इंग्रजी महिन्यांचे घोळ

Submitted by अविनाश जोशी on 11 October, 2017 - 03:27

इंग्रजी महिन्यांचे घोळ
भारतीय पंचांग हे अनंत कालापासून चालत आलेले शास्त्रीय आणि गणितावर आधारित शास्त्र आहे. पंचांग म्हणजे जोतिष (ऍस्ट्रोलॉजि) असा गैरसमज आहे. पंचांग हे जोतिर्विद्या (ऍस्ट्रॉनॉमी) चे शास्त्र आहे. पंचांगात तिथी, नक्षत्र, राशी, योग आणि करण अशी पाच अंग असतात. भारतीय महिने हे सुरवातीपासून बारा च आहेत. चैत्र ते फाल्गुन ही कालगणना अबाधित आहे. पंचांग हे चान्द्रिय कालमापन असून सूर्याच्या भ्रमणाशी जुळवण्याकरिता अधिक महिना येतो. गृह स्तिथी माहिती असल्यास तिथी आणि नक्षत्र अचूक रित्या काढता येते.
पाश्चिमात्य सद्य कॅलेंडर मध्ये जरी जानेवारी ते डिसेंबर बारा महिने असले तरी सुरवातीच्या काळात म्हणजे रोमन कॅलेंडर मध्ये वर्ष ३०४ दिवसाचे होते आणि वर्ष दहा महिन्याचे होते. वर्ष सुरु व्हायचे मार्च मध्ये. मार्च, एप्रिल, मे,जून, जुलै, ऑगस्ट हे सहा महिने सोडले तर उरलेले महिने आकडा दर्शक होते. सप्टेंबर (सातवा), ऑक्टोबर (आठवा), नोव्हेंबर (नववा), डिसेंबर (दहावा) जुलै महिना जुलियस सिजर करिता होता तर ऑगस्ट महिना ऑगस्टस सिजर साठी होता. खिरस्त पूर्व कधीतरी दोन नाव नसलेले महिने वाढवले गेले हे दोन महिने डिसेंबर नंतर वर्षाच्या शेवटी असायचे त्यामुळे गोंधळ अजून वाढला. आता वर्ष ३६० दिवसांचे झाले होते. ख्रिस्तपूर्व ७०० मध्ये त्या महिन्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी नाव ठेवली गेली आणि ते वर्षाच्या सुरवातीला आले. ख्रिस्तपूर्व ७०९ हे १ जानेवारीला सुरु झाले आणि ३१ डिसेम्बरला संपले. याशिवाय मध्येच कधीतरी एक निनावी महिना असायचा त्याला इंटरकॅलेण्डर असे नाव होते त्याचा उपयोग सूर्याभोवतीचे परिभ्रमण जुळवण्याकरिता व्हायचा. ख्रिस्तपूर्व ४६ मध्ये ज्युलियस सिजरनी कॅलेंडर मध्ये बरेच बदल केले. महिन्यांचे दिवस वेगवेगळे झाले. लीप इयर अस्तित्वात आले.
पोप ग्रेगरी ने १६८२ च्या ऑक्टोबर मध्ये सध्याचे कॅलेंडर निर्माण केले त्यावेळेला बारा ते चौदा दिवस सर्व तारखा पुढे गेल्या.
आपले पंचांग मात्र स्थिर कालगणना करते पण इतिहासात आपले वेगवेगळे सण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या इंग्रजी महिन्यात येऊ शकतात. अर्थात हे फक्त १६८२ च्या अगोदरच मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

विचार करा की पृथीवर डिसेंबर चालू आहे. तीन महिन्यांनी म्हणजे मार्चला ग्रहण आहे आणि राहूकेतू सुर्याला खायला येणार आहेत हे एखाद्याला समजले. पण जर त्याच्या कॅलेंडरमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीचे पानच नसेल. तर आता सांगा, त्याचा घोळ उडणार की नाही?

सुर्य >> सूर्य लिही रे. 'प्रसादी'चा शिरा खटकतो ना तुला ? Wink
>>>>>>>>

असामी, तुम्ही सूर्याला सूर्य हे नाव देण्याआधीपासून तो तळपत होता. खगोलशास्त्र हे भाषाशास्त्रापेक्षा प्राचीन आहे. सुर्य म्हणा किंवा सूर्य, ग्रहण टळणार नाही Happy

महाभारतातल्या सूर्यग्रहणाला ग्रेग्रोरियन कॅलेन्डर कशाला पाहिजे?

