लग्नाच्या आधी एक दोनदा संदीपकडे त्याच्या एका मित्राचा डबा राहिला होता आणि त्याच्या बायकोने वारंवार त्याची आठवण करून दिली होती. तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय? पुढे लग्नानंतरही आईने काही स्टीलच्या वाट्या वगैरे दिले होते आणि त्यावर आवर्जून माझं नाव टाकलं होतं, तर काही ठिकाणी फक्त नवऱ्याचंच. त्या नावात किती शुद्धलेखनाच्या चुका होत्या ते सांगायला नकोच. पण मी आईला म्हटलं होतं, अगं नाव कशाला टाकायला पाहिजे भांड्यांवर? मी तर त्यावर चारोळी पण केली होती:
"आयुष्यभर संसाराचं गाडं
दोघांनी मिळून रेटलेलं
तरी मुलांपासून भांड्यांपर्यत
सगळीकडे, त्याचंच नाव टाकलेलं."
भारी आहे ना? असो.
जशी संसारात रुळले, या सर्व गोष्टींचा अनुभव येत राहिला आणि भांडी हा जरा जास्तच जिव्हाळ्याचा विषय आहे हे कळलं. शिकागो सोडून पुण्याला येताना अनेक भांडी सोडून द्यावी लागली किंवा मित्र-मैत्रिणींना दिली. तेव्हा अगदी वाईट वाटत होतं, आपलं म्हणून असलेलं एखादं भांडं किती जीव लावतं वगैरे वाटून. कितीही सामान जास्त झालं तरी मुलांची आवडीची वाटी, किंवा ताट हे मात्र आवर्जून घेतलं होतं. पुण्यात राहिल्यावर अनेकदा अनेक लोकांकडे पदार्थांची देवाण घेवाण झाल्यावर त्यावर टाकलेली नावंच उपयोगी पडली. आजही अनेक भांडी मी जपून ठेवली आहेत. त्यात एखादं माहेरहून आलेलं असेल तर बासच ! माझं जाऊ दे, मी लहानपणी ज्या छोट्या ताटलीत जेवायचे ती ताटलीही आईकडे अजून आहे. म्हणजे बघा.
भांडी कितीही जवळची असली तरी ती घासणे हा मात्र राष्ट्रीय पातळीवरचा विषय होऊ शकतो. भांड्याला मावशी ३ दिवस आल्या नाहीत तर ...... ?? ऐन पाहुणे यायच्या दिवशीच तिने कलटी दिली तर? असे गहन प्रश्न मी इथे काढणार नाही. माझे प्रश्न साधे आहेत? पाहुणे म्हणून एखाद्याकडे गेलेले असताना तुम्हाला भांडी घासायला लागली तर? सुनबाई घरात असताना सासूने भांडी घासली तर? बायको घरात असताना नवऱ्याला भांडी घासायला लागली तर? एकूण काय तर भांडी घासणे हे कमीपणाचे काम आहे. अगदी हिंदी पिक्चर मधेही निरुपा रायला गरीबीची पराकाष्ठा म्हणजे काय तर दुसऱ्यांच्या घरची भांडी घासायला लागणे. आजकाल इतका त्यावेळी मावशींना भाव नसल्याने तसे सीन्स घेतले असावेत.
जोक्स अपार्ट, बायकांनीच भांडी घासली पाहिजेत असा अलिखित नियम कधी बनला? पूर्वी त्या घराबाहेर पडत नसत, किंवा कामाची विभागणी घरची स्त्रीनं आणि बाहेरची पुरुषांनी अशी केल्यामुळे त्या करत असतील. पण आज, नोकरी करून घरी आल्यावरही मावशी आल्या नसतील तर भांडी कोण घासतं? बाई आली नाहीये याचा त्रास स्त्रीला होतो का पुरुषाला? पुरुषांसाठी हा मानाचा विषय का आहे?
