पाटलाची मुलगी.. भाग ०२ (शेवट).

Submitted by दिपक ०५ on 3 September, 2017 - 06:33

भाग ०१
https://www.maayboli.com/node/63733

भाग ०१ पासून पुढे –

( ठरवल्या प्रमाणे तिघेही ९:०५ ला तिथं हजर झाले.. संकेत मस्त इस्त्री करून फॉर्मल कपड्यात आला होता.. अनाहून पसरलेली शांतता मोडत मयुरी म्हणाली )

मयुरी : आता?
राघव : निघुया?
संकेत : हो.
मयुरी : काय हो?. राघव, काय प्लॅन आहे?
राघव : प्लॅन काहीच नाहीये, जे होईल ते बघून घेऊ.
मयुरी : म्हणजे?
राघव : अग "डर के आगे जीत है"
मयुरी : पण जीत तर या सुकड्याची ना, आपलं काय?
राघव : आपल्या मैत्रीची जीत.
संकेत : नीघुया का?
मयुरी : बघ या सुकड्याला किती घाई आहे जायची!
राघव : ए.. चला बस आली निघुया आता.

( सकाळचे ९:५५ झाले होते. तिघही पाटलाच्या वाड्यावर पोहोचले )

मयुरी : आलो तर खरं. पण आता करायचं काय?
राघव : जे करायला आलोय, तेच करायचं.
मयुरी : कोनी मला सांगेल का? आपण ईथ काय करायला आलोय ते..
राघव : मयुरी, तु चुप्प. संक्या दार वाजव.

( संकेत ने दोन–तीन वेळा दार बडवलं व हाक मारली, पण समोरून काहीच उत्तर येईना. काही वेळानी कडी उघण्याचा आवाज झाला. समोर एक मोठी प्रतिमा निर्माण झाली. प्रतिमेचा आकार वाढत गेला. शेवटी एक पैलवान माणूस बाहेर आला, त्यानं विचारलं )

काय बडवताय सकाळ सकाळी?
( झोपेचे डोळे चोळतच त्याने विचारले. )

राघव : पाटील आहेत का घरी?
पैलवान : हो, पप्पा आहेत घरी. तुम्ही कोण?
राघव : ("पप्पा"... म्हणजे हा राक्षस पाटलाचा मुलगा असावा.) आम्हाला पाटलांनीच बोलावलंय.
पैलवान : बर, चला आत.

( राघव, मयुरी, संकेत आणि तो पैलवान चौघेही आत जाऊ लागले. वाडा आतुन खूप मोठा होता. मुख्य घराच्या कट्ट्यावर एक पन्नाशीच्या आसपासचा माणूस त्याची बंदूक साफ करत बसला होता. त्याच्या मागे एक बाई चहा घेऊन उभी होती. बहुतेक ती त्याची बायको असावी. इतक्यात आमच्या पैलवान ने घोळ घातला.)

पैलवान : पप्पा बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. (असं म्हणून तो पैलवान उड्या मारत कट्ट्यावर जाऊन बसला. पाटलाने नजर वर केली, त्याचा चेहरा पाहून मयुरी राघवच्या मागे झाली. त्याच्या चेहऱ्यावर अनेक घाव होते, डोळे लाल व केस पूर्णपणे पांढरे झाले होते. डोक्यावर गांधिटोपी घातलेला तो माणूस खुपचं भयानक वाटतं होता. पाटलाने पहिला शब्द उद्गारला.)

पाटील : कोण?
राघव : पाटील, आम्ही मुंबईहुन आलोय. तुम्ही आम्हाला बोलावलंय असं आम्हाला संकेत ने सांगितलं. (राघव हळू आवाजात संकेतला खूनवतो " बोल ना संक्या ")
संकेत : हो पाटील, त्या दिवशी मंजु बाबतीत बोलण्यासाठी तुम्ही बोलावलं होतं..
पाटील : ह्म्.. या बसा. दुर्गे मंजुला बोलावं..

( बोलावण्यासाठी ती बाई आत गेली. सगळ्यांची नजर दारावर टिपली होती, थोड्या वेळाने एक मुलगी लंगडी घालत बाहेर येताना दिसली. तिने दोन वेन्या घातल्या होत्या. आपल्या केसांशी खेळत ती पटलांसमोर येऊन थांबली. तिची ती अवस्था पाहून पाटलांनी तिला विचारलं.)

