वैदिक कालगणना

Submitted by अविनाश जोशी on 21 October, 2017 - 02:12

वैदिक कालगणना

वैदिक कालगणनाचे अनेक धारा आहेत. वेदातील विविध शास्त्रे सूक्ष्म कालगणना आपल्या पद्धतीने करतात, पण सर्वांचे एकवाक्य होते ते १ सौर वर्ष = ३६५ सौर लग्नांना दिवस. हि कालगणना काही मायक्रोसेकंद ते १ वर २२ शून्य एवढी पसरली आहे,
सौर कालगणना
त्रुति t ≈ 0.031 µs
रेणु 60 त्रुति ≈ 1.86 µs
लव 60 रेणू ≈ 0.11 ms
लीक्षक 60 लाव ≈ 6.696 ms
लिप्ता 60 लेक्षक≈ 0.401 से
विघटि 60 लिप्ता ≈ 24.१०५६से
नाडी / घटी 60 विघटी ≈ 24 मिन
मुहूर्त 2 घंटी ≈ 48 min
नक्षत्र अहोरात्रम् 60 घंटी ≈ 24 h
30 मुहूर्त ≈ 24 h = १ दिवस
१ सौरवर्ष = ३६५ दिवस
सौर दिवस हा सूर्योदया पासून दुसऱ्या सूर्योदया पर्यंत असतो.

चंद्रीय कालगणना
दोन्ही पद्धतीचा मेळ असलेली हि एकुलती एक गणना आहे
तिथी किंवा चंद्र दिवस हा सूर्य आणि चंद्र ह्यांच्या स्थितीवर बदलतो दोघाम्च्या रेखांशाच्या कोनात १२ डिग ने वाढ झाली कि तिथी बदलते . अमावस्येला कोन ० असतो तर पूर्णिमेला १८० असतो . चंद्र दिवस कधीहि सुरु होऊ शकतो [ सौर रात्री सुद्धा ] आणि तो अंदाजे १९ ते २६ तासाचा असू शकतो.
१५ चंद्र दिवसाचा एक पक्ष होतो आणि २ पक्षाचा [ शुद्ध आणि कृष्ण ] एक चंद्रमास होतो. तो अंदाजे २९.५ सौर दिवसाएवढा असतो. ३६५ दिवस आणि ३५४ दिवस मधील फरक अधिक मांसाने भरून निघतो.
ऋतू = २ चंद्रमास
अयन = ३ ऋतू
चांद्रवर्ष = २ अयन .

पितर वर्ष
पितरांचे १ वर्ष ३० सौर वर्ष एवढे असते. त्याचे आयुर्मान १०० वर्ष = ३००० सौर वर्ष मानले
गेले आहे

दैवी वर्ष आणि युग
१ सौर वर्ष = देवाचा १ दिवस देवांना १२००० दैवी वर्ष आयुर्मान आहे
४००० + ४०० + 400 = ४८०० दैवी वर्ष = १७२८००० सौर वर्ष = 1 सत्य युग
३००० + ३०० + ३०० = 3600 दैवी वर्ष = १२९६००० सौर वर्ष = 1 त्रेता युग
२००० + २०० + २०० = २४०० दैवी वर्ष = ८६४००० सौर वर्ष= 1 द्वापार युग
१००० + १०० + १०० = १२०० दैवी वर्ष = ४३२००० सौर वर्ष = 1 कली युग
१२००० दैवी वर्ष = ४ युग = ४३२०००० सौर वर्ष = 1 महा युग = दैवी आयुर्मान

ब्रम्हाचे आयुर्मान
१००० महा युग = १ कल्प
२ कल्प = ब्रह्मा १ दिवस = ८,६४,००.००.००० सौर वर्ष
ब्रह्मा १ वर्ष = ३१.१०.४०,००,००,००० सौर वर्ष
ब्रह्मा ५० वर्ष = १ परार्ध
२ परार्ध = १०० ब्रह्मा वर्ष = १ महा कल्प = ब्रह्मच आयुर्मान = ३१.३५,२८,३२,०० ,००,००० सौर वर्ष
मन्वंतर = 71 महा युग ३०,६७२० ,००० सौर वर्ष = सूर्याचे एक परिभ्रमण

