ज्योतिष वैद्यक

Submitted by अविनाश जोशी on 7 November, 2017 - 05:37

ज्योतिष वैद्यक
जन्माच्या वेळेला असलेली ग्रहस्थिती आणि सद्य ग्रहस्थिती यावर आधारित वैद्यकीय चिकित्सा सांगितलेली आहे. मी प्रथमच हे सांगू इच्छितो की माझा यावर विश्वास नाही किंवा अविश्वासही नाही. या शास्त्राचा अभ्यासक मात्र मी जरूर आहे आणि त्यात काही विलक्षण अनुभव ही मी घेतलेले आहेत.
ढोबळमानाने खालील प्रमाणे ग्रहांचे शरीरावर परिणाम असतात.
सूर्य :
पित्ताशय, वर्ण, पोट, रोग प्रतिरोधक क्षमतेची कमतरता, मेंदू विषयक रोग, डोळे, हृदय आणि अस्थी रोग, कुष्ठ रोग, ताप , चक्कर येणे, फिट येणे, रक्तस्त्राव इत्यादी

चंद्र :
हृदय आणि फुफुस संबधी रोग, डाव्या डोळ्याचे विकार, अनिद्रा, अस्थमा, किडनी संबधी रोग, मधुमेह, कावीळ, अपेंडिक्स, मानसिक रोग,

मंगळ:
जखम, विषबाधा, ताप, कापणे, भाजणे, लागणे, रक्तदाब, गाठी, कॅन्सर , मूळव्याध ,कुष्ठ, खाज येणे, मान आणि घसा संबंधी रोग, अपघात, फोड येणे,

बुध:
छाती आणि नसा संबंधी रोग,नाक चे रोग, ताप, त्वचेचे आणि तोंडाचे रोग, वेड लागणे, कावीळ, बोलण्याचे दोष, घसा, स्नायू रोग, अस्थीभंग इत्यादी ..

गुरु :
लिव्हर, किडनी संबंधी रोग, कावीळ, कान, दात, जीभ, डोके या संबंधी रोग, स्थूलता, मधुमेह , स्मरणशक्ती चे रोग, मज्जासंस्थेचे रोग, यकृत रोग, पचन संबंधी रोग इत्यादी ..
शुक्र :
दृष्टी संबंधी रोग, गळ्याचे रोग , चक्कर येणे, नंपुसकता, गुप्तरोग, मादक द्रव्यांमुळे होणारे रोग, कावीळ, अंतःस्रावी ग्रंथींचे रोग

शनी:
अशक्तपणा, पोट आणि गुडघे दुखी, दात आणि त्वचा संबंधी रोग, बहिरेपणा, खोकला, दमा, अपचन, स्नायू विकार मांसपेशीयांचे विकार, पक्षघात इत्यादी ..

राहू :
मेंदू चे विकार, अशक्तपणा, जंत, उंचावरून पडणे, वेडेपणा पशु किंवा जनावरे यांच्यापासून होणारी इजा, कुष्ठ रोग, कॅन्सर, तीव्र वेदना, पोटातील किडे, ऍलर्जी, विषारी वस्तूंपासून होणारे त्रास इत्यादी ..