आमच्या घरी डिशवॉशर आहे, ज्यात भांडी खरकटं काढून, विसळून लावावी लागतात. जेवणं झाली की मुलं पुस्तकं वाचत बसतात. मी भांडी विसळून देते आणि तो मशीनमध्ये व्यवस्थित रचून ठेवतो. त्याने विसळलेली मला आवडत नाही तर मी रचलेली भांडी त्याला आवडत नाहीत. एकूण काय, तर आम्ही आमच्या रोलमध्ये खूष आहोत. तरीही नवरा भांडी घासतो, किंवा मदत करतो यात ग्रेट काय आहे? अनेकदा, तीन तास उभे राहून केलेल्या स्वयंपाकासाठी मला मिळणाऱ्या कौतुकापेक्षा तो भांडी आवरतो किंवा मदत करतो याचंच कौतुक लोकांना जास्त असतं? एकदा तर एका ठिकाणी, 'मी मदत करते म्हटलं' तर 'राहू दे, तुला सवय नाहीये' असंही ऐकायला लागलं आहे. नवरा म्हणतो,'सोडून दे'. मी म्हणते, का सोडून द्यायचं? असं काय आहे भांडी घासण्यात की जे मी केलं नाही म्हणून मला ऐकून घ्यावं लागतं आणि तू करतोस म्हणून तुझं कौतुक होतं?
घरात कुठली भांडी कुठे आहेत, हे नवऱ्याला माहित आहे यावरही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे? म्हटलं, १० बाय १२ च्या किचनमध्ये मोजून ८-१० कपाटं, त्यात कुठलं भांडं कुठे आहे हे घरात राहून माहित नसावं एखाद्याला? असं असेल तर घरात राहता की हॉटेलात असा प्रश्न विचारला पाहिजे. मी म्हणतच नाही की भांडी घासणे हे काही महान कार्य आहे. जेवण करतो तर मग भांडीही घासावीच लागणार? नाईलाज म्हणून का होईना ते करावंच लागतं. उलट जेवण झाल्यावर तितकीच हालचालही होते म्हणून अनेकदा आम्ही कितीही कंटाळा आला तर उरकून घेतो. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. नाईलाजाने का होईना करावं तर लागतंच. पण ते बायकांनीच करावं असं कुठे म्हटलंय?
आजही आपल्याकडे हे कमीपणाचं काम म्हणून घरच्या बाईला करावं लागतं. अनेकदा पुरुष स्वतःचं ताट उचलूनही सिंकमध्ये टाकत नाहीत. भारतात ही असमानता तर मी पाहिलीच आहे. पण अमेरिकेत राहूनही अनेक लोकांनी जे प्रश्न विचारलेत किंवा आश्चर्य व्यक्त केलं आहे त्यावरून वाटतं की कितीही शिका, बाहेर पडा, नोकरी करा नाहीतर अजून काही, लोकांचे विचार मात्र बदलत नाहीत. ही असमानता मात्र कधी कमी होणार नाही. ती अशा छोट्या छोट्या गोष्टींतून दिसतंच राहते. गेल्या काही दिवसांपासून यावर जास्तच अनुभव आले म्हणून शेवटी लिहिलंच.
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
हो भांडी घासणे हे पुरुषांना
हो भांडी घासणे हे पुरुषांना आणि त्यांना डोक्यावर बसवून ठेवलेल्या बायकांना कमीपणाचे वाटते.
माझा मुलगा घरात बरीच मदत करतो. भाजी निवडणे, कधी कणीक भिजवणे, झाडून काढणे, पण भांडी घासायचा त्याला जाम कंटाळा! आणि तो घरात भांडी घासतो, मला मदत म्हणून का होईना, हे त्याच्या फ्रेंडसर्कलमधे बोलायचे नाही.
अनेकदा आम्ही कितीही कंटाळा आला तर उरकून घेतो. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. >> हे अगदी खरंय! सकाळीच्या फ्रेश मूडमधे तो खरकट्या भांड्यांचा ढिग दिसला की वैताग येतोच. त्यापेक्षा रात्रीच आवरुन सगळे साफ केले की सकाळी स्वच्छ किचन पाहून खूप मस्त वाटते.
आमच्याकडे जसे जमेल तसे तो
आमच्याकडे जसे जमेल तसे तो तो भांडी घासतो; जसा ज्याला ( त्याला/मला) . आधी मला, नवर्याने घासलेली भांडी अजिबातच आवडत नसे. रोज भांडण. मला डबल काम.. त्याने घासली तरी मी घासणे होते.
>>>>. शिवाय सकाळी पसरलेला कट्टा पाहून चिडचिड होते ते वेगळंच. <<<<<
रात्रीचा ओटा स्वच्छ असलाच पाहिजे.. सकाळी मला ते आवरणे नकोसे वाटतेच.
पण आता इतका मोठा इस्स्श्यु नाहीये.. ट्रेनिंग दिलेय.
छान लिहील आहेस. निदान अजुन एक
छान लिहील आहेस. निदान अजुन एक पीढी तरी हे असच चालणार बहुतेक.