ऋ, जरा बाहेर जाऊन फिरुन ये. चार दिवसांनी धाग्यावर आलात तरी चालेल. आपले चित्त थार्‍यावर नाहीये.

जौद्या

तुम्ही कालनिर्णय यांचा वापर करा. घोळ होणार नाही

असामी, तुम्ही सूर्याला सूर्य हे नाव देण्याआधीपासून तो तळपत होता. >> मी सूर्याला नाव दिले हे कुठल्या गाढवाने सांगितले तुला ? Wink

महाभारतातल्या सूर्यग्रहणाला ग्रेग्रोरियन कॅलेन्डर कशाला पाहिजे?
>>>>>>>
ओके, म्हणजे महाभारत काळात हे ग्रेगेरीयन कॅलेंडर अस्तित्वातच नव्हते. जानेवारीच नाही तर नोव्हेंबर डिसेंबरही नव्हतेच. ओके, माय मिस्टेक. मी सर्व प्रतिसाद वाचले नाही. धागा महाभारतातल्या सुर्यग्रहणावर गेलेला पाहून मला वाटले असेल काही संबंध.
पण मग दुसरे कोणतेतरी कॅलेंडर होते का? असल्यास कुठले? आणि ते परीपूर्ण बारा महिने ३६५ दिवसांचे होते का? लोकं कालगणना कसे करायचे त्या काळात?

तुम्ही म्हणजे व्याकरणप्रिय मराठी माणसे >> व्याकरणप्रिय मराठी माणसांनी सूर्याला नाव दिले हे कुठल्या गाढवाने सांगितले तुला ? Wink

त्यांनीच सांगितले. जेव्हा एक व्याकरण अप्रिय माणूस सूर्याला सुर्य म्हणाला तेव्हा ते व्याकरणप्रिय मराठी म्हणाले सुर्य काय बोलतोस सूर्य बोलायचे याला ...
चला शुभरात्री... सूर्य उगवल्यावर भेटू Happy

"जेव्हा एक व्याकरण अप्रिय माणूस सूर्याला सुर्य म्हणाला तेव्हा ते व्याकरणप्रिय मराठी म्हणाले सुर्य काय बोलतोस सूर्य बोलायचे याला ..." ह्याचा अर्थ 'सूर्य हे नाव दिले' असा होतो हे कुठल्या गाढवाने सांगितले तुला ? * कधी आपण एखादी वाक्य रचना गडबडीची केली आहे हे मान्य करून त्यावर उगाच टवाळ पोपटपंची न करता ती बसलून पहा, It is not that hard*

कधी आपण एखादी वाक्य रचना गडबडीची केली आहे हे मान्य करून >>>>>>>> ती वाक्यरचना गबबडीची होती हे कोणी ठरवायचे. पुन्हा तुम्हीच व्याकरणप्रेमी माणसांनी Happy

तुम्ही सुर्याला सूर्य हे नाव देण्याआधीही तो होताच आणि तसाच होता ... या वाक्यात जे " तुम्ही " असे लिहिलेय त्याचा अर्थ ते नाव तुम्ही स्वतः दिले आहे असा काढत असाल तर आणखी काय वाक्यरचना करायची Happy

या धाग्यावरच्या सगळ्या पोस्टी मी मन लावून वाचत होतो. रुन्मेशची पहिली पोस्ट वाचली आणि मग फक्त नावे वाचत गेलो. ४-५ नावात रुन्मेश आलं नाही तो पर्यन्त माउस स्क्रोल करत खालीच गेला. मसल मेमरी यु क्नो. Proud

ती वाक्यरचना गबबडीची होती हे कोणी ठरवायचे. >> त्यातले ज्यांना कळते त्यांनीच ते ठरवले आहे. तुला कळत नाही हे हे उघड आहे, तेंव्हा उगाच भाराभार निरर्थक पोस्ट्स टाकण्यापेक्षा परत एकदा ** मधल्या वाक्यांवर विचार करून पाहा.