सद्य काळ
सध्या, ब्रह्माचे 50 वर्षे संपली आहेत. आपण सध्या 51 व्या वर्षाच्या पहिल्या दिवसात आहोत. [ या ब्रह्माचा दिवस, कल्प, याचे नाव श्वेता-वरहा कल्प असे आहे. या दिवसात सहा मन्वंतर झाली आहेत आणि हे सातवा मन्वंतर आहे, याचे नाव - वैवस्वथ मन्वंतर आहे. या मन्वंतर मधील 27 महायुग आणि 28 व्या महायुगाच्या कलियुगा हे कलियुग वर्ष ख्रिस्तपूर्व 3102 साली सुरू झाले .गणिताने आजचा काळ येतो ;
१५५५२०००००००००० + १८५२४१६००० + ११६६४०००० + ३८८८००० + ५११९ .
=काही खुलासे
१.वरील सर्व आकडेवारी कडे गणित म्हणून पाहू नये
२. एक ब्रम्हानंतर दुसरा ब्रह्मा येऊन चक्र परत सुरु होते. मी तरी याला अनंत काळ म्हणतो.
माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात एका विद्वान पण संकुचित आक्षेप घेतला होता.
https://www.maayboli.com/node/64186?page=1
त्याच्या मते <<<भाऊ ह्याचा नक्की अर्थ काय आहे? इथे वेळ हीच अनंत नाहीये असा एक विचार प्रवाह आहे आणि हे लोक ती वेळ मोजायची पद्धत अनंत काळापासून चालू आहे असे बिनधास्त लिहितात. >>>
मला वाटते त्यांना आता अर्थ सर मजला असावा.
काळ साक्षेप असतो. तो वस्तू वेग व गुरुत्वाकर्षणावर अवलंबुन असतो. कृष्णविवर व प्रकाश वेगाने जाणारी वस्तू यावर शून्य असतो

त्यांच्या बाकी प्रतिसादाबद्दल परत कधीतरी .... १५,५५,२१ ,९७,२९,४९ ,११९ सौर वर्ष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्यत्ययजी मला आपण नमूद केलेल्या वेगवेगळ्या संस्कृतीच्या केलेंडर विषयी कल्पना नाही.

Submitted by अविनाश जोशी on 24 October, 2017 - 17:16

कूटस्थ, माझा प्रतिसाद जोशींना उद्देशून होता. तुम्ही दुर्लक्ष करा

मला या अनुषंगाने शंका आहेत. ब्रम्हा यांचे वयोमान काय आहे नक्की? पृथ्वी अस्तिस्वात आल्यापासून ते अहेत का नंतर आले?
नंतर म्हणजे कधी? आदिमानव होमो सेपियन आणि यापासून उत्क्रांत झाले का नाहीत?

बरं चायनीज, जपानी, कोरियन, व्हिएतनामी, मंगोलियन, थाय कॅलेंडर बद्दल तुमचं काय मत आहे?>>
leret us start new thread for various calender

@ कूटस्थ
मी तो श्लोक वाचला खात्री करण्यासाठी वेदपाठशाळेतूनही अर्थ विचारला. त्या श्लोकात दैवी वर्ष असं स्पष्ट लिहले नसले तरी अध्याहृत आहे असे मत आहे. पूर्ण पुस्तक मला अजून मिळाले नाही. मिळाल्यावर मी जास्त लिहीनच.
धन्यवाद

ब्रम्हा यांचे वयोमान काय आहे नक्की? >>>
१. मागे लिहल्या प्रमाणे सहा ब्रम्हा झाले असून सातव्या ब्रह्माचे ५१ वे वर्ष सुरु आहे
ब्रम्हाचे सध्याचे आयुष्य खालील प्रमाणे आहे. वरच्याही लेखात आकडेमोड केलेली आहे ती पाहावी.
१५,५५,२१ ,९७,२९,४९ ,११९ सौर वर्ष

२. पृथ्वीच्या आयुष्याचा ब्रम्हाच्या आयुष्याशी संबंध नाही.

३. अर्थातच उत्क्रांती वादावर (पृथ्वीच्या) बरेच मतभेद आहेत. आपण Erich von Däniken ची पुस्तके वाचावीत. पु ना ओकांचे वैदिक हेरिटेज हा ग्रंथ ही आवश्य वाचावा.

