Submitted by सेन्साय on 15 September, 2017 - 05:36
.
तुझ्या जाण्याने
पाऊस ओसरला
ह्या एकाकी मनातला
रुक्षतेचा तो वृक्ष
पुनः बहरला
अलवार आठवणींचे गुलाब
अन् तुझ्या ओठांचे भास
उमलत्या प्रितिचा सहवास
प्रतिक्षेत पुनः शुष्कतेच्या
आसमंत वर्षा हरवलेला
माझ्या कुशीत जागतो
तुझ्या श्वासांचा वणवा
तुझ्या चिंब नजरेच्या
धगधगीने दूर लाटेवर
कुंद दवाचा किनारा
आयुष्य एकाकी अरण्याला
जरी विरहात गेली
अनेक उदास प्रभात
नित्य प्रतिक्षेत जगुनि आळवितो
तुझ्या प्रितिचा नविन आघात
― अंबज्ञ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डोळे दिसतायत मला फक्त...
डोळे दिसतायत मला फक्त...
घ्या कवीकल्पना ―
मस्त लिहिलीय...
दिसली दिसली...
दिसली दिसली...
तुझ्या जाण्याने
पाऊस ओसरला
ह्या एकाकी मनातला
रुक्षतेचा तो वृक्ष
पुनः बहरला >>> सुंदर!!!!!!!!!!!!!!
नेहमीप्रमाणे अप्रतिम कविता !
नेहमीप्रमाणे अप्रतिम कविता !
धन्स मेघा ....सबुर सबुर
धन्स मेघा ....सबुर सबुर
धन्स अक्षय आणि राहुल
सुंदर !
सुंदर !
धन्यवाद दत्तात्रय
धन्यवाद दत्तात्रय
छान आहे, खुप सुंदर
छान आहे, खुप सुंदर
व्वा! सुंदर..
व्वा! सुंदर..
THX a lot VB
THX VB
धन्स सायुरी
धन्स सायुरी
अंबज्ञ ग्रेट आहात शब्द आवडले
अंबज्ञ ग्रेट आहात शब्द आवडले कवितेची रचना ही अप्रतिम ___/\___
खूप खूप धन्यवाद पंडितजी
॥ श्रीराम ॥
खूप खूप धन्यवाद पंडितजी