चमत्कार-दृष्टिकोन

Submitted by र।हुल on 5 October, 2017 - 19:57

पहिल्यांदा मी चमत्काराची व्याख्या करतो.
'चमत्कार म्हणजे अशा गोष्टी ज्या बघणार्याच्या जाणिवेला, बुद्धीला; ज्ञात माहितीस्त्रोत वापरून, ज्ञात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची परीमाणं लावून बघितली असता अनाकलनीय असतात.'
[व्याख्या ढोबळमानाने केली आहे. चुकल्यास कर्रेक्ट करा. Happy ]

चमत्कार!!!!!!
चमत्कार म्हटलं की सामान्य लोकांचे डोळे हे विस्फारणारच! आध्यात्मिक जगतात त्यांच स्वतंत्रपणे मुल्यमापन होणार. शास्त्रज्ञ, संशोधक वृत्तीची माणसं चमत्कारांना न नाकारता त्यांच्यापाठीमागिल दडलेलं ज्ञात-अज्ञात विज्ञान-तंत्रज्ञान शोधण्याच्या खनपटीला लागणार. आस्तिक, ईश्वरवादी मंडळी चमत्कारांना अमानवीय, अतिमानवीय, दैवी अथवा असुरी गोष्ट समजून श्रद्धेनं हात जोडणार किंवा घाबरून धास्ती घेणार तर निव्वळ नास्तिक असणारे लोक चमत्कारांची खिल्ली उडविणार, सगळी हातचलाखी आणि फसवेगिरी आहे असं सांगून मोकळे होणार. कोणी छद्मविज्ञान म्हणणार. शेवटी ज्याची जशी वैचारिक बैठक तसा तो विचार करणार.

आता माझी योगशास्त्रीय बैठक असलेली भूमिका मांडतो. थोडी क्लिष्ट जरूर आहे पण त्याला पर्याय नाही.
योगशास्त्र सुक्ष्म शारीरिक पातळीवर काम करतं. 'योग' म्हणजे निव्वळ आसनं, प्राणायाम नसून त्याबरोबरच ध्यानधारणा, जप याही गोष्टी त्यात अंतर्भूत होतात. संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारे सात यौगिक चक्रे, तिन लाखांहून अधिक यौगिक नाड्या त्यांतील प्रमुख चौदा व प्रधान तिन नाड्या या सर्वांमध्ये विश्वातलं चैतन्य आत्मरूपानं सुप्तावस्थेत विखुरलेलं असतं. ज्यावेळी साधनेला सुरूवात केली जाते तेव्हा प्रथम शरीरशुद्धीनंतर, मिळालेल्या जपाच्या सहाय्यानं मुलाधारस्थित कुंडलीनीला जागृतावस्थेत आणण्यासाठीचा प्रयत्न केला जातो. यादरम्यान जसजसं शरीर यौगिक पातळीवर विकसित होत जातं, तुमचं आध्यात्मिक तेज आणि शक्ती वाढीस लागते. त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. 'त्राटक' साधलं तर एखाद्याच्या भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा वेध घेणं अवघड नसतं. 'केवल कुंभक' साध्य झालं असता मंत्रोच्चारानं अनाकलनीय गोष्टी घडतात आणि घडवता येऊ शकतात. कुंडलिनीच्या जागृतीनंतर तिच्या पुढील प्रवासादरम्यान अष्टसिद्धि तुमच्यासमोर हजर होतात आणि तुम्ही बाबा, महाराज वैगरे म्हणून प्रसिद्धी मिळवण्याच्या पायरीवर येऊन पोहोचता! Lol
पण खरी मेख येथेच असते ज्या गोष्टीला साधक भुलतो आणि साधनमार्गावरून भरकटण्याकडे पावलं टाकायला आपोआप सुरूवात होते. 'पिंडी ते ब्रम्हांडी' हा प्रवास-ध्येय, चमत्कार आणि सिद्धींच्या नादी लागून विसरलं जातं आणि लोभ, मोह, माया आणि बाया (बाबा) यांत साधना करणारा योगी अडकतो. 'योगी' न राहता तो 'भोगी' बनतो. मग समाजासमोर जेव्हा अशी चीड आणणारी प्रकरणं येतात तेव्हा मात्र समाजामध्ये धर्म, आध्यात्म याच गोष्टी बदनाम होतात. हे थाबणं गरजेचं आहे.
ज्या चमत्कार्यांना वरील मार्ग साधत नाही ते हातचलाखीवाले चमत्कार करून लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात, कधीतरी पकडले जातात आणि मग नास्तिकांना धर्मविरोधी बळ येतं.
नैसर्गिक चमत्कार हे मात्र निसर्गाची किमया म्हणून सहजपणे स्विकारले जातात.
शेवटी चमत्कार ही एक सापेक्ष गोष्ट असते! ज्याला त्यापाठीमागिल कारणं माहीत असतात त्याला 'चमत्कार' हा चमत्कार वाटतच नाही.
आपल्याला काय वाटतं? आपण चमत्कारांकडे कोणत्या नजरेतून पहाता?

