कॅच माय ड्रीम

Submitted by अविनाश जोशी on 19 September, 2017 - 02:41

कॅच माय ड्रीम

आजकाल ब्लु व्हेल बद्दल फारच चर्चा होत आहे, ५० दिवस मानसिक दबावाखाली येऊन शेवटी आत्महत्या होते. पण त्याच्याहून अफलातून गेम म्हणजे CatchMyDream .
गेम तसा सोपा आहे. म्हणजे खेळाडूला फारस काहीच करायचं नसत. खेळाची नवीन आवृत्ती येत आहे.
बाजू व्हेलमध्ये खेळाडूचा सहभाग आवश्यक असतो. पण CatchMyDream चे तंत्रन्यान फारच पुढारलेले आहे. जुन्या आवृत्तीमध्ये तुम्ही फक्त एवढेच करायचे;
• CatchMyDream com वेबसाईट वर जायचे.
• गेम खेळण्यासाठी सदस्य होणे आवश्यक आहे.
• तत्पूर्वी तुमचा अंगठा स्कॅन होतो
• लोकेशन पण घेतले जाते
• वेब कैमेरा असल्यास फोटो निघतो ..
• नंतर तुम्हाला तुमच्या ५ मित्रांचा व्हाट्स अपचा आयडी द्यावा लागतो. त्यांच्या नावासहित
• ते जर सगळे बरोबर असले तर महाल तुमचा यूजर नाव घ्यावे लागते
• बऱ्याच सूचनेनंतर तुमचे सदस्यत्व मान्य होते
• आमचे दूत तुमच्या लवकरच सम्पर्कात येतील अशी सूचना येते
• आणि येथे खेळाडूचा सहभाग संपतो
नंतर तो बेपत्ता तरी होतो किंवा अतिशय धक्कादायक रित्या मरतो. अशा बऱ्याच केसेस झाल्या. आजपर्यंत कुठलाही शोध लागला नाही. फक्त सर्व घटनेपूर्वी ह्या खेळाचे सदस्य झाले होते एवढेच उजेडात आले. प्रत्येकाचा मृत्यू वेगळ्या तर्हेने होता .
माझ्याकडे मात्र काही माहिती आहे. गेम व्हर्चुअल रिऍलिटी च्या पलीकडला आहे. आणि तो सदस्यांच्या नावाशी निगडित आहे..
एकाने बाहुबली नाव घेतले
त्या दिवशी तो एका सुंदर मुलीबरोबर दिसला. रात्री त्याच्या खोलीत पाणीच पाणी झाले . तो धबधबा धबधबा असे ओरडत होता आणि सकाळी तो पाठीत तलवार खुपसलेल्या अवस्थेत सापडला
एकीने सीता नाव घेतले
त्या दिवशीच्या पावसातhai उघड्या मॅनहोल मध्ये पडून ती बेपत्ता झाली
एकाने हॅरी पॉटर नाव घेतले
दुसऱ्या दिवशी पहाटे तो काठीवर बसून उडताना काहींनी पहिला तो आज तागायत बेपत्ता आहे
थोडक्यात सदस्य नावाप्रमाणे सगळे वाईट होते. जगभर झालेल्या धुमाकुळानें आता बरेच देश वेबसाईटवर बंदी आणत आहेत आणि त्यामुळेच नवीन आवृत्ती.
मला हे सर्व माहित आहे कारण मीच जनक आहे. अतिशय प्रगत तंत्रन्यान मन चित्तीं ते वैरी न चिंती ह्यावर आधारले आहे
खेलण्यासाठi आता सदस्यत्व नाही
फक्त वेबसाईटचा विचार करा आणि मम म्हणा
तुमच्या मनातले सर्व वाईट विचार प्रत्यक्षात घडतील
तर विसरू नका •CatchMyDream com
आणि म्हणा मम !!!

Group content visibility: 
Use group defaults

भारी कल्पना.
फक्त काही सकारात्मक घडल असत तर अजुन चांगल.