Submitted by शिवाजी उमाजी on 15 September, 2017 - 08:43
पावसाची गम्मत
आभाळात झाली एकदा गंमत
आठ ते दहा ढग आले धावत
धावतानां एक जण धडपडला
दुसरा त्यावर पटकन ओरडला
छडीच घेऊन आल्या विजबाई
सर्वांनाच लागली पळायची घाई
पळता पळता सारेच ते पडले
काही जण तर मोठ्याने रडले
मला वाटलं यांना कुणी मारलं?
वरतीच का यांना टांगून ठेवलं?
लगेच मग सर्व लागले रडायला
अंगणी लागला पाऊस पडायला
© शिवाजी सांगळे
http://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t29509/new/#new
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान!
छान!
धन्यवाद अनन्त्_यात्रीजी...
धन्यवाद अनन्त्_यात्रीजी...
छान कल्पना आणि काव्य..लहान
छान कल्पना आणि काव्य..लहान मुलांना साजेसे.
आवडलेच
प्रेरणादायी प्रतिसाद... थँक्स
प्रेरणादायी प्रतिसाद... थँक्स