अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान वैद्यकीय तपासणी

Submitted by बुन्नु on 30 October, 2017 - 12:19

माझे आई वडील सध्या आमच्या बरोबर अमेरिकेत राहत आहेत. त्यांचा मेडिकल इन्शुरन्स घेतला आहे. आई ला हाय ब्लड प्रेशर व डायबेटीस असल्याने, ती भारतात असताना सर्व तपासणी वेळोवेळी करून घेत असते. अश्या तपासण्या अमेरिकेत करता येतात का? आणि करायच्या झाल्यास, डॉक्टर च्या सल्ल्यानेच जाता येते कि थेट Lab मध्ये जाता येते?

क्रुपया आपले काही अनुभव असल्यास मार्गदर्शन करावे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही घेतलेल्या इंशुरन्स कंपनीला फोन केलात का? तो जो काही इंश्युरन्स असेल त्याप्रमाणे ते जे सांगतील तो आणि तेवढाच भाग कव्हर होईल.
बाकी पूर्ण पेमेंट भरून तपासण्या सगळे जणं हौशीने करतील.

हो इन्शुरन्स कंपनीशी बोलूनच करा.

स्वतः पैसे भरून करणार असाल तर त्या फॅसिलीटी (डॉक्टर्/हॉस्पिटल) थेट आधी बोला. कधी कधी थेट पेमेण्ट असेल तर ते बरेच डिस्काउण्ट द्यायला तयार होतात.

आपण आधी आपल्या इन्शुरन्स कंपनीला फोन करून सगळी माहिती घ्या आणि पोलिसी मध्ये काय काय कव्हर आहे ते पहा. त्या नंतर तुम्हाला निर्णय घेता येतील ... तसेच कुठलीही तपासणी करण्यासाठी आपल्याला डॉक्टरचे पत्र लागेल

भारतातून आणलेला किंवा इथला Visitor Insurance हा फार मर्यादित आणि फक्त Hospitalization साठी असतो. तपासण्या वगैरे त्यात येत नाहीत.
काही ठिकाणी Indian-American Doctor अश्या पेशंटना (अर्थात कॅश पैसे घेऊन) मदत करतात. तसे कुणी असतील तर बघा.

>>तसेच कुठलीही तपासणी

>>तसेच कुठलीही तपासणी करण्यासाठी आपल्याला डॉक्टरचे पत्र लागेल<<
+१

#१ - म्हणजेच डॉक्टर ऑफिस विजिट करावी लागेल. तिथे ब्लड प्रेशर, वजन वगैरे चेक होउन जाइल. पण ब्लड वर्क लॅब मध्ये पाठवावं लागेल. तुमच्या विजिटर्स इंशुरंसचा कोपे, डिड्क्टिबल वगैरे विचारुन ठेवा.
#२ - केवळ मॉनिटरिंग साठी ब्लड प्रेशर, शुगर लेवल इ. रुटिन (दररोज, आठवड्यातुन एकदा वगैरे) चेक करायचे असतील तर सरळ ब्लडप्रेशर, ब्लडग्लुकोज तपासायच्या मशिन्स घेउन टाका; डॉक्टर ऑफिस विजिट पेक्षा खर्च कमी येइल. तुमच्या स्वतःच्या इंशुरंस कंपनीकडे चौकशी करा, ह्ल्ली बर्‍याच इंशुरंस कंपन्या अशा प्रकारची इंस्ट्रुमेंट्स, अगदि अ‍ॅपल वॉच पर्यंत (जवळ्जवळ) फुकटात देतात...

आजकाल बर्‍याच राज्यां मधे अर्जंट केअर क्लिनिक्स निघाले आहेत. यात तिथेच डॉक्टर असतो, वेगळा लागत नाही.
यात $35 पासून पुढे वैद्यकीय तपासणी आणि मदत मिळू शकते. प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत पण बरेच क्लिनिक्स, इंश्युरन्स नसला तरी मदत देतात (जास्त पैसे भरून). तुम्ही नेहमी जाणार तर कमी किंमतीत त्यांचे वेगळे प्लॅन्स असतात. यात सगळ्याच गोष्टी उपलब्ध नसतात. तुमच्या गावात चौकशी करून पहा.
https://www.carewellurgentcare.com/
https://nextcare.com/
http://www.afcurgentcarebedford.com/

केअरवेल लॅब सर्विसेस पण देते.
https://www.carewellurgentcare.com/patient-services/lab-services/

काही गावात वॉलमार्ट, टार्गेट या सारख्या मोठ्या दुकानात, मॉलमधे असे दवाखाने निघाले आहेत.

ब्लड प्रेशर मॉनिटर्स वॉलग्रीन्ससारख्या फार्मसीजमध्ये असतात - कितपत अ‍ॅक्युरेट असतात कल्पना नाही, पण निदान रेन्ज कळू शकेल. शुगरही घरच्याघरी चेक करणारी किट्स मिळतात.
मेडिकल इमर्जन्सी नसेल आणि केवळ रेग्युलरली या गोष्टी मॉनिटर करणं हा उद्देश असेल असं समजून लिहीत आहे. बाकी माहिती वर आली आहेच.

CVS नी पण बर्याच फार्मसी मध्ये अर्जंट केअर क्लिनिक चालु केले आहे. त्याचे पण दर जास्त नाहीत.

काही किलिनिक मध्ये (खास करुन जे मोठ्या हॉस्पिटल च्या अधिपत्या खाली आहेत), अश्या ठिकाणी तपासुन झाल्यावर लगेच बिल येत नाही. ते तुम्हाला तीन चार महिन्यानी यते. आणि तिथे जर तुमचे इंशुरन्स चालत नसेल तर रेग्युलर किंमतीच्या दुप्पट किंवा तिप्पट पण बिल येते.

अश्याच एका क्लिनिक मध्ये चष्म्याचा नंबर काढायला $१९९ दिले आहेत. हे काम जर योग्य इंशुरन्स असते किंवा , माझे इंशुरन्स चालते त्यी ठिकाणी गेलो असतो तर फक्त $६५ द्यावे लागले असते.

ज्या क्लिनिक मध्ये आपण जातो त्या मध्ये आपल्या इंशुरन्स ने रेट नेगोसियेट केले आहेत की नाही ते पहाणे. हे काम क्लिनिक मध्ये फोन करुन पण होउ शकते.

बी पी डिपर्टमेंत्टल स्टोअर मध्ये (उदा लकी,व्~ओलमार्ट) इ होते.
अ‍ॅक्युरेट असते. मी करून ङेतले आहे.
शुगर बद्दनामाहित नाही