तुझी आठवण

Submitted by सेन्साय on 15 September, 2017 - 05:36

.
तुझ्या जाण्याने
पाऊस ओसरला
ह्या एकाकी मनातला
रुक्षतेचा तो वृक्ष
पुनः बहरला

अलवार आठवणींचे गुलाब
अन् तुझ्या ओठांचे भास
उमलत्या प्रितिचा सहवास
प्रतिक्षेत पुनः शुष्कतेच्या
आसमंत वर्षा हरवलेला

माझ्या कुशीत जागतो
तुझ्या श्वासांचा वणवा
तुझ्या चिंब नजरेच्या
धगधगीने दूर लाटेवर
कुंद दवाचा किनारा

आयुष्य एकाकी अरण्याला
जरी विरहात गेली
अनेक उदास प्रभात
नित्य प्रतिक्षेत जगुनि आळवितो
तुझ्या प्रितिचा नविन आघात

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिसली दिसली...

तुझ्या जाण्याने
पाऊस ओसरला
ह्या एकाकी मनातला
रुक्षतेचा तो वृक्ष
पुनः बहरला >>> सुंदर!!!!!!!!!!!!!! Happy

सुंदर !