सांग आता काय उरलं आहे ...!

Submitted by satish_choudhari on 29 September, 2017 - 08:06

सांग आता काय उरलं आहे
तुझ्या नी माझ्यापाशी ..

सांज घटका सुनी सूनी
निर्जन रस्ता दूर दूर
दिसत नाही कुणी
विसावलेले थकलेले
सारे क्षण थांबलेले
एक झाड़ आठवणींच
लागतं कुठंतरी ...

अन मग सुरु होतो
एक खेळ सावल्यांचा
ऊन तुझ्या आठवनींचे
चटके देऊन जाते
त्याच उन्हात प्रेम तुझे
सावली बनून येते
असेच कधीतरी ...

पुढे कुठं जायचं येथून
आता माहीत नाही
कुठली वाट कुठली दिशा
काहीच माहीत नाही
काही तरी राहून गेलं आहे
त्या हरवलेल्या जगाशी
सांग आता काय उरलं आहे
तुझ्या नी माझ्यापाशी ...

@ सतीश चौधरी ...

Group content visibility: 
Use group defaults