केतू:
रक्ताचे, त्वचेचे दोष, वात विकार, दुर्बलता, आळशीपणा , न कळणारे रोग , कुत्र्याचे चावणे, शरीरावर ऍलर्जी आणि जखम होणे, सुस्ती येणे इत्यादी ...
जन्मपत्रिका म्हणजे त्या व्यक्तीच्या जन्मवेळेला आणि जन्मस्थानाला असलेली ग्रहस्थिती. यावरून त्या व्यक्तीची जन्मजात आरोग्य संपदा कशी असेल याचा अंदाज बांधता येतो. अर्थातच अतिशय गणिती असलेल्या या विषयात खालील गोष्टी संबंधित असतात.
१. पत्रिकेतील स्पष्ट ग्रहस्थिती
२. ग्रहाची खगोलशास्त्रीय स्थिती
३. प्रत्येक ग्रहाची नक्षत्र स्थिती
४. ग्रहाची अवस्था (बाल्य, तारुण्य, वार्धक्य)
५. ग्रह कुठल्या पादाने आला आहे
६. ग्रह, नक्षत्राच्या कुठल्या भागात आहे
७. ग्रहाचे एकमेकांशी होणारे योग्य, प्रतियोग
८. ग्रहांची अक्षवेदाअंश आणि षष्टी अंश स्थिती
असे व इतर अनेक पर्याय अभ्यासणे जरूर असते. येथे एक गोष्ट लाक्षत ठेवायला पाहिजे की पत्रिका व जोतिष हे भविष्याकरिता वापरले जाणे योग्य का अयोग्य हे म्हणणे मी मांडत नाही. किंबहुना या लेखाचा संबंध भविष्य विषयाशी अजिबात नाही. फक्त ग्रह स्थिती आणि शरीर स्थिती यांचा संबंध कसा मांडला आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे
ही झाली जन्म स्थिती. पुढची स्थिती पाहताना त्या वेळची ग्रहस्थिती आणि जन्म ग्रहस्थिती यांचा ताळमेळ बसवणे आवश्यक असते. त्या दोन्हीच्या संयोगातून त्या त्या वेळची शरीर स्थिती समजण्यास मदत होते.
ग्रहांच्या आणि पर्यायांनी शरीर स्वास्थ्याकरिता प्रत्येक ग्रहाच्या रंग, खडे, वस्त्र, फुले, वृक्ष असे सांगितले गेले आहे. या कलर थेरपी, अरोमा थेरपी, वनौषधी अशा विविध नैसर्गिक उपायांचा वापर आढळून येतो.

नऊ महा औषधी व ग्रह....ज्या ग्रहांच्या दोषामुळे जो विकार झाला आहे त्याचा नाश त्या ग्रहाचा वृक्ष करतो असे ज्योतिष वैद्यक शास्त्रात सांगितले आहे.

मांदार....रवी - केशरी रंग - माणिक
पळस...सोम - पांढरा रंग - मोती
खैर..मंगळ - लाल रंग - पोवळे
जाडेनबीरे.. बुध - निळा रंग - पाचू
पिंपळ...गुरू पिवळा रंग - पुष्कराज
उंबर...शुक्र - चित्र विचित्र रंग - हिरा
शमी...शनी - काळा रंग - नीलम
कळकी किंवा दुर्वा..राहू - निळा रंग - गोमेद
कुश(दर्भ)..केतू - काळा रंग - लसण्या
ऍलोपॅथी सारखेच या शास्त्रात ही गुंतागुंत बरीच आहे . चिकित्सेसाठी फक्त ग्रहस्थिती हीच पाया ठरते आणि एकच औषध न देता मिश्र उपचार करणे जरूर असते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा पण मला लेख अजिबातच कळला नाही Sad शिवाय फार घाईत संपवल्यासारखा वाटला.
अजून विस्तृत स्वरूपात लिहू शकाल का? (माहिती म्हणून)

लेख त्रोटक वाटला. ग्रहांचे रंग, खडे, वनस्पती आणि संबंधित रोगांची नावे यांचे संकलन आहे.
यावर काय प्रतिसाद देणार ?

विस्तृत स्वरूपात लिहू शकाल का? >> +१
एड्स किंवा प्राचिन काळी माहित नसलेल्या रोगांवर ठोकताळे कसे मांडतात ते ही वाचायला आवडेल.
अंतःस्रावी ग्रंथींचे रोग या आणि अशा कॅच ऑल बकेट्स आहेत अर्थात. पण सविस्तर लिहा.

मी प्रथमच हे सांगू इच्छितो की माझा यावर विश्वास नाही किंवा अविश्वासही नाही. या शास्त्राचा अभ्यासक मात्र मी जरूर आहे आणि त्यात काही विलक्षण अनुभव ही मी घेतलेले आहेत.>>>>>> Lol काहीच कळलं नाही. म्हणजे
विश्वास आहे का --- नाही
अविश्वास आहे का --- नाही
अभ्यासक आहे-- हो. का? मग एक तर विश्वास आहे का, ह्याचं उत्तर नाही तरी देऊ नका.

उजव्या डोळ्याचे विकार कुठल्या ग्रहामुळे होतात? का उजव्या डोळ्याला विकारच होत नसत हे 'शास्त्र' विकासित झाले तेव्हा?

