इंग्रजी महिन्यांचे घोळ

Submitted by अविनाश जोशी on 11 October, 2017 - 03:27

इंग्रजी महिन्यांचे घोळ
भारतीय पंचांग हे अनंत कालापासून चालत आलेले शास्त्रीय आणि गणितावर आधारित शास्त्र आहे. पंचांग म्हणजे जोतिष (ऍस्ट्रोलॉजि) असा गैरसमज आहे. पंचांग हे जोतिर्विद्या (ऍस्ट्रॉनॉमी) चे शास्त्र आहे. पंचांगात तिथी, नक्षत्र, राशी, योग आणि करण अशी पाच अंग असतात. भारतीय महिने हे सुरवातीपासून बारा च आहेत. चैत्र ते फाल्गुन ही कालगणना अबाधित आहे. पंचांग हे चान्द्रिय कालमापन असून सूर्याच्या भ्रमणाशी जुळवण्याकरिता अधिक महिना येतो. गृह स्तिथी माहिती असल्यास तिथी आणि नक्षत्र अचूक रित्या काढता येते.
पाश्चिमात्य सद्य कॅलेंडर मध्ये जरी जानेवारी ते डिसेंबर बारा महिने असले तरी सुरवातीच्या काळात म्हणजे रोमन कॅलेंडर मध्ये वर्ष ३०४ दिवसाचे होते आणि वर्ष दहा महिन्याचे होते. वर्ष सुरु व्हायचे मार्च मध्ये. मार्च, एप्रिल, मे,जून, जुलै, ऑगस्ट हे सहा महिने सोडले तर उरलेले महिने आकडा दर्शक होते. सप्टेंबर (सातवा), ऑक्टोबर (आठवा), नोव्हेंबर (नववा), डिसेंबर (दहावा) जुलै महिना जुलियस सिजर करिता होता तर ऑगस्ट महिना ऑगस्टस सिजर साठी होता. खिरस्त पूर्व कधीतरी दोन नाव नसलेले महिने वाढवले गेले हे दोन महिने डिसेंबर नंतर वर्षाच्या शेवटी असायचे त्यामुळे गोंधळ अजून वाढला. आता वर्ष ३६० दिवसांचे झाले होते. ख्रिस्तपूर्व ७०० मध्ये त्या महिन्यांची जानेवारी आणि फेब्रुवारी नाव ठेवली गेली आणि ते वर्षाच्या सुरवातीला आले. ख्रिस्तपूर्व ७०९ हे १ जानेवारीला सुरु झाले आणि ३१ डिसेम्बरला संपले. याशिवाय मध्येच कधीतरी एक निनावी महिना असायचा त्याला इंटरकॅलेण्डर असे नाव होते त्याचा उपयोग सूर्याभोवतीचे परिभ्रमण जुळवण्याकरिता व्हायचा. ख्रिस्तपूर्व ४६ मध्ये ज्युलियस सिजरनी कॅलेंडर मध्ये बरेच बदल केले. महिन्यांचे दिवस वेगवेगळे झाले. लीप इयर अस्तित्वात आले.
पोप ग्रेगरी ने १६८२ च्या ऑक्टोबर मध्ये सध्याचे कॅलेंडर निर्माण केले त्यावेळेला बारा ते चौदा दिवस सर्व तारखा पुढे गेल्या.
आपले पंचांग मात्र स्थिर कालगणना करते पण इतिहासात आपले वेगवेगळे सण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या इंग्रजी महिन्यात येऊ शकतात. अर्थात हे फक्त १६८२ च्या अगोदरच मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

याला आज घोळ म्हणायला नको. हे जेंव्हा होत होते तेंव्हा कदाचित झाला असेल घोळ लोकांचा,
खरा घोळ आजहि होतो तो अमेरिकेत तारखा लिहिण्याची पद्धत (महिन, दिवस वर्ष) नि जगात इतरत्र वापरण्यात येणारी पद्धत (दिवस, महिन, वर्ष) यांच्यामुळे होतो ज्यांचा भारत, किंवा इंग्लंड नि अमेरिका यांच्याशी संबंध असतो. जरा विसरले तर घोळ होऊ शकतो.

