अमेरिका - दु:खद घटना

Submitted by webmaster on 18 September, 2017 - 00:12

अमेरिकेतल्या दु:खद घटनांबद्दल सांगण्यासाठी.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अमेरिकेतल्या अनेक नाटकांचे सेट करण्यासाठी प्रसिद्ध असणारे आर्किटेक्ट श्री किशोर पाठारे यांचे १६ सप्टेंबर, २०१७ रोजी दु:खद निधन झाले.
मायबोलीबद्दल त्याना विशेष जिव्हाळा होता. २००७ साली बीएमएम अधिवेशनात मायबोलीला गौरव पुरस्कार मिळावा म्हणून पुढाकार घेणार्‍या व्यक्तिंमधे त्यांचा समावेश होता.

१९९७ साली बीएमएम अधिवेशनात , जाणता राजा या मोठ्या नाटकाचा ३ मजली सेट त्यांनी शून्यातून उभा केला होता. हा सेट पाहिल्यावर श्री बाबासाहेब पुरंदरे म्हणाले "मला अमेरिकेतून भारतात काही न्यायचं नाहीये. पण जर काही नेता आलं तर मला किशोर पाठारेंनां न्यायची इच्छा आहे.".

मायबोलीच्या २१ व्या वाढदिवशी मायबोलीवर प्रेम करणारा एक चाहता आणि अमेरिकेतल्या मराठी नाट्यसृष्टितला एक दिग्गज आपण गमावला आहे.
https://www.facebook.com/kishor.pathare.3