रुद्रम -झी युवा मालिका - २

Submitted by सुजा on 5 November, 2017 - 21:45

पहिल्या धाग्याने २००० पोस्ट पार केल्याने रुद्रम ची चर्चा करायला हा दुसरा धागा .
आता शेवटच्या काही एपिसोड्सची चर्चा या धाग्यावर आजपासून ( सोमवार दिनांक ६/११/२०१७ ) करू Happy
रुद्रम भाग -१ इथे बघा Happy
https://www.maayboli.com/node/63408?page=63

Group content visibility: 
Use group defaults

माणूस जिवंत असताना जखम झाल्यावर रक्त वहातं मेल्यावर नाही>> बरोबर आहे, पण तिने लगेच विल्हेवाट लावली ना अर्ध्या तासात ? तरी पण नाही का ?
मी समजूनच चालले आहे Wink अर्थातच ह्या इतक्या बारीक सारीक गोष्टी क्षुल्लक आहेत . पण बारकाईने बघतो ना असल्या मालिका आपण , कुठे पुरावा राहिलाय कि काय हे आपण पण डिटेक्टिव्ह होऊन बघतो Lol म्हणून एवढा कीस Proud
पण अगदी एकही थेम्ब न सांडता/ उडवता ताजा मेलेला माणूस फास्ट मूविंग व्हील असणाऱ्या धारदार शस्त्राने कापून तुकडे करून भरणे म्हणजे धन्य च !!

हो कालच आशिष ने शोध घेतल्याचं प्रकरण फारच फुसकं वाटलं . तो इतका उतावळा आणि संशयी झाला कि लगेच जाऊन विचारलं काय चालू आहे वगैरे ..
मुळात येवढया दिवस ढवळ्या उघड उघड कोण ड्रग्स ची देवाण घेवाण करेल ?
म्हणून मला एक प्रश्न आहे :
ड्रग वाहून न्यायला दत्तक मुलं का वापरतात ?ते खूप easy आहे का ? means त्यांनी दत्तक मुलांना पळवले आहे का ?(आणि कदाचित याच कारणासाठी मुग्धा गोडबोले च्या मुलाला पळवण्याचा प्रयत्न झाला असेल का ?)
कारण काल असे दाखवले कि मुलाचे आई बाबा (बहुदा हे खोटे असावेत .. काय माहिती ) मुलाला घेऊन त्या नोटरी ofc/ टपरी ला येतात आणि मुलाला सोडून जातात . सो कदाचित पालकांना पैसे देऊन असे करून घेतले असेल का ?

त्यापेक्षा कित्तीतरी वेगळे/सोपे मार्ग नाहीयेत का ?

रागिणीचे ड्राइव्ह मधले बघून झाल्यावर तिचा डोळा लागतो व सकाळी जाग येते ते दिग्दर्शकाने खरेच खूप सुरेख दाखवले. असा सिन यापूर्वी पाहिल्याचे आठवत नाही. अर्थात असेलही कुणी चित्रित केलेला, पण मला आठवत नाहीये आता. इकडे तिकडे छोटे घोळ सोडले तर दिग्दर्शक उत्तम काम करतोय.

दुर्बिणीचे कवडसे पहिल्यांदा दिसले तेव्हा त्या भिंतीवर खिडकीची सावली दिसते. जेव्हा रागिणी गुपचूप त्याला पहात असते तेव्हा सावली नाहीय बहुतेक. तो दिवसभर तिथेच होता व तीही दिवसभर पाहत होती का ते कळत नाही त्यावरून. नंतर नोटरीकडे जाते तेव्हा लंच टाइम असतो. नोटरी एकटाच कसा हाफिसात हाही प्रश्न आहेच पण इतका महत्वाचा नाही.

ड्राइव्हमधून आधी माहिती नाही असे फारसे काही हाती लागले नाही. आता त्या गोडाऊनवर गेलीय पण तिथेही फारतर माल मिळेल, रागिणीला जे हवे ती मिळण्याची शक्यता कमी. ते गोडावनसुद्धा हास्यास्पद आहे. आत शाळेच्या गाड्या उभ्या करून ठेवल्यात हे बाहेरून दिसतेय मग तो बोउन्सर कशाला दारात येरझऱ्या मारत ठेवलाय? रिकाम्या गाड्यांना इतकी सुरक्षा का म्हणून संशय येऊ शकतो. नुसता एक पहारेकरी बसवला असता तरी नॉर्मल वाटले असते.

