फास्टर फेणे – परीक्षण - स्पॉयलर अलर्ट

Submitted by भागवत on 31 October, 2017 - 15:20

आपण हॉलीवूडचे रहस्या वर आधारित चित्रपटा साठी जेम्स बॉड , शेरलाँक होम्सचे चित्रपट बघतो. पण मराठीत त्याच धर्तीवर आलेला चित्रपट बघायला विसरतो. मराठी चित्रपटा मध्ये नवीन-नवीन प्रयोग होत आहेत त्या मधलाच फास्टर फेणे हा उत्तम उदाहरण आहे. चित्रपट नाविन्यपूर्ण आहे यात वादच नाही. सगळ्या व्यक्तिरेखा स्पष्ट आणि ठळक आहेत. फेणे च्या विविध दृष्या मध्ये पार्श्वसंगीताचा सुरेख वापर केला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमेय वाघ आणि गिरीश कुलकर्णीचे नाव एकाच रेषेत मध्ये आहे हे बरेच काही सांगून जाते. भा. रा. भागवत यांनी लिहिलेली कथा नवीन रुपात रंगवली आहे. मा‍झ्या सारखे ज्यांनी कथा वाचली नाही त्यांना पूर्ण नवीन अनुभव आहे.

फास्टर फेणे ऊर्फ बनेश फेणे ऊर्फ फाफे अर्थात अमेय वाघ याचा प्रवेश तेवढा दमदार नाही पण चित्रपटासाठी घेतलेली विशेष मेहनत जाणवते. या व्यक्तिरेखेला उगाच फास्टर नाव नसून विचारातून आणि कृतीतून फास्टर दाखवले आहे. त्याचे फास्टर असणे हे तो छोट्या-छोट्या गोष्टीतून प्रकट करतो. गुंडा सोबत मारामारी करताना याचा तो पुरे पूर वापर करतो.

पर्ण पेठे ऊर्फ अबोली हिचे पात्र शैक्षणिक गुन्हे रिपोर्टर ठीक ठाक आहे. प्रवेश चांगला दमदार आहे. पण तिला विशेष मेहनत घ्यावी लागेल अभिनयासाठी. बनेश आणि अप्पा यांच्या पुढे तिचा प्रभाव पडत नाही. तिची मुख्य भूमिका नसून सहायक भूमिका आहे. विशेष म्हणजे चित्रपटात एकही गाणे नाही. त्यामुळे चित्रपट वेळेत संपतो.

अप्पा ऊर्फ गिरीश कुलकर्णीचा जबरदस्त फॉर्म चित्रपटाला लाभलाय. मराठीत नवीन दमदार खलनायक आलाय. पूर्ण चित्रपट तो अभिनयाने तो खाऊन टाकतो. खुंटलेली दाढी, खुनशी नजर, वागण्यात बेफिकीर, तितकाच कावेबाज, आणि बेरकी मस्त रंगवलाय. त्याचे वन लायनर जबरदस्त आहेत. त्याची संवाद फेक मस्त आणि थेट आहे. त्याचा प्रत्येक वाईट कामासाठी एखादी लहान कथा तयार असते. त्याचे काही संवाद डार्क नाईट मधल्या जोकरची पुसटशी आठवण करून देतात. अप्पाचा एक संवाद “ज्याला आपली किमत माहीत नसते एक तर तो मूर्ख असतो किंवा अतिशहाणा” बेरकी भाषेत म्हणतो तो मस्त जमलाय. अप्पा आणि फाफे यांच्यातील संवाद बघायला मजा येते.

लहान मुलगा भू-भू यात भाव खाऊन जातो. त्याचे नाव कसे पडले याचे मजेदार स्पष्टीकरण देतो. अंबादास रिवर्स किंगच्या छोटाश्या भूमिकेतून मस्त हसवून जातो. चिन्मयी सुमित यांची छोटी शी व्यक्तिरेखा सुंदर आहे. कथानक शैक्षणिक क्षेत्रातील माजलेली बजबजपुरी यावर आधारित आहे. खरी स्टोरी सुरु होते बनेश कॉलेज ला परीक्षा देण्यासाठी जातो आणि तिथे त्याला एक समवयस्क मुलगा भेटतो. परीक्षा झाल्या नंतर तो त्याचा खून होतो. मग फाफे खूनाचे धागे दोरे शोधण्यासाठी जीवाचे रान करतो. त्यात एक वाक्य आहे “चांगल्या क्षेत्रात वाईट माणसे आणि वाईट कामात चांगली माणसे सुद्धा असतात”. फाफे त्याच वाईट कामात असलेल्या चांगल्या माणसांना घेऊन करोडोचा घोटाळ्याचे रहस्य उलगडतो. हा सवांद विन डीझेल च्या 'XXX' या हॉलीवूड चित्रपटाची आठवण करून देतात.