अर्थातच उत्क्रांती वादावर (पृथ्वीच्या) बरेच मतभेद आहेत. आपण Erich von Däniken ची पुस्तके वाचावीत. पु ना ओकांचे वैदिक हेरिटेज हा ग्रंथ ही आवश्य वाचावा.
,>>>

Proud

अर्थातच उत्क्रांती वादावर (पृथ्वीच्या) बरेच मतभेद आहेत. आपण Erich von Däniken ची पुस्तके वाचावीत. पु ना ओकांचे वैदिक हेरिटेज हा ग्रंथ ही आवश्य वाचावा.

>>>>> रोमातून बाहेर पडायला लावलं राव तुम्ही..... वरच्या दोन महान नोबेल विजेत्यांचे नाव घेतल्यावर राहावलंच नाही. ग्रेट! सिम्पली ग्रेट.
काय ते ज्ञान, अभ्यास, व्यासंग, अहाहा! नतमस्तक झालो म्हणजे अगदी.

Rofl

जळलं मेलं लक्षण,
पु.ना. ओकांची पुस्तके हे संदर्भ ग्रंथ आहेत हे आधीच सांगितले असतेत तर इतके दिवस धागा फॉलो केला नसता.

आणि आम्ही अश्विन संघी ची पुस्तके वाचून आमचे संशोधन मांडले की आम्हाला टोचून बोलतात लोक Wink

तर इतके दिवस धागा फॉलो केला नसता >> तुमच्या अपेक्षा आणि कारणे, दोन्ही चूक आहेत. नवरात्री नी दशहरा ला कुठला अभ्यास करून फॉलो केलं होतत का?

ते दोन्ही धागे काही प्रतिसादानंतर मचुपिचूला जाणार हे पाहील्या दिवशीच कळलेले.
या विषय इंटरेस्टिंग होता, विषयाला धरून मी शंका पण विचारल्या, सुरवातीचे काही प्रतिसाद अपेक्षा उंचावत होत्या..
पण हा हंत हंत...
असो..
होते कधी कधी...

मी कुठेही पु ना ओक किंवा Erich von Däniken हे संदर्भ फक्त आशुचँप यांना उत्क्रांती वादावर वेगळी मत किती असू शकतात या करिता सांगितली होती. माझ्याकडे एक छोटीशी ७,००० ग्रंथ संपदा आहे. त्यातील या धाग्याकरिता जास्त संदर्भ म्हणून डॉक्टर वि रा आपटे यांचा 'वेदातील विज्ञानाचा शोध' या १९९४ प्रकाशित ग्रंथातील आहे.

लायब्ररीच्या जाहिरातीबद्दल अभिनंदन. व्यक्तीच्या आकलन, अभ्यासाचे परिमाण 'त्याच्याकडे किती पुस्तकं आहेत' हे असतं ह्याबद्दल काही माहिती नाही. Happy

उत्क्रांतीवाद हे मत नाही, विज्ञानाने सिद्ध होत असलेली थेरी आहे ज्यावर गेली अनेक दशकं प्रोफेशनल पद्धतीने संशोधन होत आहे. ही संशोधने अतिप्रचंड प्रमाणात माहितीचा एकमेकांत गुंतलेला साठा असल्याने वन-लाइन-एक्स्प्लेनेशन शक्य नाही असे हल्लीच मला कळले आहे. मात्र सामान्य माणसाला 'हे विश्व देवाने बनवले' असे म्हटले की पुरतं. पु ना ओक किंवा डेनिकेन हे लोक साधारण पंचवीस वर्षांआधीच इर्रीलिवेंट झालेले असून सांप्रत काळात त्यांचा संदर्भ विरोधी मत म्हणून देणे हास्यास्पद समजले जाते.

ग्रंथसंपदा कितीही असली तरी एखाद्याची झुकलेली विचारसरणी त्या पुस्तकांची किंमत शुन्य करुन टाकते.

have u actually studied Pu na oak Vedic heritage> do u know abt him?
Yes he was fanatic. I told him so which he also accepted.
before galileo sun was revolving around earth accepted by all. was it true
pls go outside go0gle and see lot of papers on darwinism and then conclude
i am impartial i am lrast bothered whethrer i am from Alien or monkey.