गोडाऊनवर परदेशी भेटण्याची शक्यता आहे. तसे न घडल्यास रागिणी एक दोन मुडदे पाडुन येईल पण तिच्या पुढील अंधार दूर होणार नाही.

मग ती परत माखिजाकडे जाऊन सांगेल त्याला सगळे.

आधी ड्राइव्हमध्ये काही आहे हे माहितेय पण ड्राइव्ह कुठे हे माहीत नाही म्हणून रिपोर्ट केले. मग ड्राइव्ह मिळाला पण तो उघडत नाही म्हणून रिपोर्ट केले, आता उघडला पण उपयोग झाला नाही म्हणून सांगेल. मग माखिजा म्हणेल, आता बस झालं, खूप खटपट केलीस. आता मी सांगतो तुला पुढची कहाणी. तू ज्या कथेतले रहस्य शोधायची धडपड करतेयस त्याचे पूर्ण स्क्रिप्ट मीच लिहिलेय. Happy

मग माखिजा म्हणेल, आता बस झालं, खूप खटपट केलीस. आता मी सांगतो तुला पुढची कहाणी. तू ज्या कथेतले रहस्य शोधायची धडपड करतेयस त्याचे पूर्ण स्क्रिप्ट मीच लिहिलेय. Lol Lol पुढील भागात काय दाखवलेय?

तू ज्या कथेतले रहस्य शोधायची धडपड करतेयस त्याचे पूर्ण स्क्रिप्ट मीच लिहिलेय. Lol Lol Lol

आजचा भाग - रा जाते समन्वय चेतना मधे आणि रेकॉर्डिंग ऐकवते तिघांना..ईंटरेस्टींग असेल .!

ह्या असल्या फुटकळपणे चालणाऱ्या धंद्यासाठी सातवचा अल्बम भरेल इतकी माणसे मारणे जरा जास्तच वाटले. >> फुटकळपणे चालणाऱ्या धंद्यासाठी ? वाईट धंदे हे वाईट च असतात . त्यात कमी वाईट आणि जास्त वाईट असं असत का ? त्या त्या केसमध्ये होरपळणाऱ्या माणसाला आपलं दुःख हे कायमच जास्त वाटत असतच

एकाच दुकानातून इलेक्ट्रिक कटर आणि काळं प्लास्टिक ,दोरी घेते हे पण जर संशयास्पद नाही का वाटलं. अख्खा माणूस जळतो बॅग मध्ये आणि नंतर कुठेच हि बातमी सुद्धा येत नाही??? काही दिवसापूर्वी अशीच एक बातमी अली होती मुलगी आणि जावई मृतदेह बॅगेत घालून चालले होते ,आदल्या दिवशी बॅग खरेदी करताना cctv मध्ये सापडले. पण या मालिकेत सध्या अती liberty घेतल्या सारखं दाखवत आहेत

त्या ड्राईव्ह मध्ये हे एवढच सापडलं??? हो ना. म लाही हाच प्रश्न पडला होता. ज्यासाठी एवढं सगळं केलं..मिठबावकर कडून पेसे मिळवले, मूर्तीला शोधलं त्यासाठी परत डावा कडे गेली, आबा हया खेळण्यात फ्लॉश्ड्राईव आहे हे समजल्यावर ते मिळवण्यासाठी काय काय केलं.....ओ गॉड..! आणि त्यात फक्त एवढीच माहिती..!

एकाच दुकानातून इलेक्ट्रिक कटर आणि काळं प्लास्टिक ,दोरी घेते हे पण जर संशयास्पद नाही का वाटलं>> समजून घ्यायचं आहे कि वेगवेगळ्या दुकानातून आणले
नंतर कुठेच हि बातमी सुद्धा येत नाही?>> ते खूप लांब जंगलात / झाडाझुडूपात जाळते
आणि तक्रार केली तर माणसाची शोधाशोध होणार कळायला ..

त्या ड्राईव्ह मध्ये हे एवढच सापडलं?>>हो ना बघा कि !मला थोडंसं म्हणजे (अगदी किंचित ) डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखं वाटलं
पण त्यात मला वाटतंय त्याने मोबाईल मधले व्हिडिओस भरलेत सो एवढे gb गेले बहुतेक

ज्यासाठी एवढा आटापिटा केला त्यातून फक्त नोटरी ची जागा कळली आणि दत्तक मुलांना use करून ड्रग चे धंदे चालतात यावर प्रकाश पडला

आशिष फार उतावीळपणा करतो हे अगदी खरं.