पोप ग्रेगरी ने १६८२ च्या ऑक्टोबर मध्ये सध्याचे कॅलेंडर निर्माण केले त्यावेळेला बारा ते चौदा दिवस सर्व तारखा पुढे गेल्या.
>>
पोप ग्रेगरीने नक्की काय बदल केले जेणेकरुन सर्व तारखा १२ ते १४ दिवस पुढे गेल्या?
नक्की किती दिवस पुढे गेल्या? १२ की १४?
या बदलाचा भारतावर काय परिणाम झाला? विशेषतः महाराष्ट्रावर?

इंग्रजी कॅलेंडर ट्यून केलंय. आपलं पंचांग ही अधिक महिना घालून ट्यूनच केलंय की. बाकी अनादी शास्त्रीय आणि आपण कसे महान आशय असल्याने wa वर चालेल हा लेख.

मला असे म्हणायचे नाही
अजुन एका लेखान्मतर रामब्नवमी जानेमग्धे ७००० वर्ष पुर्वि कशी होती हे साम्गायचे आहे

विनोद नि उपहास बाजूला ठेवून, ग्रेगरीयन कॅलेंडर मधे केले गेलेले बदल हा युरोपच्या इतिहासाचा एक अविभाज्य हिस्सा आहे. गूगल केलेत तर अतिशय interesting महिती मिळते.

ग्रेगरीने केले;या बदल हे अत्यन्त लॉजिकल आणि प्रॅक्टिकल आहेत. १
1752 began on 1 January. To align the calendar in use in England to that on the continent, the Gregorian calendar was adopted: and the calendar was advanced by 11 days: Wednesday 2 September 1752 was followed by Thursday 14 September 1752. The year 1752 was thus a short year (355 days) as well.

सुर्याभोवती आपली पृथ्वी फिरते त्या कालखंडाला मॅच करायला उगाच हट्टाने हे कॅलेंडर अ‍ॅडजस्ट केले आहेत. जेव्हा सुर्य पृथ्वीभोवती फिरतो असा लोकांचा समज होता तेव्हाही ते सुखाने जगत होतेच की.. पण यांनी अशी कॅलेंडरं बदलल्याने त्या नॉस्ट्राडेमसच्या भविष्यांचा पटकन अंदाज येत नाही

the calendar was advanced by 11 days:
>>
इथे ११ दिवस दिलेय. तुम्ही १२ १४ दिवस म्हणताय.
नक्की किती दिवस वाढवलेत.

ख्रिस्तपूर्व ७०० वर्ष पूर्वी जानेवारी वाले कॅलेंडर तयार झाले, मग ७००० वर्षापूर्वी रामनवमी जानेवारीत कशी काय असेल?

अजुन एका लेखान्मतर रामब्नवमी जानेमग्धे ७००० वर्ष पुर्वि कशी होती हे साम्गायचे आहे>>
हां आता कस्सं वळणावर आलात... या पुढं कडेकडेने Happy

विषय चांगले निवडता तुम्ही. मला वाटतं तुम्ही दिवसाआड किमान दहा लेख लिहिलेत तर तेवढ्या प्रॅक्टीसनंतर मुद्देसूद आणि अर्थगर्भ, अभ्यासू असे काही लिहिता येईल. त्याआधी पुरेसं वाचन केलंत तर अजून मदत होईल. न मागितलेला सल्ला देतोय, माफी असावी.

<<<<अजुन एका लेखान्मतर रामब्नवमी जानेमग्धे ७००० वर्ष पुर्वि कशी होती हे साम्गायचे आहे>>>

त्याच लेखात हेहि स्पष्ट करा की रामाचा जन्म अयोध्येत बरोब्बर जिथे मशीद बांधल्या गेली तिथेच झाला होता. म्हणजे एक मोठा प्रश्न मिटेल.

ख्रिस्तपूर्व ७०० वर्ष पूर्वी जानेवारी वाले कॅलेंडर तयार झाले, मग ७००० वर्षापूर्वी रामनवमी जानेवारीत कशी काय असेल?
>>>>>>>>

जेव्हा जानेवारी कॅलेंडर तयार झाले तेव्हा त्यावरून उलटे मागे मोजत गेले की रामजन्मावेळी जानेवारी येत असेल.

