अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा-जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर-पवनपरी11

Submitted by आरू on 4 September, 2017 - 06:22

खूशखबर! खूशखबर!! खूशखबर!!!

"जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर"

काय तुम्ही कमी ऊंची मुळे त्रस्त आहात?

कमी ऊंची मुळे तुमचा लहान भाऊही तुमच्यापेक्षा मोठा वाटतो?

तुम्हाला असं वाटतय का कि गुलिवर लिलिपुटवरून येताना तुम्हाला घेऊन आलाय?

काय तुम्हाला असं वाटतं की तुम्ही फक्त मारुती ८०० गाडी साठी बनला आहात?

दीपिका आणि बच्चन यांसारख्या व्यक्तींना तुमच्यासोबत सेल्फी घेताना खाली बसावं लागतं का?

काय तुम्हाला फॅन चालू किंवा बंद करण्यासाठी इतर कोणाची अथवा स्टूलची गरज पडत?

जरा विचार करा तुमच्याकडचा स्टूल मोडलाय आणि घरी तुम्ही एकटे आहात तर तुम्ही उकाड्यात फॅन शिवाय कसे राहणार?

जसे चार्जर शिवाय फोन, करन शिवाय अर्जून आणि विक्रम शिवाय वेताळ नाही तसे स्टूल शिवाय तुम्ही नाही अशी तुमची अवस्था आहे का?

तर तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही.

कारण आम्ही खास तुमच्यासाठी आणली आहे शुद्ध आणि सिद्ध "जिराफ छाप ऊंचीवर्धक पावडर" जी ३१३ वनौषधींपासून बनवली आहे तसेच क्लिनीकली प्रमाणित आहे. या पावडरचे खास वैशिष्ट्य म्हणजे जिराफाचा आवडता झाडपाला ज्याच्या गुणधर्मामुळे जिराफांची ऊंची वाढते.

२५० ग्रॅम पावडरची किंमत फक्त ४४४ रूपये.

ही पावडर २५० ग्रॅम पासून ५ किलो पर्यंतच्या पॅकींग मध्ये उपलब्ध. १० किलोच्या खरेदीवर १ किलो पावडर मोफत!!!

नकली पासून सावधान!

उत्पादन मेडीकल्समध्यये उपलब्ध.

Group content visibility: 
Use group defaults

हायला आमच्या ऊंची वाढवायच्या पावडरीला कॉम्पिटीशन... सगळ्या धाग्यांवर माझ्य जाहीरातीची लिंक टाकायला हवी Proud

छान आहे बाकी Happy

सुरवातीची सर्व प्रश्नार्थक वाक्ये भन्नाट आहेत. लिहिताना फार विचार केलेला जाणवतो. एकूणच पूर्ण जाहिरात मस्तंच आहे.