पाटील : काय चाललय मंजु?
मंजु : मी लंगली खेलतिये ना पप्पू.

(तिचे ते बोल ऐकून राघव ने डोक्याला हात लावला. आणि त्याने संकेतला ओढून त्याच्या कानात विचारलं.)

राघव : " लंगली "??
संकेत : अरे ती लंगडी म्हणतीये..
मयुरी : आणि "पप्पू"
संकेत : तिच्या पप्पाला म्हणत असेल प्रेमाने. त्यात इतकं काय?
राघव : साल्या संक्या, ही बोबडी हाय काय?
संकेत : बोबडी नाही रे ती, कधी कधी अटकते बोलताना..
मयुरी : संक्या, त्या अटकण्याला बोबडीच म्हणतात.

( तिघांची एकमेकात होणारी घुसपुस बघून पाटील म्हणातात )

पाटील : काय घुसपूस चाललीये तिकडे?

( तिघही दचकून एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागतात )

राघव : काही नाही काही नाही, आम्ही ते वेगळ्या विषयावर बोलत होतो.
पाटील : ही माझी मुलगी मंजुलिका.
मयुरी : वाह.. छान आहे नाव, आणि थोड भयानक सुद्धा.
पाटील : काय?
मयुरी : म्हणजे थोड वेगळं आहे ओ, आजकालच्या नावांपेक्षा.. पण मस्त आहे मला खूप आवडलं..
पाटील : माझ्या आईच्या नावावर ठेवलंय हीचं.
मयुरी : हो का, छान छान. ( मयुरी संकेत ला खुणवते "ए संक्या तु बोल ना काहीतर")
पाटील : ही दुर्गा, मंजुची आई..
संकेत : नमस्कार काकु.
दुर्गा : हो हो नमस्कार नमस्कार..

( काकूंनी संकेतच्या थोबडावर दोन नमस्कार मारून त्या आत गेल्या )

पाटील : संकेतराव विचाराकी काय विचारायचं असेल तर.
संकेत : नाही नाही तात्या मी काय विचारणार.
पाटील : बर.. तशी आमची मंजु लई गुणाची हाय बर का!
संकेत : हो हो तात्या, दिसतंयच ते तर..
पाटील : मंजु, बाळा इथ ये..
मंजु : काय पप्पू?
पाटील : जरा जावाईबापुंना गाणं म्हणून दाखव.
राघव : नको नको तात्या त्याची काय गरज आहे.

( राघव त्यांना थांबवणार इतक्यात मंजूने गाणं सुरू केलं )

मंजु :
" लग दा गले के फिल,
ये हशी लात हो न हो.
शायद फिल इश जनम मे,
मुलाकात हो न हो
लग दा गले शे शे "

पाटील : वा वा वा.. छान छान.. काय म्हणता संकेतराव? आहे का नाय बिलकुल लता मंगेशकर..
संकेत : हो हो, अप्रतिम आवाज आहे मंजुचा. अजुन सुद्धा कानात तोच आवाज घुमतोय..
पाटील : व्हय?.. मग अजून एक गाणं म्हणाय सांगू का?
मयुरी : नको नको तात्या.. त्याची काय गरज आहे हा संकेत तर रोजच् ऐकेल ना लग्नानंतर..
संकेत : लग्न?
पाटील : बर मग संकेत राव, जरा मुद्द्याच बोलूया का?
संकेत : कुटला मुद्दा?
पाटील : ओ तुमच्या आणि मंजुच्या लग्नाचा.. तुम्हाला पसंद हाय न्हव आमची मंजु?
संकेत : आहे, पण?
पाटील : हाय न्हव?.. मग बास्स, पुढच्या आठड्यातच उरकून टाकू साखरपुडा.
राघव : हो चालेल चालेल तात्या.. काय रे संकेत, चालेल ना?
संकेत : काय बोलू?..
पाटील : म्हंजे?
संकेत : माझ्या घरच्यांना सांगाव लागेल ना.
पाटील : ते कुठ असत्यात?
संकेत : अमेरिका.
पाटील : ओ मग सांगकी, त्यात काय एवढंं? सांगा पाटलाची मुलगी हाय म्हणून, होतील ते तयार. अन् जर न्हाय झाले.. तर मी करेन त्यांना तयार, माझ्या पद्धतीनं..
राघव : नको तात्या, तुम्ही कशाला त्रास घेता. संकेत बोलेल त्यांच्याशी.
पाटील : नको, अत्ता माझ्या समोर फोन लावा. म्हंजे एकदाच सगळं संपवून टाकू..

