अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टी शर्ट- दत्तात्रय साळुंके

Submitted by दत्तात्रय साळुंके on 5 September, 2017 - 03:32

अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टी शर्ट - दत्तात्रय साळुंके

फेको फॅबचे सोचालय मंतरलेले आयुर्वेदीक टी शर्ट घ्या व तुमच्या लाडक्याना माणसात आणा .
FekoFab.jpg

नदीच्या काठी ,
झाडाच्या पाठी ,
कार्यालय किंवा घरात ,
शाळा वा विद्यालयात , महाविद्यालयात
अथवा कोणत्याही स्थळात
अडकताहेत प्रियजन फेसबूक ,व्हाट्सॲप , ट्वीटर, ब्लू व्हेल, युटुब किंवा अन्य कुठल्याही सोशल साईटवर , सेवन बाय ट्वेंटिफोर

वाढेल एकांताचा आजार, बेतेल जीवावर

त्याने लागलाय का तुमच्या जीवाला घोर ?

तर फेको फॅबचे सोचालय आयुर्वेदीक टी शर्ट घ्या त्यानां घालायला .
अन तुमचे जीवलग दररोज फक्त एकच तास (एकत्रित) या सर्व संकेतस्थळावर राहण्याची खात्री बाळगा .

फायदे :-

त्यांचा मेंदू तरारेल .

क्षमेल भ्रामक जगाची भूक
माणसात येतील तुमच्या परीचयाचे खूप

नेट किड्यांचा करी नायनाट
फेको फॅबचे सोचालय आयुर्वेदीक टी शर्ट भन्नाट !

नोट – हे उत्पादन आयुर्वेदीक कापसाचे असल्याने साइड इफेक्ट्स नाहीत .
अधिक माहीतीसाठी फेकोफॅब .कॉम वर आजच जा व मागणी नोंदवा .

Group content visibility: 
Use group defaults