सुर्य, चन्द्राचे परिणाम पृथ्वीवर होतात हे मान्य आहे, प्राथमिक शाळेत प्रत्येकाला शिकायला मिळते. उदा - सुर्यापासुन आत्यन्तिक गरजेची आणि हवी असलेली ऊर्जा आपल्याला मिळते, समुद्राला येणारी भरती-ओहोटी हे चन्द्र- सुर्य- पृथ्वीचे गुरुत्व यामुळे.

कुठल्याही ग्रहाचा मनुष्यजातीवर किव्वा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो याला काहीही पुरावा नाही. हे धादान्त खोटे, आणि दिशाभुल करणारे आहे.

<<ज्या ग्रहांच्या दोषामुळे जो विकार झाला आहे त्याचा नाश त्या ग्रहाचा वृक्ष करतो असे ज्योतिष वैद्यक शास्त्रात सांगितले आहे.>>
----- ग्रहान्चा दोष कसा काय ? ते तर निर्जिव दगड आहेत किव्वा निव्वळ वायूचे गोळे आहे. शनी ग्रह आपल्यापासुन १२५ कोटी कि मी वर आहे त्याचा कसला डोम्बल्याचा परिणाम होतो आपल्यावर.

<<ऍलोपॅथी सारखेच या शास्त्रात ही गुंतागुंत बरीच आहे . चिकित्सेसाठी फक्त ग्रहस्थिती हीच पाया ठरते आणि एकच औषध न देता मिश्र उपचार करणे जरूर असते.>>
------ ऍलोपॅथी आणि वरिल प्रकाराची तुलना अशास्त्रिय आहे. ऍलोपॅथी मधे कुठलाही दावा पडताळता येतो, चाचण्या घेता येतात... वरिल प्रकारात तसे करता येत नाही.

खडा, त्याचा रन्ग, आणि आरोग्य यान्चा पण सम्बन्ध नाही.

>>ग्रहान्चा दोष कसा काय ? ते तर निर्जिव दगड आहेत किव्वा निव्वळ वायूचे गोळे आहे.

हे तुम्ही राहू/केतू बद्दल बोलत आहेत का? पहा या विषयातील तुमचं ज्ञान किती तुटपुंज आहे.

वरील विवेचन कळले.
कुंडलीचे प्रत्येक स्थान/भावाप्रमाणे शरीराचे कोणते अवयव/विकार बघितले जातात? जसे की प्रथम स्थान - मस्तक इत्यादी?

हे तुम्ही राहू/केतू बद्दल बोलत आहेत का? पहा या विषयातील तुमचं ज्ञान किती तुटपुंज आहे.
>>>
अहो ते ग्रहांबद्दल बोलत आहेत. त्यात राहू केतू कुठून आले?

{{अहो ते ग्रहांबद्दल बोलत आहेत. त्यात राहू केतू कुठून आले?}}

>> ढोबळमानाने खालील प्रमाणे ग्रहांचे शरीरावर परिणाम असतात.
या ग्रहांच्या लिस्ट मधे राहु, केतु, चंद्र, सुर्य हे सगळे आहेत.

या विषयांचा कित्येक वर्षे चोथा होऊनही अजून काही बेसिक कन्सेप्ट्स सगळ्यांना का माहिती नाहीत?

ज्योतिषशास्त्राप्रमाणे "ग्रह म्हणजे जे फिजिकल ग्रह आहेत ते मानवी जीवनावर परिणाम करत नाहीत". ग्रहांची पोजिशन हे एक क्यु आहे फक्त. जसे रस्त्यावरचे अंतराचे दगड, आणि दिशादर्शक खुणा असतात तशा. उद्या कोणी दिशादर्शक खुणांनीच रस्ते ठरवले आहेत असे म्हणाले तर जितका अडाणीपणा वाटेल तितकाच त्या आकाशातल्या वायु-मातीच्या गोळ्यांचा काय प्रभाव पडतो का असे विचारणे हाही एक मूर्खपणाच ठरेल.