देवाच्या आणि सासुबाईच्या
देवाच्या आणि सासुबाईच्या क्रुपेने आमच्या घरी या बाबतीत आलबेल
.
नवरा आणि गरज पडली तर साबुही भांडी घासतात .
घासलेली भांडी पूसून जागेवर ठेवणं हे काम नवर्याला अजिबात आवडत नाही .
पण साबु ते काम आवडीने करतात . आता लेकही भांडी पूसायला मदत करतो .
मुळातच , सिन्क मध्ये भांड्याचा ढीग पडलेला साबाना आणि आता मलाही आवडत नाही . ५-६ भांडी सिन्कमध्ये पडली की लगेच घासून , धुवून हातावेगळी करायची सवयच लागली आहे आता.
किचनमध्ये काम आटपल्यावर , ओटा स्वच्छ पूसून , भांडी घासून सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवायची साबांची शिस्त आहे पहिल्यापासून .
सुरुवातीला जाचक वाटायच सगळं , पण आता मलाच पसारा आवडत नाही .
तुमचे सगळे लेख sexist कसे
तुमचे सगळे लेख sexist कसे असतात.. पुरुष विरोधी ...
लेख ठीक आहे, पण शिर्षक आणि
लेख ठीक आहे, पण शिर्षक आणि लेख एकमेकाला विसंगत वाटले.
जुना झाला हो विषय.. आता
जुना , चावून चोथा झाला हो हा विषय.. आता भारतात तरी मोलकरीण नाही आली तर कोणीही घासते भांडी,, कुठे कुठे असतो इगो.. पुरुषांनी नाही घासू.. इ.इ. असे तर प्रत्येक कामाच्या बाबतीत होईल एकेक लेख.. असो.. हेमावैम.. तुम्ही लिहीत राहावे, तसे प्रसन्न असते तुमचे लिखाण..
लेख छान पण जनरलाईज्ड वाटला,
लेख छान पण जनरलाईज्ड वाटला, सर्वच पुरुषांना असे नाही वाटत. आमच्याकडे मी व माझे वडील दोघांनाही भांडी घासणे आवडते व मनापासून करतो.
लग्नाच्या आधी एक दोनदा
लग्नाच्या आधी एक दोनदा संदीपकडे त्याच्या एका मित्राचा डबा राहिला होता आणि त्याच्या बायकोने वारंवार त्याची आठवण करून दिली होती. तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय? पुढे लग्नानंतरही ...
म्हणजे लग्नाआधीही तुमचा नवर्यावर इतका प्रभाव होता, की लोक तुमच्या थ्रु त्याला ॲप्रोच होत? शाबास
अगं नाव कशाला टाकायला पाहिजे
अगं नाव कशाला टाकायला पाहिजे भांड्यांवर? >> ह्याचे उत्तर देवू शकते - स्टीलची उत्तम भांडी महाग असतात पण टीकतातही अगदी तीन पिढ्या. घरात प्लास्टीक किंवा डिस्पोजेबलचा वापर फार नसेल तर डबे भांडी शेजारी-पाजारी, नातेवाईक, मित्र इ. कडे दिली जातात. नाव असेल तर ओळखायला सोपे पडते. इको-फ्रेंडली फ्रुगल राहायचे असेल तर नाव टाकायला पर्याय नाही.
नेहमीप्रमाणे प्रसन्न शैलीतील
नेहमीप्रमाणे प्रसन्न शैलीतील लेख.
तेव्हा वाटलं, इतके डबे असतात लोकांकडे, एका डब्याने लगेच काय होणारेय?>>>>>> असं नाही हां! आपला डबा आपल्या घरी आला की मस्त वाटते.(आठवा लाकूड्तोड्याची गोष्ट)तसेच दुसर्याचा डबा त्याच्या घरी गेला की पण रिलॅक्स वाटते.तसेही देवाणघेवाण आवडत नाहीच.अपवाद फक्त सरसोंका सागचा! ही घेवाण चालते.
आमच्या घरी तिघेही भांडी घासतो,कामवाली,नवरा,मी.अर्थात वेगवेगळ्या वेळी.
घरगुती लिखाण बोअर होते.
घरगुती लिखाण बोअर होते.
आमच्या घरी तिघेही भांडी घासतो
आमच्या घरी तिघेही भांडी घासतो,कामवाली,नवरा,मी.<<< अर्थात वेगवेगळ्या वेळी म्हणालीस तर लगेच तिघही निरुपा रॉय सारखी एका रांगेत मोठी मोठी लग्नात वापरतात तशी भांडी घेउन बसलेले डोळ्या समोर आलेत
तुमच्याच आधीच्या बर्याच लेखात
तुमच्याच आधीच्या बर्याच लेखात आलेलाच मुद्दा आहे.