रूनमेश चे काही मुद्दे बरोबर आहेत।
मला पण वाटतंय क्रिशनाला ग्रहण नव्हते माहीत, अचानक झाले, मौकेपे चौका मार दिया..

च्रप्स, येस्स
किंबहुना अर्जुनाला ग्रहण होते हे माहीत असण्याची शक्यता जास्त आहे जे त्याने नेमके अशी प्रतिज्ञा घेतली आणि त्याच दिवशी घेतली.

अर्जुनाने विमोशनल होऊन घेतले प्रतिग्या.. कावळा बसला फांदी तुटली.. मौके पे चौका मारला... सुदर्शन ला क्रेडिट गेला

मला तर वाटते जसे ईण्ग्रजाण्च्या कॅलेंडरमध्ये आधी जानेवारी नव्हते तसे महाभारताच्या काळी लोकांच्या घड्याळात तासकाटाही नसावा.
अन्यथा आज अचानक सूर्य लौकर कसा मावळला हा प्रश्न एकालाही पडू नये..
घड्याळात तास काटा ठेवायची प्रथा जयसूर्याच्या मृत्युनंतर सुरू झाली असावी..

सूर्यग्रहणाची वेळ ही सूर्यास्ताच्या ११ मिनिटे आधीची होती. सूर्यग्रहणाचा अवधी ४ मिनिटे होता
सूर्यग्रहण सुरु होण्यापूर्वी सूर्य धगाआड गेला. ढग क्षितिजाला टेकेले होते. आणि ढग दूर झाले तेव्हा खग्रास सूर्यग्रहण लागून १ मिनीट झाला होता. सहाजिकच इतर प्राणीमात्रांप्रमाणे मानवांनाही वाटले की सूर्य मावळलाय. अजुर्नाने तयारी केली त्याला तीन मिनीटे लागली. तेवढ्यात पश्चिमेकडे सूर्य किरणे दिसू लागली. आणि सूर्य हळुहळु आकार घेउ लागला. पुढील सात मिनिटात तो क्षितीजाखाली गेला.
थोडक्यात ढग विखुरले ते सूर्यास्ताच्या दहा मिनिटे आधी. तेव्हा लोकांना वाटले की सूर्यास्त झालाय. युद्ध / डावपेचात रमलेल्या लोकांना आज दहा मिनिटे आधीच सूर्य कसा मावळला असा प्रश्न पडला नाही.

>>भारतीय पंचांग हे अनंत कालापासून चालत आलेले शास्त्रीय आणि गणितावर आधारित शास्त्र आहे.

भाऊ ह्याचा नक्की अर्थ काय आहे? इथे वेळ हीच अनंत नाहीये असा एक विचार प्रवाह आहे आणि हे लोक ती वेळ मोजायची पद्धत अनंत काळापासून चालू आहे असे बिनधास्त लिहितात. हिंदू धर्माला जर कोणापासून वाचवायचे असेल तर ह्या अश्या दांभिक हिंदूंपासून वाचवायची गरज आहे. सिंधू नदीच्या काठाला उदयास आलेल्या महान आणि अत्यंत पुरोगामी लोकांच्या संस्कृतीला आज आलेले डबक्याचे स्वरूप आणि त्याच्यावर हे असे स्वयंघोषित संस्कृती रक्षक बेडूक ह्यांच्या पासून आता जर हिंदूना फक्त कल्की अवतारच वाचवू शकेल. ज्या हिंदू धर्माला असंख्य वैदिक ऋषी, व्यास आणि शंकराचार्यांसारखे संगोपनकार लाभले, त्या हिंदू धर्माची आज महानगरपालिकेच्या शाळेतून कसेबसे १० १२ पास झालेली लोकं ज्या पद्धतीने विटंबना करत आहेत ती पाहता भविष्यातील पिढी हिंदू धर्माचा वारसा सांगायला कचरल्याशिवाय राहणार नाही.

फालतू कॉमेंट
हाथी जाए अपनी चालसे
कुत्ते भोंकात जाये

{त्या हिंदू धर्माची आज महानगरपालिकेच्या शाळेतून कसेबसे १० १२ पास झालेली लोकं ज्या पद्धतीने विटंबना करत आहेत}
म्हणजे नक्की कोण? ज्यांच्यापासून हिंदू धर्माला वाचायचं ते म्युन्सिपालटीच्या शाळेत आणि जकसेबसे १०-१२ शिकलेत, असं तुमचं काही सर्वेक्षण आहे का?