प्रत्येक क्षेत्राची एक टर्मिनॉलॉजी असते तशीच ज्योतिषाची आहे. भले कोणी ज्योतिष मानत नसेल पण त्या टर्मिनॉलॉजीमुळे ज्योतिषाची, ग्रहतार्यांची काही आगापिच्छा माहित नसतांना खिल्ली उडवत असेल तर जरा विचित्र वाटतं.

(ग्रहांचा प्रभाव कमी करु, याची पुजा करु, त्याची शांती करु वगैरे सांगणारे ज्योतिषी लोक भोंदू असतात. माझ्या माहितीतले खरे ज्योतिषी कधीच असे सांगत नाहीत. फार तर नामजप, मंत्रजप करायला सांगतात. -जेणेकरुन कठीण काळात श्रद्धा दृढ राहून मानसिक ताप कमी होतील.)

सूर्य :
पित्ताशय, वर्ण, पोट, रोग प्रतिरोधक क्षमतेची कमतरता, मेंदू विषयक रोग, डोळे, हृदय आणि अस्थी रोग, कुष्ठ रोग, ताप , चक्कर येणे, फिट येणे, रक्तस्त्राव इत्यादी
चंद्र :
हृदय आणि फुफुस संबधी रोग, डाव्या डोळ्याचे विकार, अनिद्रा, अस्थमा, किडनी संबधी रोग, मधुमेह, कावीळ, अपेंडिक्स, मानसिक रोग,

>>>>
आता ग्रहस्थितीमुळे एखाद्या व्यक्तिला सूर्य त्रासाचा आहे, म्हणजे तिला त्यायोगाने येणारे सगळेच विकार होतात का?. एकाच वेळेस होतात का ? वेगवेगळ्या वेळेस होतात?
चंद्रामुळे वा इतर ग्रहांमुळे होणारे विकार होणार नाहीत असा अर्थ घ्यायचा का?.

जन्मस्थितीत हे ग्रह कोणत्या घरात असता त्याचा परिणाम दिसतो

हे फारच ढोबळमानी आहे. त्यामुळे याचा अर्थ कसा घ्यायचा याचा खुलासा लेखात होत नाही तो व्हावा ही विनंती.

वर दिलेल्या ग्रह आणि अवयवांच्या यादीत एक अवयव दोन दोन ग्रहांना दिलेला आहे. असे का?
उदा:
मेंदू विषयक रोग - सुर्य, राहू
डोळे : सुर्य तर नुसताच डावा डोळा : चंद्र
किडनी: गुरु, चंद्र

माझ्या माहितीतले खरे ज्योतिषी कधीच असे सांगत नाहीत. फार तर नामजप, मंत्रजप करायला सांगतात. -जेणेकरुन कठीण काळात श्रद्धा दृढ राहून मानसिक ताप कमी होतील.
>>>>>>>>

मग यात ज्योतिष काय? त्यांना ज्योतिषी का म्हणत आहात? ते देखील खरे..

माझा या शास्त्रावर विश्वास आहे. भले एखाद्या ढोंगी ज्योतिषावर विश्वास असेल नसेल पण शास्त्रावर आहे.
हे ग्रह तारे आपल्यापासून हजारो कोस दूर का असेना, यातून निघणारे वायू प्रकाश गुरुत्वाकर्षण उल्का धूमकेतू ईत्यादी आपल्यावर प्रभाव टाकू शकतातच.

दूर कश्याला जा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळेही आपल्यावर परीणाम होतोच. समजा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आताच्या निम्मे केले, तर नक्कीच माणसाचे आयुष्य दुप्पट होईल. आणि व्हायसे वर्सोवा ..

समजा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आताच्या निम्मे केले, तर नक्कीच माणसाचे आयुष्य दुप्पट होईल. आणि व्हायसे वर्सोवा ..>>
बाळा तू नको कायतरी शोध लावू! नायतर खरेखरे शोध लाव

.हे फारच ढोबळमानी आहे. त्यामुळे याचा अर्थ कसा घ्यायचा याचा खुलासा लेखात होत नाही तो व्हावा ही विनंती.>> +१

