स्वाध्याय बद्दल

Submitted by मेधा on 12 March, 2009 - 12:30

गेल्या वर्षभरात कमीतकमी चार पाच वेळा शनिवारी किंवा रविवारी अनपेक्षित बेल वाजते . दार उघडलं तर चार भारतीय मंडळी उभी . तोंडभर हसून आम्ही स्वाध्यायी आहोत, या भागातल्या भारतीय लोकांशी बोलायला आलोत अशी प्रस्तावना.

दर वेळेस वेगळी पण चार जणं येतात. दोन बुवा, दोन बाया. आपापली नावं सांगतात अन न्यू जर्सीहून आलो म्हणतात. (जर्सी राज्याच्या सगळ्यात जवळच्या भागातनं आमच्या इथे यायला ४०-५० मिनिटं लागतात . )
'आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या भागातल्या भारतीय लोकांकडे जातो. तुमच्या भागात स्वाध्याय चे क्लासेस/ मीटिंग्स' अमक्या ठिकाणी होतात. तिथे मुलांकरता बेबी सीटिंग्ची सोय आहे' वगैरे सांगतात. 'तुम्ही तिथे जावं' असं थेट सांगत नाहीत.
आमचा पत्ता कसा कळला ते सांगत नाहीत. तुमचे फोन नंबर द्या म्हटलं तर देतात.
त्यांना सांगितलं की आम्हाला माहित आहेत क्लासेस कुठे आहेत पण आम्हाला जमणार नाही, आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही तरी नुस्तं हसतात . पण परत चार सहा आठवड्याने दुसरी चार मंडळी हजर.

तुम्हाला कोणाला असा अनुभव आलाय का? माझ्या ओळखीच्या आणखीन दोन जणांकडेही हाच प्रकार चालू आहे. यांची काही डु नॉट कॉल लिस्ट कशी करता येईल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आमचा पंथ काही वाईट नाही, ते पाळणारे लोक जर वाईट असतील तर तो त्यांच्या वैयक्तिक विषय आहे"
अशा स्वरुपाची मल्लिनाथी सगळ्याच धर्मपंथातले, जातीतले (थोडक्यात ग्रुपातले) लोक करत असतात. महेश यांचेही तसेच आहे.
सनातन संस्था, आरेसेस, बजरंगदल पासून क्रिश्चन मुस्लिम जैन इत्यादी सगळ्याच लोकांतही कल्ट आहेत, असतातच, ते सगळे असेच आप्ल्या कृष्ण कृत्यांवर पांघरुण घालत असतात.

फॉलो करण्यासाठी ते गुरू मराठीच असले पाहिजेत अशी पूर्वअट आहे का?
राधे माँ चा विचार सुद्धा करू शकता

सनातन संस्था, आरेसेस, बजरंगदल पासून क्रिश्चन मुस्लिम जैन इत्यादी सगळ्याच लोकांतही कल्ट आहेत, असतातच, ते सगळे असेच आप्ल्या कृष्ण कृत्यांवर पांघरुण घालत असतात.> >>

तीन माणसे एकत्र गोळा झाली की दोन समूह तयार होतात. ही माणसाची जुनी खोड असावी किंवा त्याला असे करण्यात सुरक्षितता वाटत असेल.

प्रीत, व्यक्तिस्वातंत्र व इतर काही तुम्ही लिहिले त्याचा संदर्भ लागला नाही. असो. मी पुस्तक अद्याप वाचले नाही. त्यामुळे तिथे जमिनीच्या संदर्भात काय आलेय माहीत नाही. पण अशी जमीन एकट्याला विकता येत नाही हे माहीत आहे.

फारएन्ड, जमीनवर वारस हक्क असला तरी सातबाऱ्यावर नावे चढवावी लागतात. वडिलांच्या मृत्यूनंतर मागे चार भाउ असतील तर त्या भावांची नावे मालक व त्यांची मुले वारस म्हणून सातबाऱ्यावर येतात. पुढे भावांपैकी कुणाचा मृत्यू झाल्यास त्याच्या मुलांची नावे वारसमधून काढून मालक म्हणून सरकारात जाऊन चढवून घ्यावी लागतात, ती आपोआप मालक म्हणून लागत नाहीत.

साधना, हो प्रोसेस आहेच. पण एक भाऊ ठरवू शकत नाही दुसर्‍या भावाला द्यायची का नाही ते, त्याचा हक्क असतोच अशा अर्थाने लिहीले ते.

