आयुष्य

Submitted by योगेश_जोशी on 29 October, 2017 - 15:06

.

.

.

अर्ध्यावरून तू गेलीस
अन् ...
आयुष्य घड्याळाच्या
काट्यासारखं
रोज त्याच जागेवरून
पुढे जातंय...
गोल-गोल फिरत राहणारं
हे वर्तुळ कधी संपणार....!
शुक्राची चांदणी दिसून
प्रहर संपावा तसं
नवीन प्रकाशाला
जन्म देवून
ही रात्र कधी संपणार ?

अस्तित्व अन भासाच्या
जगा पलीकडचा
आज मी फक्त
साक्षीदार झालोय
आणि ...
कधीतरी अनाहूतपणे
आठवणींचं गाठोडं
उघडलं जातं.
पत्त्याचा बंगला कोसळावा
तसं मनही जमीनदोस्त होतं.
भरलेलं मन अन्
रिता होणारा आत्मा
भटकत राहतात..
तुझ्या आठवणीत
अश्वत्थामा बनून !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान! सुंदर कविता!!

आपल्या आयुष्याचा जोडीदार आपल्या अगोदर गेल्यानंतर एखाद्याच्या मनात अशाच भावना उठत असतील.

धन्स VB Happy