दीपावली शुभेच्छा

Submitted by सेन्साय on 19 October, 2017 - 06:36

(प्रेरणा स्त्रोत ― व्हाट्स अप वरील एक अनामिक मेसेज)

____________________________________________________

.

.

दिवाळी साजिरी करितो संसार
कंदील फटाके रंगोलीची किनार
गोडधोड़ फराळ जणु मिष्टान्न माहेर
राहिला कर्मवशे जो ह्या चाकोरी बाहेर
अर्पितो तयां सर्वांसी हां शुभेच्छा आहेर

आकाशी रोषणाई फटाक्यांची आतिषबाजी
बजेटमुळे बाबांचा खिसा जेथ न होई राजी
हिरमोड न होवो त्या बाल गोपालांचा
मनसोक्त फटाके खरेदीता यावेत हि एक शुभेच्छा.....

लाडू, करंज्या, चिवडा असा दिवाळी फराळ
अशक्य ज्या स्त्रीस, गळा पड़ता गरीबीची माळ
अश्या गृहिणीच्या मुलांचीसुद्धा टळु दे आबाळ
ताटे फराळाची भरगच्च सजू देत हि एक शुभेच्छा.....

पाडव्याची भेट एखादा सोन्याचा दागिना
बायकोस देता यावा म्हणून कष्टाळला महिना
तूटपूंज्या कमाईत अनेक वर्षे जेथे जमेना
यंदा तरी योग पुर्ण व्हावा हि एक शुभेच्छा.....

धुणीभांडी करणारी ती गरिबाची सिंड्रेला
गेली दोन वर्ष पंजाबी ड्रेस मनात ठसलेला
ओवाळणी लाभु दे ह्या भाऊ बिजेला
सुंदर ड्रेस शिवता यावा हि एक शुभेच्छा.....

असंख्य अगणित उरलेल्या आकांक्षा
देवा साकडं घालतो, पुरव रे अपेक्षा
स्वप्नपूर्तिनी उजळेल ह्यांच्या दशदिशा
दिवाळीसाठी लाभु दे ही तुझी शुभेच्छा....

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान... Happy
आवडली आणि समजली पण बर्र का. Lol

खूप छान अंबज्ञ.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद परी Happy
मानवजी आणि सचिनजी Happy

तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खुप साऱ्या शुभेच्छा

छान !