प्रेमगंध

Submitted by प्रणय. on 20 September, 2017 - 12:57

गोठविणारी हवा मंतरलेली
सांजवेळ आजची बहरलेली
उधळूया का आज प्रणयरंग
पहा मनांत उठती प्रेम तरंग

भिजल्या ओठी चुंबन घेण्याची
वाट बघितली तुझ्या मिलनाची
वाटत आहे छेडावे, होऊनी धुंद
आज उधळावे, उधळूदे प्रेम गंध

तुझ्या श्वासांनी हलकेच फुलावे
माझ्या श्वासांनी अलगद फसावे
आज जडावा, जडू दे प्रणयछंद
घट्ट होतील गतजन्मांचे प्रेमबंध

―प्रणय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!!! Happy
प्रणय पुढील कवितेसाठी शुभेच्छा! Wink

मस्तच कविता Happy
प्रणय पुढील कवितेसाठी शुभेच्छा