स्टेशन

Submitted by शिवाजी उमाजी on 13 September, 2017 - 14:23

स्टेशन

चमचमत्या लाल दिव्यांनी तर स्टेशनचा सारा नुरच पालटला !!धृ!!

मिनिटा गणिक येणारे प्रवासी न्गस्तीवर पोलिस दादा निघाला,अनाउंस्मेंटच्या द्रूत तालावर उंदीर खेळ रूळांतमधे रंगला!

मोबाईल कधीचा स्मार्ट झालामाणुस मात्र अडाणीच राहीला,हेडफोन घालुन स्व कानांमधेपाय बाकडयावर ठेवुन बसला!

मळकट वस्त्रे, मुखी याचनाभणाणलेलं डोकं, दुर्गंध आला,पेंगुळलेल्या देहा समोर पुन्हाभिकारी हात पसरता झाला!

चेह-यांवर तेव्हा मात्र त्याच्या ओलेत्या रात्रीत घाम फुटला,जाव आगे बढो, म्हणतानाआपोआप हात नाकावर नेला!

परिपाठ कर्मचा-यां हा रोजचा त्याच गाड्या नवा बोलबाला,वाहते कसला भार स्थिरवास्तुपहा विचारून कुणा हमाला!

©शिवाजी सांगळे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults