ऐन दिवाळीत फटाकेबंदी ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 October, 2017 - 13:54

सध्या आपले धर्मनिरपेक्ष सुप्रीम कोर्ट फार सक्रिय झाले आहे. जागोजागी फटाकेविक्रीवर बंदी आणली आहे. हिंदु बहुसंख्य असलेल्या या देशात भारतभरात दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा केला जात असल्याने जनमाणसांत तर्हेतर्हेच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

विचारसरणी क्रमांक १ -

ऐन दिवाळीतच यांना प्रदूषण आठवते का? हॅपी न्यू ईयरला फटाके उडवले तर चालते वाटते? त्याने प्रदूषण नाही का होत? (भले तेव्हा फटाके उडवणारेही आपलेच लोकं का असेना) पण या बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात हिंदूंच्या सणांनाच पर्यावरणाची काळजी का वाटते? दिवाळीला फटाके नको, गोकुळाष्टमीला हंडी नको, होळीला पाण्याची नासाडी नको. पण बकरी ईदला रस्त्यावर बकरे कापलेले आणि रक्ताचे पाट वाहिलेले बरे चालते.

चेतन भगतसारख्या विचारवंत साहित्यिकाने देखील असेच काहीसे टवीट केले आहे.

Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
आज अपने ही देश में, उन्होंने बच्चों के हाथ से फुलझड़ी भी छीन ली। हैपी दिवाली मेरे दोस्त।
11:44 AM - Oct 9, 2017

Chetan Bhagat ✔@chetan_bhagat
Can I just ask on cracker ban. Why only guts to do this for Hindu festivals? Banning goat sacrifice and Muharram bloodshed soon too?
11:37 AM - Oct 9, 2017

चे. भगतची बातमी ईथे वाचू शकता - http://www.loksatta.com/desh-videsh-news/chetan-bhagat-wants-diwali-cele...

विचारसरणी क्रमांक २ -

दरवेळी प्रत्येक गोष्टीला धर्माच्या चष्म्यातून बघणे गरजेचे आहे का? प्रदूषण खरेच एक गंभीर समस्या झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या चार दिवसात करोडो फटाक्यांतून एकाच वेळी निघणारा विषारी धूर रोखणे खरेच गरजेचे आहे.

संबंधित बातम्या खालील लिंकावर वाचू शकता

http://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-court-bans-firecrackers...

http://www.loksatta.com/mumbai-news/bombay-hc-imposes-ban-on-sale-of-fir...

मला दुसरी विचारसरणी पटते.
मी स्वत: ईयत्ता आठवी नववी पर्यंत फटाके वाजवण्याचा आनंद लुटला आहे. त्यामुळे आपण आपल्या लहानपणी जो फटाक्यांचा आनंद लुटला त्याला आताची लहान मुले मुकतील असाही विचार मनात येतो. पण उद्या जर त्यांना मोकळ्या आणि शुद्ध हवेत श्वास घ्यायचा असेल तर हे गरजेचे आहे. ही वेळ आपण स्वत:च त्यांच्यावर आणली आहे. तर आता उगाच हळहळ व्यक्त करण्यात अर्थ नाही.

तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे, आपण आपल्या आनंदासाठी पर्यावरणाचा र्‍हास करत दुसर्‍यांच्या जीवाशी खेळ करू शकत नाही.

आपले काय मत आहे?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो दुहेरी,

तो दुहेरी मेसेज दिसतो आहे. एकेरी नाही.

पहिला डायलाग कुॠंचा आहे. त्याला ते म्हणताहेत "काय पण लॉजिक" Uhoh

मग तुमच्या अमुक तारखेच्या प्रतिसादास +१ लाईक देताहेत.

माबोची सवय होईल हळू हळू. लोड नका घेऊ.

united स्टेट्स ऑफ कोथरूड, कर्वे नगर स्टेट अजून तरी शांत आहे,
<<

असली छातीठोक विधानं करत जाऊ नका. तेही यूस्केतून Wink
लग्गेच सर्व्हे येईल की युएस्केत किती आवाज आले, अन किती फटाके फुटलेत. Lol

हे मी कधी लिहिलं... >>>

अहो पहिले ऋन्मेऽऽष ने लिहिले आहे. त्याला मी " काय पण लोजिक " असे म्हणले आहे.

तुमच्या प्रतिसादाला +१ दिले आहे.

दोन ठिकाणी >>> वापरले आहे.

Oh! ok ok.. thanks thanks सांगितल्या बद्दल.
आ. रा. रा आणी राहुलका ह्यांना

ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गैरसमज दूर जाहले, मनी आनंद जाहला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

{{{ या उलट गुजराती लोकं मात्र लक्ष्मीबार वाजवायचे नाहीत. (चूक असेल तर कर्रेक्ट करा, दादामामांकडून ऐकीव माहीती आहे) . }}}

तांत्रिक चूक आहे. लोक लिहावे. लोकं नव्हे.

बिपीनजी धन्यवाद. यापुढे लक्षात राहील.

बाकी फटाकेबंदीने दक्षिण मुंबईवर थोडा फरक पडल्याचे जाणवत आहे.
पण खरा काय तो फैसला आज लक्ष्मीपूजनाच्या रात्री लागेल. पूजा झाल्यावर ईथे नुसता धुरळा उडतो. आज किती आकाश व्यापते ते बघायला हवे.

Pages