कमिटमेंट

Submitted by योगेश_जोशी on 27 October, 2017 - 07:38

.

.

ह्या भौतिक विश्वात लाभेविण प्रिती निव्वळ अक्षरमात्र अस्तित्व राखून असते ज्याचा प्रत्यक्ष अनुभव अनेकदा फक्त ईश्वरी पातळीवर मिळत असतो, माणसामाणसात असलेली नात्याची वीण मात्र खुपदा प्रयोजनातच असते ...ते संपले का सर्वच संपते ...कागदोपत्री असलेली नाती बाकी गरजांमुळे जगतात...खरं तर अनेकदा नुसती रेटली जातात .. अतिनिर्भीड असेल तर एका शब्दावरही सगळं संपते ...सगळी परिस्थितीच तशी दोलायमान अन् अधिरतेची ...

हल्ली खूपदा आपण दोघांच्या रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण झाला की असं बोलणं पाहतो की .. तो/ती माझ्याशी कमिटेड होती मग असं कसं केलं..मला कमिट केलं होतं तरी असं कसं वागू शकतो कोणी !

एका रात्रीत व्हाट्सआप किंवा फेसबुकवर बनलेली नाती किंवा आपल्यात मॅग्नेटिसम आहे किंवा कनेक्शन आहे ..कुठेतरी अटॅचमेंट जाणवते अशा शब्दाच्या कोट्या करून ओढुन ताणुन बनवलेल्या नात्यांमध्ये कदाचित नियम / रूल्स असल्यासारख्या शाब्दिक कमिटमेंट्स दिल्या जात असाव्यात.. फिलॉसॉफीकल प्रेमाने प्रेरित ज्या नात्याचा बेसच मुळात तकलादु असतो तेथे नात्यात जेव्हा दरी पडते तेव्हा समोरच्याइतकाच आपलाही दोष आहे हे मान्य करायला हवं तरच ती सुद्धा एक प्रकारची खरीखुरी कमिटमेंट असेल.

मुळातच सच्च्या आणि खूप गहिऱ्या असलेल्या नात्यात खरच काही बोलून कमिटमेंट करण्याची गरज असते का ? हां एक मुलभुत प्रश्न इथे दोन्ही बाजूस पडायला हवा ... जर ते नातं खरच खूप सुंदररित्या उमललेलं असेल तर सगळ्याच गोष्टी जाणवतात आणि आपोआप निभावल्यासुद्धा जातात...जर नात्याला वेळ दिला आणि प्रेम, राग, भांडण,अबोला ह्या सगळ्या टप्प्यांमधून जाऊनही ते तितक्याच ताकदीने उमलत असेल....अनेक स्थित्यंतर होऊनही एकमेकांबद्दलची ओढ़, तळमळ, जिव्हाळा कायम असेल तर कुठलीही शाब्दिक कंमिटमेंट करण्याची गरजच उरत नाही. हे नातं निशब्द राहिलं आयुष्यभर तरी खऱ्या अर्थाने अजर अमर असेच असते.

Some promises r always unwritten
Some memories r always unseen
Feel magic of True Relation n u will realize that true feelings r always unspoken..

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा: अंबज्ञ!! फारच सुरेख लिहिलंय. फार आवडलं. आप सामने होते तो आपको गले लगा लेते हम! Happy

प्रोत्साहन देणाऱ्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद @ प्रशांत तिवारी Happy राहुल आणि अक्षय Happy