हा लेख जोतिष वैद्यकावरचा आहे . भविष्याशी याचा काडीमात्र सबंध नाही. जोतिष याचा एक अर्थ ग्रह, तारे, ब्रह्माण्ड असा ही आहे. यावर आधारलेले वैदयकिय शास्त्र म्हणजे जोतिष वैद्यक.
१. श्रीयुत नाना कळा यांनी लिहिल्याप्रमाणे प्रत्येक शास्त्राची एक परिभाषा असते. त्या विषयाला ती लागू पडते. दुसऱ्या शास्त्रात ती लागू पडेलच असे नाही. या शास्त्रात सर्वच ग्रह आहेत जरी ते खगोल शास्त्रीय दृष्ट्या ग्रह, उपग्रह, तारे असले तरी.
२. हा विषय मी सखोलरीत्या लिहीन
३. राहू आणि केतू हे तर काल्पनिक बिंदू आहेत
४. कशाचा परिणाम कशावर होईल हे सांगणे अवघड आहे. हवामान शास्त्रातील बटरफ्लाय इफेक्ट फारच प्रसिद्ध आहे. तो खालील प्रमाणे ...
Lorenz to realize that long-term weather forecasting was doomed. His simple model exhibits the phenomenon known as "sensitive dependence on initial conditions." This is sometimes referred to as the butterfly effect, e.g. a butterfly flapping its wings in South America can affect the weather in Central Park.
५. त्यामुळे खडे , रंगांचा परिणाम होताच नाही असे म्हणणे अज्ञानजनक आहे. कदाचित तुमचा याच्यावर विश्वास नसेल पण त्यामुळे शास्त्रच चुकीचे आहे असे होत नाही.
६. तसे असते तर प्रकाशाला वस्तुमान सापडलेच नसते आणि दगडातील स्पंदने ही कळली नसती.

१. काही माहित नसलेले रोग आणि रोगांचे अनुमान वेगळ्या लक्षणांनी होते. उदा . कॅन्सर हा रोग आयुर्वेदातही नाही. अर्बुद म्हणजे गाठी येणे अशा स्वरूपाचे रोग आहेत.
२. अंतःस्रावी ग्रंथींचे रोग म्हणजे the endocrine system, its diseases, and its specific secretions known as hormones. ही कॅच ऑल बकेट नाही.
३. एका डोळ्याचा रोग हा अर्धशिशी च्या जवळपास आहे . सर्व रोग ढोबळमानाने दिलेले आहेत. त्याच्यातील बारकावे मी नंतर लिहीनच.

कुठल्याही ग्रहाचा मनुष्यजातीवर किव्वा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो याला काहीही पुरावा नाही. हे धादान्त खोटे, आणि दिशाभुल करणारे आहे. >>>>>>>
फारच धाडसी विधान. आपण बहुतेक कॉस्मिक रेज विषयी ऐकले नसावे. कित्येक हजार प्रकाशवर्ष दुरून येणारे हे रेज पृथ्वीवर बराच परिणाम करतात. ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ह्या ही काही परिणाम करतच असतात. आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींविषयी पूर्ण ज्ञान नाही. आणि त्यामुळेच आपण त्याला नाही म्हणणे हे चुकीचे आहे.

समजा पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आताच्या निम्मे केले, तर नक्कीच माणसाचे आयुष्य दुप्पट होईल. >>> माणसाने पृथ्वी ग्रहच नष्ट करून गुरूत्वाकर्षण नसलेल्या अवकाशात तरंगत राहावे. म्हणजे मग शून्य गुरूत्वाकर्षणात माणसाला अमरत्व प्राप्त होईल. माणसाची शरीरे नष्ट होऊन जातील, पण आत्म्याचे अमरत्व कायम राहील, अश्या प्रकारे आमच्या उपनिषदांत हेच विज्ञान हजारो वर्षे आधीच लिहून ठेवलेले आहे. वरचे सर्व ग्रहही नष्ट करून टाकावेत, म्हणजे ना रहेगा बास ना बजेगी बासुरी ह्या न्यायाने शरीरही नाही, आणि ग्रहांचा त्यावर परिणाम होऊन होणारे रोगही नाहीत.

