संघर्ष : सुरुवात.

Submitted by दिपक ०५ on 12 September, 2017 - 12:53

०५ ऑगस्ट
सकाळी : ७ वा.

त्या दिवशी राधा खूप सुंदर दिसत होती तिचा तो निरागस चेहरा अबोला असूनही खूप काही बोलून जात होता. राधा अंघोळ करून केस झटकावत बाहेर आली पहाटेची तीव्र किरणे तिच्या चेऱ्यावर पडताच तिने डोळे बंद केले, तसा आनंद तिच्या समोर जाऊन थांबला.
अचानक समोर आल्याने राधा थोडी दचकली (तशी राधा खूप धाडशी व जिद्दी होती प्रेमळ स्वभाव असल्याने तिने तिच्या ओवातिभोवती असणाऱ्या सर्व लोकांची मने जिंकली होती.
आनंद ही त्यातलाच एक. इंजिनीयरिंग कॉलेज मधली ओळख.. आणि मग प्रेम, दोन वर्षाचं रिलेशनशिप आणि शेवटी लग्न.)
तिने आनंदला मनगटाने बाजूला सारत म्हटलं
‘आनंद काय करताय सकाळ सकाळी इथे? चला व्हा बाजूला मला माझी कामं करुद्या. आणि लवकर आटपा तुमची आंघोळ काल पण उशीर झाला ऑफीसला मेहता साहेब उगीच माझ्यानावाने बोंबलतात’
इतकं बोलून ती गॅलरीतल्या तुळशीला पाणी घालण्यात मग्न झाली आनंद स्थिर होता.. तसाच.. त्याची हसरी नजर जणू राधाच्या सहवासाचा गोडवा अनुभवत होती
राधाने भुवया उंच करून आनंदला टपोऱ्या नजरेनं विचारलं ‘काय बघतोयस?’ आणि आनंदने डोळे मिचकावून उत्तर दिलं ‘काही नाही’ आणि परत त्याच्या ओठावर एक स्मित हास्य पसरलं.

(वेळ : सकाळी १० वा.)
नेहमीप्रमाणे त्यादिवशीही आनंदला ऑफीसला जायला वेळ झाला होता. आनंदने राधाला हाक मारली.
‘अगं लवकर डब्बा आन, उशीर होतोय मला’
‘हो आले..’ तशी राधा स्वयंपाकघरातून हातात डब्बा घेऊन बाहेर आली.
‘हे घ्या, आणि जावा बघू लवकर आता उगाच मेहता साहेब ओरडतील’
‘राधा.. तू उगाच काळजी करतेस.. मेहतांना माहीत आहे तुझ्यासारख्या सुंदर बायकोला सोडून ऑफीसला येणं म्हणजे काय असतं ते’
‘हो का.. पण असं रोज रोज उशिरा जाणं बरं वाटतं नाही ते काही बोलत नाहीत म्हणून आपण तसचं वागायचं का? चला तो डब्बा घ्या आणि उठा बघू’
तसा आनंदने डब्बा उचलला, आणि दाराच्या दिशेने जाऊ लागला राधाही त्याच्या मागे मागे येत होती आणि मधेच तो दाराच्या चौकटीला पाय लावून थांबला.
‘आता काय झालं?’
‘राधा खरंच जाऊ का गं?
‘मग?’
‘आज सुट्टी घेतो ना..’
‘ सुट्टी.. काय डोकं जाग्यावर आहेना आनंद तुमचं, परवाच तर एक सिक लिव्ह घेतलीत तुम्ही. आणि बिचारे मेहता काय..’ राधाचं वाक्य अर्धवट मोडत आनंद मागे फिरला.
‘बरं बरं, मी जातो. पोचल्यावर फोन करेन’
‘हो. आठवणीने फोन करा पोचल्यावर’
आनंदने खाली येऊन आपली काळ्या रंगाची स्कोडा ऑक्टेविया बाहेर काढली राधा किचनच्या खिडकीजवळ उभी होती. आनंदने गाडीच्या काचेतून राधाला बाय केलं व राधा आत निघून गेली.

(वेळ : दुपारी १२ वा)
राधा घरातील कामे संपवून टी.वी. बघत बसली होती तशी तिला आठवण झाली की आनंदचा रोज ठीक ११ वा ऑफिसमधे पोचल्यावर येणारा फोन आज अजूनही आला नव्हता.
राधाने आनंदला फोन लावला.. फोन नॉट रीचेबल येत होता आनंद कोणत्यातरी मीटिंग मधे असेल अशी समजूत काढून तिने आनंदला मेसेज सोडला ‘कॉल मी आफ्टर युअर मीटिंग’.. आणि परत राधा टी.वी. बघण्यात व्यस्थ झाली
१० ते १५ मिनिटे झाली असतील तोच राधाचा फोन वाजू लागला राधाने चरफडून आपला फोन हातात घेतला. फोन एका अनोळखी नंबरवरून आला होता राधाने फोन उचलला
‘हॅलो.’ राधाने हॅलो म्हणताच समोरून एक कर्कश आवाज आला. तशी राधा सावध झाली.
‘हॅलो, मी जयसिंगपूर पुलिस स्टेशनहून सी. इन्स्पेक्टर राने बोलतोय.. आनंद घाटगे यांच्या आपण कोण?’ राधाची मनस्थिती अचानक गंभीर झाली. आनंद विषयी तीच्यामनात अनेक विचार डोकावून जात होते राधाने एक दीर्घ श्वास घेतला ती बोलली.
‘मी त्यांची पत्नी राधा. इन्स्पेक्टर साहेब काय झालंय? आनंद ठीक आहेत ना?’
‘हे बघा मिसिज घाटगे आम्हाला आनंद घाटगे यांची कार सावगावंच्या पुलावर सापडली आहे, तिथल्या मासेमारी करणाऱ्या युवकाने आम्हाला कळवल की नदीमधे त्यांना एक मृत देह सापडलं. त्यांच्या ड्राईविंग लायसन्स वरून त्यांची ओळख करण्यात आली आहे. तरी खात्री साठी तुम्ही एकदा येऊन..’
इन्स्पेकटरचे वाक्य पूर्ण करण्याआधीच फोन कट झाला. राधाच्या डोळ्यात आसवांचा व मनात दुःखाचा समुद्र आता उफानावर आला होता राधाला जणू आपले हातपाय गळून पडले असावेत असं वाटतं होतं भविष्यात येणाऱ्या निराशा व एकटेपणाचा काळोख तिला आताच जाणवू लागला.
इन्स्पेकटरचा फोन आल्यापासून राधाची पापणीला पापणी भिडली नव्हती. ती आरशासमोर उभी होती तिचं सुंदर रूप तिला एका लांचनासारख भासत होतं घामाने मांघेतील सिंदुर आता खाली वरगळू लागला होता डोळ्यातील पाणी खाली पडताना टप टप असा होणार आवाज राधाला सहज ऐकू जात होता..
राधाने आपले डोळे मिटले.. एक दीर्घ श्वास घेतला व ती घराबाहेर पडली..

क्रमशः....

Group content visibility: 
Use group defaults