या वाक्यासाठी निषेध.

<<<< कालनिर्णय यांचा वापर करा. घोळ होणार नाही>>>
आमचे एक मित्र आहेत. ते दर शुद्ध द्वितीयेला चंद्रदर्शन करतात. गेली साठ वर्षे हे चालू आहे. गरज पडली तर मैलचे मैल दूर जाऊन जिथून ढग आडवे येणार नाहीत अश्या ठिकाणी जाऊन बघतात.
घोळ एव्हढ्यासाठी की कालनिर्णयमधे कधी कधी प्रतिपतेदेच्याच दिवशी चंद्रदर्शन लिहितात. मग या एम एस इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग नि एम बी ए केलेल्या मित्राला प्रश्न पडतो की नक्की कधी चंद्रदर्शन? बरे साधी गोष्ट - दोन्ही दिवस पहा, घोळ कसला?

पण कुठल्याहि विषयात घोळ घाळणे हे आमच्याकडे बुद्धिवादी असल्याचे लक्षण समजतात.

आयला, अमेरिकेत आमच्याकडे दुपारी २ ते ४ सूर्यग्रहण होते तेंव्हा भारतात रात्रच होती ना? म्हणजे रात्रीच ग्रहण झाले की.

तुम्ही बुद्धिवादी आहात का?

मला वाटते इंग्रजी महिन्यांपेक्षा या लेखातच जास्त घोळ आहेत.
१. असे लिहिले आहे की आधी दहाच महिने होते ज्यात जुलै - ज्युलियस सिझर साठी आणि ऑगस्ट... वगैरे आणि 'ख्रिस्तपूर्व ७०० मध्ये त्या महिन्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी नाव ठेवली गेली'. पुढे लिहिले आहे की 'ख्रिस्तपूर्व ४६ मध्ये ज्युलियस सिजरनी कॅलेंडर मध्ये...' - मग जेव्हा १० महिने होते, तेव्हा जुलै आणि ऑगस्ट हे महिने कसे काय होते? त्यांच्याकडे कुणीतरी बरमदेव व्हता आनि त्येला सपान पडलं व्हतं की काय की ७०० वर्षांनी ज्युलियस सिझर जल्माला येनार हाये!
२. 'आपले पंचांग मात्र स्थिर कालगणना करते' - असे असेल तर सूर्याच्या भ्रमणाशी जुळवाजुळव करायची (अधिक महिन्याची) गरज पडली नाही पाहिजे.
३. असेच घोळ मराठी सौर कॅलेंडर, चांद्र-सौर पंचांग, तमिळ कॅलेंडर इत्यादी वेगवेगळ्या कॅलेंडरमध्ये आहेत. शिवाय त्यात टिळक पंचांग वगैरे मॉडिफिकेशन्स पण आहेत. त्यामुळे एकाच वेळी वापरली जाणारी ही पंचांगे वेगवेगळ्या तिथ्या दाखवतात. त्यातले तुम्ही जे पंचांग म्हणता ते आत्ता आहे तसे तयार होण्याआधी वेगवेगळ्या स्थित्यंतरातून नक्कीच गेले असेल, त्यामुळे त्यातही घोळ दाखवता येऊ शकतो.
४. खुलासा - दहा महिने ही गोष्ट खरी आहे, पण त्यात जुलै, ऑगस्ट नसून क्विंटिलिस आणि सेक्सटिलिस असे ५,६ आकडे दर्शवणारे महिने होते. ज्युलियस आणि ऑगस्टस यांनी महिन्यांची फेररचना करताना आपापली नावे एकेका महिन्याला दिली.
५. न्युमा नावाच्या रोमन राजाने जानेवारी आणि फेब्रुवारी हे पहिले दोन महिने ठरवले - असे मानले जाते.
६. ज्युलियस सीझरच्या आधी 'इंटरकॅलरी मंथ' असा एक तेरावा महिना (२३ दिवसांचा) अस्तित्वात होता, जो फेब्रुवारीनंतर यायचा.

Pages