पावसाची गम्मत

Submitted by शिवाजी उमाजी on 15 September, 2017 - 08:43

पावसाची गम्मत

आभाळात झाली एकदा गंमत
आठ ते दहा ढग आले धावत

धावतानां एक जण धडपडला
दुसरा त्यावर पटकन ओरडला

छडीच घेऊन आल्या विजबाई
सर्वांनाच लागली पळायची घाई

पळता पळता सारेच ते पडले
काही जण तर मोठ्याने रडले

मला वाटलं यांना कुणी मारलं?
वरतीच का यांना टांगून ठेवलं?

लगेच मग सर्व लागले रडायला
अंगणी लागला पाऊस पडायला

© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t29509/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान!