आभास

Submitted by सेन्साय on 31 October, 2017 - 12:32

.

.

.
मी सुंदर राजकुमार
ती मनमोही अप्सरा
सुरु ऑनलाइन प्यार
अद्भुत सारं मायाजाल

मी हीरो स्टाईलबाज
शायनिंगवाला छान
ती सेक्सी धडाकेबाज
बदाम राणीचे पान

शेकडो इथे लाइक्स
झालो फेसबुकस्टार
तिच्याकड़ेसुद्धा सर्व
फोटोशॉपची कमाल

भेटू ठरले प्रत्यक्ष
आभासी नटले जग
वास्तव दर्शन रुक्ष
एकेक भयंकर नग

अनफ्रेंड आणि ब्लॉक
झालो एकमेका तडक
आभासी जगच बरे
सॉलिड भन्नाट कडक !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Use group defaults

भारी