Submitted by अजय चव्हाण on 5 October, 2017 - 00:57
तुझ्या आठवणीत रमताना
रात ही अशीच सरायची..
घेऊन ये तु पुन्हा ती आठवण..
मनाला किती ती गोड वाटायची..
चंद्र तारकांच्या जगात स्वतःला हरवत जायचो..
मंद चांदण्या प्रकाशात तुलाच मी शोधायचो.
ओघवत्या वार्यावर मग एक प्रेमफूल लहरायचे.
उमलत जायची रातराणी अन् हळूच मनाचे दार उघडायचे..
शब्दबद्ध कवितेला नवा एक सुर यायचा..
संगीत नसलं तरीही त्यात मल्हार वाहायचा...
वाहत्या मल्हार रागात भिजणं मला कधी जमलचं नाही..
व्हायच ओलचिंब मन तुझ तेव्हा, तुला ते व्यक्त करता आलंच नाही..
पुसट होत गेल्या वाटा त्या नागमोडी हे वळण आले..
निघण्याआधी अश्रू माझे तेव्हा दवबिंदू झाले...
सोनेरी किरणे हे जरी नवी...
प्रित तुझी माझी अजुनही जुनी..
ये परत एकदा तु..आयुष्य थोड सरायचं आहे..
थोडसंच जगलो मी तुझ्यात अजुन मला जगायचं आहे..
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान..
छान..
व्वा क्या बात सुंदर लिहिलिये
व्वा क्या बात सुंदर लिहिलिये कविता
ओघवत्या वार्यावर मग एक प्रेमफूल लहरायचे.
उमलत जायची रातराणी अन् हळूच मनाचे दार उघडायचे..
शब्दबद्ध कवितेला नवा एक सुर यायचा..
संगीत नसलं तरीही त्यात मल्हार वाहायचा. >>> मस्त
छान आहे पण लेख असल्यासारखी
छान आहे पण लेख असल्यासारखी वाटली अन तशीच वाचली सुद्धा.
अगदी शेवटी जेव्हा ग्रुप पाहिला तेव्हा कळले कविता आहे लेख नाही.
थोडसंच जगलो मी तुझ्यात अजुन मला जगायचं आहे.. >>> हे वाक्य जास्त आवडले.
छान..
छान..
धन्यवाद..मेघा,मि.पंडीत,व्ही
धन्यवाद..मेघा,मि.पंडीत,व्ही.बी.,सायुरी..
Chanch
Chanch
सहजसुंदर मांडणी , मला नेहेमीच
सहजसुंदर मांडणी , मला नेहेमीच आवडत आलेली आहे .. सुदैवाने आपली भेट घडली आणि मला हे सांगण्यात आनंद होत आहे कि आपली शैली सहजसुंदर आहे .
काळाची गरज
काळजाचा भेद
शब्दांचा खेळ
भावनांचा मेळ
नात्यांचा प्रवाह
अश्रूंचा डोह
फुका उहापोह
सिद्धी म्हणे