त्या मुलांना आंधळे करून बार मध्ये कामाला ठेवत असतील हा एक angle वर कोणीतरी लिहिलाय तो पटण्यासारखा आहे पण ती मुलं बोलू तर शकतात पण दहशत असेल त्यांना आणि पोलीस सामील त्यामुळे काय करतील.

तू ज्या कथेतले रहस्य शोधायची धडपड करतेयस त्याचे पूर्ण स्क्रिप्ट मीच लिहिलेय. >>> Lol

ड्रग्ज ट्रॅफीकिंग साठी अतिशय लहान मुलांचा वापर आणि अल्पवयीन मुलींचा वेश्याव्यवसाय हे फुटकळ धंदे नाहीत मात्र. अतिशय घृणास्पद आहे. सातवच्या बायकोचे डायलॉग छान दाखवलेत शेवटी की तुम्ही मारलं नसतं तर मी मारलं असते त्याला.

फुटकळ मी धंद्याच्या गांभीर्याबद्दल बोलत नाहीये तर ते करण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय. एखादे गुपित कोणाला कळल्यास थेट मारायचीच वेळ येत असेल तर ते गुपित कुणाला कळू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे ना? ह्यांनी लोकांना मारलंय, पोलिसात भरपूर लोक विकत घेतलेत (अगदी पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट बदलही आरामात मिळतोय यांना). तरीही धंदा असा चाललाय की वर वर पाहणाऱ्यालाही शंका यावी. आशिष एवढी मोठी गाडी घेऊन 4 दिवस थेट दारात फिल्डिंग लावून , हातात मोबाईल कॅमेरा घेऊन बसला तरी कळत कसे नाही?

असा धंदा करायचा आणि ज्यांना कळले त्या लोकांना मारत सुटायचे याला काय अर्थ आहे. मागे रागिणीला मारायचे नाही ऐकल्यावर किरण म्हणतो साहेब या आधी आपण कित्येक जज, वकील, पत्रकार उडवलेत. आता ह्या सगळ्यांना उडवण्यापेक्षा धंदा काळजीपूर्वक केलेला जास्त चांगला.

फुटकळ मी धंद्याच्या गांभीर्याबद्दल बोलत नाहीये तर ते करण्याच्या पद्धतीबद्दल बोलतेय. एखादे गुपित कोणाला कळल्यास थेट मारायचीच वेळ येत असेल तर ते गुपित कुणाला कळू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे ना? >>> ओके ओके.

तू ज्या कथेतले रहस्य शोधायची धडपड करतेयस त्याचे पूर्ण स्क्रिप्ट मीच लिहिलेय. Lol > अगदी अगदी.. एवढंच बाकी राहिलंय आता!

आशिषचा तपास अगदीच हास्यास्पद. सातव आणि त्याच्यामधलं भांडण पण लुटूपुटूचंच वाटलं >>> मला नाही वाटलं तसं. एक तर तो काही या गोष्टींमधे मुरलेला नाहीये. एक साधा माणूस आहे. एक सामान्य माणूस अचानक एखाद्या पोचलेल्या गुन्हेगाराला भिडावा तसंच वाटलं ते.

माखिजा स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर साठी जात असणार डॉक्टरकडे. रा बरोबर पहिल्या भेटीत त्याने माझ्या जुळ्या भावाला बिबट्याने खाल्लं वगैरे जी स्टोरी सांगितली तिची काहीतरी लिंक असणार. शेवटी राला जरी कळलं तरी तो नाटक करणार तो मी नव्हेच म्हणून !

आजचा सॉलिड वाटतोय, जबरदस्त. रागिणीच्या सर्व चाली मला परफेक्ट वाटल्या. खरं म्हणजे एका चालीत तिने अनेक बाजू उघड केल्या. फक्त तिने कि क ला आपसूक काही सांगितलं नाही म्हणजे मिळालं.

Hats off to मुक्ता.... जुने फोटो पाहताना काय झरझर भाव बदलले तिचे, अप्रतिम अभिनय, ते खिन्न हसू पाहून तर खरंच खूप वाईट वाटलं!