तेच ते नवर्याची मदत, लोकांचं बोलणं, असमानता वै वै
तरीही... रांधा वाढा असं शीर्षक आणि लेख असंबद्ध वाटतंय.
अर्थात वेगवेगळ्या वेळी.
अर्थात वेगवेगळ्या वेळी.
मला वाटते समाजातील हे दुय्यम
मला वाटते समाजातील हे दुय्यम स्थान बरेच स्त्रिया स्वत:हून निवडतात. किंवा शक्य असूनही डावलत नाही ज्यामागे त्यांचाच स्वार्थ असतो.
सारखी एका रांगेत मोठी मोठी
सारखी एका रांगेत मोठी मोठी लग्नात वापरतात तशी भांडी घेउन बसलेले डोळ्या समोर आलेत >>>>

नाही आवडला हा लेख. वर काही
नाही आवडला हा लेख. वर काही प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे शिर्षक आणि लेख विसंगत वाटले, लिखाण जनरलाईझ्ड वाटले आणि मूळ विषय एवढा काही विषेश नाही. रोज घरी मी स्वतः रोज असतील तेवढी भांडी घासतो कारण मला स्वयंपाक जमत नाही. बायको माझ्यापेक्षा १००० पट जास्त चांगला स्वयंपाक करते. त्यामुळे आम्ही जबाबदार्या वाटून घेतल्या आहेत, झालं!
हे आता बोर व्हायला लागलं आहे.
हे आता बोर व्हायला लागलं आहे.
हे आता बोर व्हायला लागलं आहे.
हे आता बोर व्हायला लागलं आहे.>> +१११
विषय खूप ठराविक होत आहेत . तेच तेच बायकी
सुरवातीला बर वाटलं होत पण आता मात्र खरंच बोअर व्हायला लागलंय
हा लेख आवडला. लिंक शेअर केली.
हा लेख आवडला. लिंक शेअर केली. लोकांच्या प्रतिक्रिया टिपिकल होत्या.
या देशात तर घरटी एक 'घर सहायक अर्थात डोमेस्टिक हेल्पर्स अर्थात मेडस' असतात. त्यांना आठवड्याला एक सुट्टी आणि सरकारी नियमानुसार शासकीय सुट्ट्या देणे अनिवार्य असते. तरीही बायका प्रचंड त्क्रारी करतात. अरे तुमच्या नवर्याला आणि मुलांना शिकवा ना घरकाम.
पण नाही ... तिकडे स्वतःवर जबाबदारी येते ना.
आम्ही पूर्वीपासून एकत्र घरकाम करतो. त्याचे परिणाम आणि सामाजिक हेटाळणी वगैरे सर्व अनुभवून झाले आहे. आणि हे पक्के कळले आहे की घरकाम करणारे पुरुष कमी असतात, आणि त्यांना ट्रेन करणार्या बायका त्याहून कमी असतात.
मी क्लासेस काढणार आहे
आपलं घर म्हणून त्यातील कामांची जबाब्दारी आपण होऊन कशी घ्यावी (पुरुषांसाठी)
आपल्या घरात बदल घडवाय्ची जबाबदारी आपलीच आहे (स्त्रियांसाठी)
शहाण्या असतील तर 'तू लग्नानंतर कुठली कामं आपण होऊन करशील ?' , 'तुझी घरकाम शिकायची तयारी आहे ना' ? हे होणार्या जोडीदाअराला आधीच विचारुन घ्यावे
Pan mi Kay mhante konich
Pan mi Kay mhante konich bhandi ghasli nahit tar kinva jyala sink madhe sathalelya bhandyncha thigacha tras hoto to nirupayani ghasel ki!
Ha funda saglikade vaparta yeil - konich bed aavraycha nahit, ker kadhaycha nahi kinva jyala tras hoto to karel ki
Ha funda saglikade vaparta
Ha funda saglikade vaparta yeil - konich bed aavraycha nahit, ker kadhaycha nahi kinva jyala tras hoto to karel ki
>>>>>
हा फंडा मी हॉस्टेलला वापरायचो.
वैतागून मग माझा रूमपार्टनर केर काढायचा..
कारण मी गटार साफ करण्यापेक्षा गटारात लोळणे पसंद करेन या मनोवृत्तीचा आहे हे त्याला पटवून देण्यात मी यशस्वी ठरलो