Submitted by अनन्त्_यात्री on 27 September, 2017 - 02:15
जांभळ्या टेकडी तळिचे
ते तळे खुणावुन हसले
अन पहाटफुटणी मधल्या
केशरात अलगद लपले
थरथरली तीरावरची
गवताची पाती ओली
वाऱ्याची फुंकर येता
पाण्यावर झुंबर फुटले
घनदाट शांतता तिथली
तोलून थिरकत्या पंखी
पाखरू एक इवलेसे
क्षण एक लकेरुन गेले
नि:शब्द, तरल जे सारे
ते इथेच जन्मा आले
कोवळे ऊन टिपताना
हलकेच धुके शिरशिरले
चल पुन्हा तळ्याच्या काठी
चल पुन्हा, पुन्हा चल जाऊ
अस्वस्थ जगाचे मागे
कोलाहल सोडुनी सगळे.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निकु, जोतिराम धन्यवाद
निकु, जोतिराम धन्यवाद
छान.
छान.
मस्त..!
मस्त..!
कवितेतलं वर्णन डोळ्यांसमोर आलं.
सामो, रूपाली धन्यवाद
सामो, रूपाली धन्यवाद
वा फार सुंदर
वा फार सुंदर
खूप खूप छान कविता
खूप खूप छान कविता
अप्रतिम! तरल भावस्पर्शी रचना!
अप्रतिम! तरल भावस्पर्शी रचना!
Meghvalli, गंधकुटी, निखिल
Meghvalli, गंधकुटी, निखिल मोडक कवितेच्या इतक्या जुन्या धाग्यावर आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद
Pages