अय्या.. तुम्ही ओकांना डायरेकट असं सांगूनच टाकलंत?? विद्वातजगतात आपली चांगलीच उठबस दिसत्येय. आणखी कोणाला कोणाला भेटलायत? मायबोलीवर मला भेटलेल्या प्रसिद्ध व्यक्ती असा धागा आहे त्यात अपडेट करा की तुमचे अनुभव. वाट बघतोय. इतकी ग्रंथ संपदा बाळगून असलेल्या व्यक्ती आहात ते आम्हाला आधीच सांगितलं असतं तर वाद घातलेच नसते की सर.

अगदी अगदी.
या सिद्धांताप्रमाने तुम्ही कशापासून उत्क्रांत झालात ते आता आम्हाला पक्के समजलेले आहे Lol

आईग्गं! रोमातून बाहेर येणे हे पापंच झालंकीवो!

बाकी कठीण आहे. चालुद्या संकिर्तन! धागाकर्त्यांना वाचकमनोरंजनयज्ञासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

(इतर वाचकांना खास माहिती: काहीकाळापूर्वी अस्मादिकही उत्क्रांतीवादाच्या विरोधातच होते, परंतु 'योग्य' व्यक्तींकडून साग्रसंगीत समजून घेतल्याने वाद मिटला, असेच फळ ह्या व्रताचे आचरण करणार्‍याला मिळो अशी देवाचरणी प्रार्थना, साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण!)

---< मी तो श्लोक वाचला खात्री करण्यासाठी वेदपाठशाळेतूनही अर्थ विचारला. त्या श्लोकात दैवी वर्ष असं स्पष्ट लिहले नसले तरी अध्याहृत आहे असे मत आहे. पूर्ण पुस्तक मला अजून मिळाले नाही. मिळाल्यावर मी जास्त लिहीनच-->
@ अविनाश
असा अध्याहृत अर्थ घेतल्यामुळेच घोटाळा झालेला आहे. आणि हा घोटाळा केंव्हा आणि कशामुळे झालाय हे सुद्धा पुस्तकात स्पष्ट केलेले आहे. मी वर लिहिल्याप्रमाणे पुस्तक इंटरनेट वर उपलब्ध आहे. पुस्तक संग्रही ठेवण्यासारखे आहे त्यामुळे विकत घेऊन वाचलात तर उत्तमच. छोटे असल्यामुळे किंमत देखील अत्यंत कमी आहे.

ब्रह्माच्या वयोमानाचा पृथ्वी च्या वयोमानशी संबंध नाही?
अन्य कुठल्या ग्रहावर जीवित सृष्टी असल्याचे आढळले नाही, जे काय आहे ते ब्रह्मा विष्णू महेश ते इथेच आहे.
इथेच म्हणजे भारतीय उपखंडात.

आणि जुरासिक क्रिटोशियस काळात ही ब्रम्ह कार्यरत असायला पाहिजेत या थिअरी नुसार. तेव्हस तर कोणी त्यांची पूजा करत असेल असे मला तरी वाटत नाही मग हे देव कुणावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देत असतील बरे?

हो हो अगदीच शक्य
त्रावणासुर राक्षसापासूनच tyrannosaurus rex नाव आले असणार Happy

१.
विचित्रसुर हा शिकार करून मांस भक्षण करत असे
<<
(स्वतः) शिकार न करता मांस भक्षण करणार्‍या समूहांची नांवे सांगा (३ मारकं, डिस्क्रीप्टिव क्वश्चन)

२.
विचित्रसुर हा शिकार करून मांस भक्षण करत असे
<<
कुणाचे Wink ?

स्वतः) शिकार न करता मांस भक्षण करणार्‍या समूहांची नांवे सांगा (३ मारकं, डिस्क्रीप्टिव क्वश्चन)>>>>>

माणूस, खाटीक शिकार करतो, आम्ही घरी खातो Happy

>>>>>विचित्रसुर हा शिकार करून मांस भक्षण करत असे>>>>
आम्ही डास, झुरळ वगैरे ची शिकार करतो पण मांस कोंबडी, बकरी चे खातो

Pages