माणसाने पृथ्वी ग्रहच नष्ट करून गुरूत्वाकर्षण नसलेल्या अवकाशात तरंगत राहावे. म्हणजे मग शून्य गुरूत्वाकर्षणात माणसाला अमरत्व प्राप्त होईल.
>>
अहो स्वर्ग पण असाच अवकाशात कुठेतरी तरंगत असतो ना? तिथे राहणारे सर्व देव अमरच असतात. Wink

Man you made my day....
>>>
धन्यवाद Happy

@ सोनू,
त्यातील निम्मे आणि दुप्पट या नेमक्या गुणोत्तराबद्दल संशोधन करावे लागेल. मात्र लॉजिक चुकले नाहीये. गुरुत्वाकर्षण नामक अद्रुश्य शक्ती सतत आपल्या शरीराला खेचत असते तर ते खंगणारच. मला वाटते की गुरुत्वाकर्षण कमी झाले तर झाडांची उंची सुद्धा नेहमीपेक्षा वाढेल.

<< त्यामुळे खडे , रंगांचा परिणाम होताच नाही असे म्हणणे अज्ञानजनक आहे. कदाचित तुमचा याच्यावर विश्वास नसेल पण त्यामुळे शास्त्रच चुकीचे आहे असे होत नाही.>>
-------- खड्यान्ना रन्ग कसा मिळतो, कोण ठरवतो, तो तसाच का आहे हे मिनरलॉजी (खनिज विज्ञान) या विषयात अगदी सविस्तर पणे वाचायला मिळते.

तुम्ही खड्याला रुबी म्हणा किव्वा सफायर म्हणता, दोन्ही खडे aluminum oxide Al2O3च आहेत पण दोघान्चा रन्ग अगदीच भिन्न आहे. Al2O3 मधे क्रोमियम Cr मिसळल्यावर रुबी लालसर रन्ग मिळतो तर अन्य रन्गाच्या (Al2O3) खड्याला सफायर म्हणतो. यात मुख्य निळा रन्ग आहे. विविध रन्ग हे लोह Fe, टायटॅनियम Ti, कॉपर Cu, मॅग्नेशियम Mg मिसळल्यावर इतर (पिवळा, निळा, हिरवा, नारन्गी) रन्ग मिळतात. पण
बेस मटेरियल तेच म्हणजे Al2O3 आहे. मी तुम्हाला हवा असलेल्या रन्गाचा खडा Al2O3 मधुन देतो. थोडे खर्चिक असेल. हे सर्व रन्ग निसर्गात मिळतात.

क्वार्ट्झ (स्फटिक) SiO2 हे अजुन एक अत्यन्त महत्वाचे खनिज आहे. यामधे पण हवे ते रन्ग मिळतात.
https://en.wikipedia.org/wiki/Quartz

कुठल्याही खनिजाची माहिती येथे मिळेल. पानाच्या शेवटी काही फोटो आहेत, ते जरी विविध रन्गान्चे असतील पण बेस मटेरियल SiO2 तेच आहे. विविध रन्ग हे एकाच खनिजातुन मिळतात.
http://www.minerals.net/gemstone/quartz_gemstone.aspx

मोती pearl - विविध रन्गान्चे मोती निसर्गात बघायला मिळतात. काय फरक पडतो लाल, पिवळा, हिरवा, निळा रन्गाने? हे सर्व मोती शेवटी Calcium Carbonate आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Pearl

खडे आणि त्यान्ना असलेला रंन्ग यान्चा (ते बाळगणार्‍या) मनुष्याच्या आरोग्यावर शुन्य परिणाम होतो. निव्वळ डोळ्यान्ना आनन्द मिळतो या पलिकडे खुप महत्व नाही आहे या दगडान्ना (शेवटी दगडच ते). फरक पडतच असेल तर बाळगणार्‍याच्या मानसिक समाधानात आहे. माझ्याकडे असलेला दगड / खडा फार कमी लोकान्कडे आहे याचा. जेव्हढा दगड दुर्मिळ, तेव्हढी त्याची किम्मत जास्त आणि म्हणुन किम्मत जास्त. विकणारे विकतात, विकत घेणारे घेतात...

तसे असते तर प्रकाशाला वस्तुमान सापडलेच नसते आणि दगडातील स्पंदने ही कळली नसती.>>>>> म्हणजे काय नेमकं?

Pages