वाढदिवस

Submitted by अंबज्ञ on 4 November, 2017 - 14:52

.

.

जसा उद्या तसाच आजचा दिवस
तरीही कारण ह्या दिवसाचे ख़ास 
आहे आज तुझा वाढदिवस 
सुंदर वर्षाचा जणु सुवर्णकळस

तुझ्या सर्वच आकांक्षापुढे
राहु दे कायम गगन ठेंगणे   
दृढ़ निश्चयाने छान सजू दे
आयुष्याची सुंदर स्वप्न रंगवणे 

जगण्याचा असे एक दिलासा,
तुझ्या लास्य अमृत हसण्यात 
मृत्युसही जिथे संजीवनी देई
गुंततो जीव नव्याने जगण्यात       

वृंदावनी सांजवात असे दिमतीला
नभी चंद्रकोरीचा साज जडला...
ताऱ्यांनी सजले मन आसमंत खुले
अंगणी सांडतो हां मैत्री प्राजक्त
अभिष्ट चिंतनाची शुभ्र शब्दफुले     

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगण्याचा असे एक दिलासा,
तुझ्या लास्य अमृत हसण्यात
मृत्युसही जिथे संजीवनी देई
गुंततो जीव नव्याने जगण्यात >>>> मस्त!!!

अर्रे!!!!
ही तर वाढदिवसाची दोन तायांना भेट दिसतेय!
शुभेच्छा!
छान अंबज्ञजी!

Good guessing Rahul Happy

धन्यवाद मेघा Happy