भा. रा. भागवत यांचे पात्र साकारणारे दिलीप प्रभावळकर यांनी काम चोख बजावले आहे. त्या मध्ये काहीच चुक काढता येणार नाही. फाफे एका रहस्यातून दुवे कसे ओळखून काढतो आणि एका पेक्ष्या जास्त गुंडा कसा लोळवतो हे साउथ स्टाईल दाखवले आहे. फाफे काही जेम्स बॉड नाही पण क्लाँयमॅक्स थोडा जास्त खुलवला असता आणि नाविन्यपूर्ण शेवट असता तर बहार आली असती. कथानकात थोड्या चुका जरी असल्या तरी मस्त छायाचित्रण, जबरदस्त पार्श्वसंगीत, पुण्याचे होणारे विहंगम दर्शन, दमदार अभिनय याने चित्रपट तारून जातो. एकदा काय दोनदा सुद्धा बघण्या सारखा आहे. तुम्हाला हा चित्रपट बघताना नक्कीच 'य' मजा येईल.

चित्रपटाच्या सकारात्मक बाजू
उत्तम छायाचित्रण
दमदार अभिनय
कडक पार्श्वसंगीत

चित्रपटाच्या कमकुवत बाजू
भडक मारामारी
गुळगुळीत क्लाँयमॅक्स
Faster-Fene-Marathi-Movie-Cast-Wiki-Trailer-Imdb-Release-Date-Actress-696x464.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

शिर्षकात स्पॉयलर म्हणून लिहा की. आतापर्यन्त कुठेही कुणीही स्टोरी उघड केली नव्हती. अगदी सिनेमा कास्ट ने किंवा त्यांच्या आजुबाजुच्यांनीही नाही. तुमच्या मुळे पहिल्यांदा कळाली. अशाने काहींचा हिर्मोड होऊ शकतो (माझा झाला)

हो, काही घटनाक्रम उघड केल्यासारखे मलाही वाटले. खालतून दुसरा मोठा पॅराग्राफ ,,
अर्थात मी चित्रपट आधीच बघून आल्याने माझे वाटणे वेगळे आणि एका न बघितल्याला नेमके काय वाटेल हे सांगणे अवघड.

@ रिया, तरी पिक्चर बघच नक्की. एकदा सुरू झालाय की अशी गुंतून जाशील की ईथे जे काही वाचलेय ते सहज विसरून जाशील

रिया, च्रप्स, ऋन्मेऽऽष प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!!

@रिया, स्पॉयलर अलर्ट शीषर्क मध्ये टाकले आहे. मी हे परीक्षण माहितीपर लिहिले आहे. प्रेक्षकांना परावृर्त करण्यासाठी नाही. मी चित्रपटाच्या कथानका बद्दल कमी लिहिले आहे. तुमचा हिरमोड झाल्यास क्षमस्व!!! तुम्ही चित्रपट नक्की बघावा हि विंनती.

@ऋन्मेऽऽष @रिया - खालुन दुसरा पॅराग्राफ - काही ओळी काढुन टाकल्या आहेत.

शिर्षकात स्पॉयलर म्हणून लिहा की. आतापर्यन्त कुठेही कुणीही स्टोरी उघड केली नव्हती. अगदी सिनेमा कास्ट ने किंवा त्यांच्या आजुबाजुच्यांनीही नाही. तुमच्या मुळे पहिल्यांदा कळाली. अशाने काहींचा हिर्मोड होऊ शकतो (माझा झाला)
नवीन Submitted by रीया >>>>>

अगदी सहमत रिया, माझा हि झाला काल जेव्हा हे वाचल.... स्पॉयलर आहे अस लिहा ...!!

@morpankhis प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!! @रिया यांनी सुचवल्याप्रमाणे कालच स्पॉयलर अलर्ट शीर्षकात टाकले आहे. काही ओळी सुद्धा काढुन टाकल्या आहेत. मला आता असे वाटते की हिरमोड होण्या सारखे काही नसावे.