावला आणि नव्या अध्यायाला सुरवात झाली.
<<ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या ही काही परिणाम करतच असतात.>>
------- काही परिणाम ? जर परिणाम असतील तर ते सर्वान्वर सारखेच आहेत. पृथ्वीचे (किव्वा गुरु, शनीचे) गुरुत्वबल प्रत्येकासाठी सारखेच आहे.
नैसर्गिक आपत्ती (त्सुनामी, पुर, भूकम्प) आल्यावर बहुतेक सर्वान्न्ना सारखाच त्रास होतो.... येथे जन्म कुठे झाला, त्यावेळी ग्रह-तारे यान्ची स्थिती किव्वा कुणी कुठल्या रन्गाचा खडा घातला आहे, ह्याला शुन्य अगदीच शुन्य महत्व आहे. गुरु / शनी ग्रह एकाला तारेल आणि दुसर्याला मारेल असे करणार नाही.
यानिमित्ताने माझा एक जुना लेख
यानिमित्ताने माझा एक जुना लेख माबोवर टाकलाय. इच्छुकांनी लाभ घ्यावा -- जाहिरात
>> काय फरक पडतो लाल, पिवळा,
>> काय फरक पडतो लाल, पिवळा, हिरवा, निळा रन्गाने? हे सर्व मोती शेवटी Calcium Carbonate आहे.
अख्खि पोस्ट भारि
आधी कळले तर गोरी(च) जोडिदारिन/गोरा(च) जोडिदार हवि /हवा असा आग्रह लोक सोडुन देतिल. मटेरिअल तर एकच आहे हाड अन मांस, रंगाशी काय घेनदे ण?
Pages