धन्यवाद! Happy

आपलाच,
-र।हुल. /५.१०.१७

Group content visibility: 
Use group defaults

त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. '
>>> मला झेपले नाही हे.. म्हणजे कळलेच नाही..

लेख चांगला आहे.. आणि चमत्कार सापेक्ष असतो हे माझे पण मत आहे...

शिर्षकात चमत्कार पाहुन लगेच वाचायला घेतले,
पण बरेच डोक्यावरुन गेले. म्हणजे कळलेच नाही..

जरा एखादे सोपे उदाहरण देता आले असते तर कदचित थोडेफार कळले असते असे वाटले.
@ च्रप्स >>>> चमत्कार सापेक्ष असतो हे माझे पण मत आहे... + ११११११११

अजुन एक सोपी व्याख्या कुठं तरी वाचलेली आठवली
" जे मानवाचे प्रारब्ध बदलते तोच खरा चमत्कार "
जादूने हवेतुन कोंबडी काढली तर काय होईल ? ह्यास चमत्कार म्हणावे का हात चलाखी ! आणि अश्या गोष्टीने फारफार तर एकवेळचं जेवण करून पोट भरेल Happy पण जी सद्गुरुकृपा त्या मानवाचे नशीब बदलू दाखवते, प्रारब्ध बदलून देते तोच त्या भक्ताच्या आयुष्यातील खरा चमत्कार Happy
साईनाथ असो की ज्ञानेश्वर माऊली ह्या सर्वानी भक्ताना जीवन विकास साधता यावा म्हणून चमत्कार घडवून आणले

चमत्कार करणारे बदमाश असतात व त्यावर विश्वास ठेवणार मूर्ख असतात असे अब्राहम कोवूर म्हणायचे. अंनिस त्यांचे हे वाक्य सुरवातीच्या काळात वापरत असे. चमत्कार असेल तर नमस्कार असतो म्हणून बाबा बुवा चमत्काराच्या हकीगती पसरवतात. चमत्कारा मागचे विज्ञान ज्ञात झाले की चमत्कार हा चमत्कार रहात नाही. पण जेव्हा चमत्कार अनुभूती शी निगडीत असतो तेव्हा तो व्यक्ती सापेक्ष बनतो. अनुभूती कशी दुसर्‍याला ट्रान्स्फर करणार? जेव्हा ही बाब बदमाशी साठी वापरली जाते त्यावेळी त्यामागचे वैज्ञानिक सत्य हे लोकांना सांगितले पाहिजे. अनुत्तरीत प्रश्न हे नेहमीच असणार त्यामुळे वर तुम्ही व्याखेत बसवलेला चमत्कार हा कायमच असणार आहे.

त्राटक, केवल कुंभक वैगरे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला साध्य करता आल्या तर तुमच्याकडून चमत्कार घडणं विशेष नसतं. 'त्राटक' साधलं तर एखाद्याच्या भूतकाळाचा, वर्तमानकाळाचा वेध घेणं अवघड नसतं. 'केवल कुंभक' साध्य झालं असता मंत्रोच्चारानं अनाकलनीय गोष्टी घडतात आणि घडवता येऊ शकतात. कुंडलिनीच्या जागृतीनंतर तिच्या पुढील प्रवासादरम्यान अष्टसिद्धि तुमच्यासमोर हजर होतात
>>>>>

हे सोडून बाकी लेख पटला Happy

ठांकू

त्या तांब्याच्या पोथीवर/पत्र्यांवर काहीही दिसत नाही. पण तो खडू? भुवयांच्या मध्ये ठेवून पोथीवर मन एकाग्र केल्यावर पोथीवर कुठलेही पान उघडून बोट ठेवले असता अक्षरं दिसू लागतात व बोट पुढे जाताच मागची अक्षरं गायबतात.
-- मला झालेलं आकलन.