एखादे गुपित कोणाला कळल्यास थेट मारायचीच वेळ येत असेल तर ते गुपित कुणाला कळू नये याची काळजी घेणे अपेक्षित आहे ना? >> काळजी घेतच असतील पण कुठून ना कुठून तरी काही ना काही कोणाकडून तरी लीक होत असतंच आणि मग लीक झालं कि त्या त्या माणसाला मारणं आलच . नाहीतर तो आणखीन कोणाला तरी वरती कळवायचा . त्यांना सगळं निर्धोक पाहिजे असत. . या असल्या गॅंग मध्ये किती तरी खून पडत असतीलच . आपल्याला सामान्य माणसाला काही माहित नसत. मालिकेचे पटकथाकार जे आहेत ( गिरीश जोशी ) तो व्यवस्थित अभ्यास करून कथानकाची मांडणी करणारा आहे

आशिष एवढी मोठी गाडी घेऊन 4 दिवस थेट दारात फिल्डिंग लावून , हातात मोबाईल कॅमेरा घेऊन बसला तरी कळत कसे नाही? >> आपल्याला मालिकेत म्हणून तो इतक्या जवळून दिसतोय तो . प्रत्यक्षात तो लांबून रेकॉर्डिंग करत असेल काय माहित ?

तरी 1 प्रश्न आहे.... ATS वाले एका अनोळखी फोन वर विश्वास ठेवून, लगेच कसे काय येतात? आणि सामान्य माणसाकडे ATS चा number कसा काय की मुक्ता पत्रकार म्हणून तिच्या कडे लगेच available Number?
आणि ती कंट्रोल रूम ला फोन करुन लगेच कट का करते, इ नीट कळलं नाही मला!

माझ्यामते ड्राइव्ह मधे फारच कमी डेटा निघाला किवा फार काही लिडच नाहीये, त्यामानाने त्याच्या साठी एपिसोड फार खर्च झाले, त्या नोटरीच दुकान एवढ भर रस्त्यात आहे की कायतरी गडबड झालिये हे पटकन कळेल..

आपल्याला मालिकेत म्हणून तो इतक्या जवळून दिसतोय तो . प्रत्यक्षात तो लांबून रेकॉर्डिंग करत असेल काय माहित ?>>>>

मलाही तीच आशा होती म्हणून आज परत पाहिले. ती टपरी मेनरोडवर नाही तर आतल्या सिंगल लेन रस्त्यावर दाखवलीय आणि आशिष मोठी गाडी चालवताना दाखवलाय. लहान रस्त्यावर मोठी गाडी लक्षात येते. नोट्री दुकानातून आत बाहेर करताना दाखवलाय, मुलाला घेऊन बाहेर आल्यावर एकदाही तो आजूबाजूला पाहत नाही. रस्त्यावर बॉक्स घेणे दाखवले तिथेही रहदारी दाखवलीय. बॉक्स घेऊन जाणार्याला तर गाडीसमोर पाहून मला वाटले याला आशिष काय करतो ते कळले वाटते.

सातवच्या बारसमोरूनही एक मध्यमवर्गीय स्त्री व एक वृद्ध आरामात चालत जाताना दिसले, 1 गृहस्थ कोपऱ्यावर उभे राहून रहदारी पाहताना दाखवले म्हणजे तिथेही रहदारी आहे.

सातव बॉक्स काढतो तेव्हा दरवाजात असतो पण आशिष त्याला गाठतो तेव्हा तो दरवाजापासून बराच बाहेर दाखवलाय. जणू मुलाला टाटाबाय बाय करायला बाहेर आलेला.

या गोष्टींकडे एरव्ही दुर्लक्ष केले असते पण कथेचा हाच तर गाभा आहे. हेच काळे धंदे होताहेत जे पडद्याआड राहावे म्हणून माखिजाने इतकी मोठी फौज उभी केलीय व इतके मुडदे पाडले. त्यामुळे ते दाखवताना थोडेतरी विश्वासार्ह दाखवणे गरजेचे वाटतेय मला.

रागिणीने चांगले डोके चालवले आज (पहिल्यांदा).

माखिजा काय वेडा झालाय... स्वतःच तिचे समर्थन करतोय. शेवटच्या भागात बंदूक त्याच्यावर ताणून ती उभी राहील तेव्हा जागा होईल बहुतेक.

Pages