गडदुर्गा - श्री पट्टाई देवी , विश्रामगड (१)

Submitted by मध्यलोक on 21 September, 2017 - 13:16

नवचैतन्य, नवरस, नवरंग ह्यांचा उत्सव म्हणजे नवरात्र. आदिमाया आदिशक्तिच्या भक्तित लीन होण्याचे पर्व म्हणजे नवरात्र. पुराणकालापासून शक्तिची देवता म्हणून मनुष्य स्त्री रूपातील देवताची पूजा करत आला आहे. मग ती देवता कधी नदीच्या स्वरुपात तर कधी रक्षणकर्तीच्या स्वरुपात तर कधी आईच्या स्वरुपात.अश्याच काही आदिशक्तिची स्थापना झाली आहे गड-दुर्गावर.

पुणे नाशिक महामार्गावरील सिन्नर पासून जवळच असलेल्या टाकेद गावा शेजारी आहे पट्टेवाडी, सुप्रसिद्ध पट्टा किंवा विश्रामगड किल्ल्यांचे पायथ्याचे गाव. बहमनी राजवटीत हा किल्ला बांधला गेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला. ई. स.१६७९ साली जालन्याच्या बाजारपेठेची लूट करून रायगड कडे परतत असताना, रणमस्त खानाच्या पाठलागाला बहिर्जी नाईकांच्या मदतीने गनिमीकावा देवून महाराजांनी पट्टा येथे तब्बल महीनाभर विश्राम केला म्हणून गडास नाव मिळाले विश्रामगड. लूटीतील दौलत स्वराज्याच्या कामी येवो कादाचित ही येथील "श्री" पट्टाईची ईच्छा

गडस्वामिनी असलेली ही आदिमाया अष्टभुजा असून मंदिराचा इतक्याच जीर्णोद्धार झाला आहे. मंदिर प्रशस्त असून भक्त व पंथास्थाला गड चढून आल्यावर विश्राम करण्याची हक्काची जागा देते. मंदिरा शेजारी पाण्याचे कातळातील खोदीव टाके आहे आणि ह्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

किल्ल्यावर अंबरखाना, बारा टाकी, बुरुज, कातळात खोदलेले धान्यकोठार विशेष बघण्यासारखे आहे.

Pattai.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"किल्ल्यावर अंबरखाना, बारा टाकी, बुरुज, कातळात खोदलेले धान्यकोठार विशेष बघण्यासारखे आहे." हे फोटो पण हवे होते.

निर्झरा धन्यवाद.
गडदुर्गा बद्दल माहिती होती म्हणून इतर फोटो आणि सविस्तर माहिती नाही लिहिली. फोटो पोस्ट करण्याच्या प्रयत्न करतो Happy

मस्त माहिती आणि फोटो Happy

याच धाग्याच्या शीर्षकात गडाचे नाव नव्हते म्हणून ते दिले आहे. पण ते चुकीचे असले तर क्षमस्व , बदलून योग्य ते ठेवा..>>>>>बरोबर आहे, वेमा. पट्टा किंवा विश्रामगड. Happy