'कासव' ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय + टीझर

Submitted by माध्यम_प्रायोजक on 18 September, 2017 - 08:25

सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटासाठी दिल्या जाणार्‍या सुवर्णकमळासह अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांत पारितोषिक पटकावणारा 'कासव' येत्या ६ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

'कासव'ची पहिली झलक -

सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती डॉ. मोहन आगाशे व विचित्र निर्मिती यांची आहे.

इरावती हर्षे, अलोक राजवाडे, किशोर कदम, संतोष रेडकर, ओंकार घाडी आणि डॉ. मोहन आगाशे

Kaasav_title.gif

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.


***
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सहकुटुंब पाहिला!
अतिशय सुंदर आणि ह्यद्य चित्रपट! भावला!!
'न्युटन' पेक्षा ह्याची निर्मितिमुल्ये अधिक असल्याचे पदोपदी जाणवते व मग प्रश्न पडतो...हाही चित्रपट 'ऑस्करसाठी' का नाही?
रिकाम्या खुर्च्यांचे पहिले जाणवले पण ....
कासवीण किनर्‍याला येउन अंडी घालून चालली जाते....आणि कितिही संकटे आली तरी ह्या कासवांची वंशावळ (अतिभव्य डायनोसोरही जिथे टिकू शकले नाही तिथे) समर्थपणे टिकून राहते...ह्यातच एक वेगळा संदेश मिळाला....!
सर्व परिचितांन्ना बघण्यास सांगितले....

<<<<१२ वाजताच्या शोला अवघे बारा पंधरा प्रेक्षक पाहून अतिशय वाईट वाटलं .>>>>

पिकते तिथे विकत नाही.
न्यू जर्सीत नक्की २ शो ठेवावेच लागतील.
जसे सा़खर खाल्लेला माणूस चे ठेवावे लागले तसे.

मागच्या ३ महिन्यापासून मी आणि माझा भाऊ हा चित्रपट पाहण्यासाठी धडपडतोय. सुनील सुकथनकर आमचे मित्र आहेत . तेव्हा आम्ही त्यांना हा चित्रपटाची एक सीडी देण्यास सांगितले . पण त्यांच्याकडेसुद्धा नाहीये . तेसुद्धा यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही राहतो तिथे थिएटर नाही . तो ऑनलाईन पण नाहीये .

Pages