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यांचा अंदाज न येताही लोक सुखाने जगत होतेच की रे Happy
>>>>

मिळमिळीत जगणे म्हणजे सुख नव्हे. लाईफमध्ये थ्रिल नको का?
तुम्हाला क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास जसा लक्ष्मण वनडे मध्ये खेळायचा. बॉल जसा आला तसा त्यानुसार तटवला. नाकासमोर खेळणे. काही इनोवेशन नको का.. म्हणून एकदिवसीय संघात जागा बनवू शकला नाही.

रामाचा विषय लक्ष्मणावर नेल्याबद्दल क्षमस्व !

असेच उलटे गेले की पृथ्वीचा जन्म कुठल्या महिन्यात झाला ते पण काढता येईल ना!

मधे खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी महाभारत कुठल्या महिन्यात झालं ते पण काढणार होते म्हणे. "हा सूर्य हा जयद्रथ" च्या वेळी म्हणे खग्रास सूर्यग्रहण होतं नी याआधीच्या ग्रहणांच्या तारखा काढून ती युद्धाची तारीख काढता येईल. पण आपण पंचांग नी खगोलशास्त्रात एवढे प्रगत असताना कृष्ण सोडून कोणालाच आज सूर्यग्रहण आहे हे माहीत नव्हते म्हटले तर परत आपलीच वाट लागेल म्हणून राहिलं बहुदा.

आपले वेगवेगळे सण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या इंग्रजी महिन्यात येऊ शकतात. अर्थात हे फक्त १६८२ च्या अगोदरच मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.>>>>
शिवजन्माचा वाद यामुळे निर्माण झालाय का?

शिवजन्माचा वाद यामुळे निर्माण झालाय का?
>>
हो सिम्बा. ग्रेगरिने ऐनवेळी कॅलेंडर १२ दिवसांनी पुढे नेले त्यामुळे काही दस्तावेजात ग्रेगरिने केलेल्या बदलानुसार तर काही दस्तावेजात जुन्या पद्धतीची तारीख आहे. असे वाचल्याचे स्मरते.
वरदाताई याविषयी जास्त माहिती देऊ शकतील.

कृष्ण सोडून कोणालाच आज सूर्यग्रहण आहे हे माहीत नव्हते म्हटले तर
>>>>
मला नाही वाटत हे कोणाला माहीत असावे. मुळात पृथ्वी गोल आहे, आणि सुर्य पृथ्वीभोवती नाही तर पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे शोध अलीकडच्या काळातले आहेत ना? सुर्य हा एक तारा आहे आणि पृथ्वी हा एक ग्रह आहे हे जुजबी ज्ञानही ज्या काळात लोकांना नव्हते त्यांच्याकडून ग्रहण वगैरे माहीत असण्याच्या अपेक्षा फार नाही का झाल्या?

अरे बाळा, खूप आधीपासून ग्रहण काळात हे करायचं नाही नी ते करायचं नाही हे पाळत लोक. राहू का केतू का अजून कोणीतरी चंद्र नी सूर्याला खात. ग्रहण नेमके कसे होते माहीत नसले तरी ग्रहण आहे हे आधीच माहीत असायचे.

राहू का केतू का अजून कोणीतरी चंद्र नी सूर्याला खात.
>>>>
हो पण त्या राहू केतूला भूक कधी लागणार हे ते आधीच कसे ओळखायचे? तेव्हा तर कॅलेंडरमध्ये जानेवारीसुद्धा नव्हता Sad

मिळमिळीत जगणे म्हणजे सुख नव्हे. लाईफमध्ये थ्रिल नको का? >> नॉस्ट्राडेमसच्या भविष्यांचा अंदाज हे थ्रिल का आयुष्यातले ? ग.फ्रे. काय म्हणेल अशाने ? Wink

सुर्य >> सूर्य लिही रे. 'प्रसादी'चा शिरा खटकतो ना तुला ? Wink

Pages