( संकेतच्या थरथरत्या हातांनी त्याच्या खिशातील मोबाईल काढून त्याच्या बाबांला फोन लावला..
दोन–तीन रिंग नंतर समोरून हॅलो असा आवाज आला, संकेतने फोन स्पीकर वर टाकला )

संकेत : हॅलो बाबा.
बाबा : हॅलो बेटा, कसा आहेस?
संकेत : मी ठीक आहे बाबा.
बाबा : काय झालं संकेत? तुझा आवाज का असा घाबरा घाबरा येतोय.
संकेत : बाबा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचंय.
बाबा : हो बोल ना संकेत, मी ऐकतोय..
संकेत : बाबा माझा साखरपुडा आहे पुढच्या आठवड्यात.
बाबा : अरे वा!!.. बेटा ही तर गुड न्युस आहे,
तुझी आई खूप खुश होईल..
संकेत : हो बाबा..
बाबा : आम्ही येतोय उद्याच्या फ्लाईट ने.. अरे हे तरी सांग की मुलगी कोणाची आहे?
संकेत : " पाटलाची मुलगी "

( नाव ऐकताच बाबा फोन कट करतात. आणि लागेच सागरला म्हणजे संकेतच्या मोठ्या भावाला फोन करतात.)

बाबा : हॅलो सागर, बेटा मी आता जे काही बोलतोय ते नीट ऐक.
सागर : बोला बाबा.
बाबा : संकेत पाटलाच्या मुलीशी लग्न करतोय.
सागर : अहो काय बोलताय बाबा?
बाबा : हो, तो नक्कीच कोणाच्यातरी दबावाखाली येऊन हे सगळं करतोय.. फोन वर बोलताना मला दबक्या अवजात पाटलाचा आवाज ऐकु आला, त्या पाटलाने मागच्याच वर्षी त्याच्या वेड्या मुलीचं लग्न जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न केला.. व त्या मुलीला नकार दिल्यामुळे त्याने त्या मुलाच्या परिवारातील ४ जणांचा खून केलाय, संकेत नक्की अजून पाटलाच्या घरीच असेल. तु आत्ताच पोलिसांना घेऊन पाटलाच्या घरी जा. बेटा तुला तुझ्या भावाला यातून वाचवाव लागेल..
सागर : हो बाबा, मी निघतो आत्ताच..

( सागर पोलिसांना घेऊन वाड्यावर पोहोचतो, पाटलाला तुरुंगात पळून जाण्याच्या गुन्ह्यात व त्याच्या मुलग्याला हाथियार बाळगण्याच्या गुन्ह्यात अटक होते )

त्यावेळी राघव संकेत कडे बघून म्हणतो..
राघव : वाचलास बे सुकड्या..
......................................................................
– दोन वर्षानंतर...
पाटील तुरुंगात असतानाच पाटलाच्या बायकोचा मृत्यू होतो..
पाटलाची तुरुंगातून सुटका होते.. पाटील वाड्याकडे वळतो.. वाड्यावर पोहोचताच त्याची मुलीला भेटण्याची उत्सुकता वाढत जाते, दाराला कडी घातलेली दिसते. ती कडी कडून तो आत जातो.. आत जाताच त्याला एक भयानक दृश्य समोर दिसत. एक स्त्री दाराशी लोमकाळलेली दिसते. पाटील समोर जाऊन बघतो, त्या शवाची अवस्था अत्यंत बिघडलेली असते.. त्या शवाचा चेहरा बघून पाटलाला मोठा धक्का बसतो व तो खाली कोसळतो..

( समाप्त.... )

" पाटलाची मुलगी "

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन लहान भागातच का संपवली?
पाटलाची back story खूपच मोठी झाली असती..
व कथेचे भाग वाढत गेले असते..
प्रतिसाद देण्यासठी धन्यवाद कऊ..