>>वडिलोपार्जित "नावावर करण्याचे" मला ही समजले नाही. त्या भावाचा ऑलरेडी हक्क होताच.<<

त्यांनी स्वतःचा मालकि हक्क सोडला, हा अर्थ निघतो त्यातुन. भावंडांनी वडिलोपार्जित इस्टेटीत आपला हक्क सोडुन एकाच भाऊ/बहिणीला दिल्याचे उदाहरणं आहेत डोळ्यासमोर...

भावांनो व साधनाजी मोठा भाऊ एकत्र कुटुंब म्यानेजर म्हणून त्याला जमिनीचा अधिकार असतो आणि आपण हाच एक मुद्दा का लावून धरला आहे? इतरही मी काहीतरी लिहीलेल्यावर पण चर्चा करा. झाले असे की शास्रीजींना कार्यासाठी वित्त गरजेचे होते पण त्यांना कुणाकडून काहीच घ्यायचे नव्हते अनेक धनाढ्य लोक करोडो रूपये घेऊन तिष्ठत असत पण शास्रीजींनी ते धन स्वीकारले नाही. त्यांना वाटलं आपली रोह्याला(नक्की आठवत नाही) जमीन विकून ते धन उभारावे. पण ऐनवेळी त्यांना आठवलं की जमीनीवर आपल्या एकट्याचा हक्क नाही व त्यांनी संपुर्ण जमीन भावाच्या नावावर केली. हे पुस्तक वाचून मलाही खुप वर्ष झालीय व माझे चुकलेही असेल.
नंतर शास्रीजींनी जो स्वतः कार्यात सहभागी होईल त्याचेच धन स्वीकारले जाईल असा नियम केला.
मी स्वतः वारकरी संप्रदाय आसाराम बापु स्वाध्याय ख्रिश्चन चर्च सगळीकडे सहभागी झालो होतो पण पोलिसी स्वभावाचा असल्याने योग्य ते स्वीकारले व वाईट गोष्टींना विरोध केला तेव्हा मला शत्रू निर्माण झाले. तेव्हापासून मी वादविवाद टाळतो. शास्रीजींचे धर्माविषयी विश्लेषण सर्वात जास्त पटणारे आहे इतर धर्मातील विसंगत गोष्टी त्यांनी परखडपणे दाखवुन धर्माभिमानी लोकांचा भ्रमाचा भोपळा फोडला आहे. मी त्यांच्या वर टीका करणे खूप चुकीचं आहे. माझं चुकलं.
एखाद्या माणसाचे अनुयायी स्वतःला त्या माणसाचे तत्वज्ञान कळले नाही तरीही इतरांना आपल्या कळपात घेण्यासाठी आतुर असतात हे मला कधीही आवडत नाही.

शाओलीन देवळाचा एक कल्ट होता. तसे तर तिकडे धार्मिक कार्यच चालत होते. पण चीन सरकारला त्यापासून भीती वाटत होती. बहुतेक कारवाई झाली.
लामांना मानणा-यांवरही चीन सरकार कारवाई करत असते.
या सर्व कल्ट्स मधे जे साधक असतात त्यांना वरकरणी तरी त्यात काही चुकीचे दिसत नाहीत. लामांच्या बाबतीत आपण भारतीय म्हणून त्यांची बाजू आपल्याला योग्य वाटते. तसे ते चिनी नागरिकाला का वाटावे ?
स्वाध्याय परिवाराशी लाखो मध्यमवर्गीय कुटुंबे निगडीत आहेत. त्यांच्यासाठी वेळ चांगल्या प्रकारे जाण्याचे ते एक साधन आहे.
पण स्वाध्यायच्या माध्यमातून गुजरातेत आदिवासींचे हिंदूकरण झाले. २००२ च्या दंगलीत आणि इतर वेळीही आदिवासी आणि भगवेमय दलित यांचा वापर झाला. यावर रिपोर्ताज देखील आहेत.

आमच्या घरी बरेचदा आलेले आहेत. बहुतेकदा वर म्हटल्याप्रमाणे सिनिअर सिटिझन्स. मी व्यवस्थित पाणी वगैरे देवून १० १५मिनिट गप्पा मारल्या. थोड्या वेळाने ते निघून जातात. काहीही त्रास झाला नाही. कल्ट असेल तर असेना का. मला जोवर त्यांचा त्रास होत नाही तोवर काही इशू नाही.
स्काऊट कुकीज सारख वाटत मला हे. नाही म्हणुच शकत नाही.

प्रीत, मला स्वाध्यायबद्दल काही माहिती नाही, ना मी त्यांचे पुस्तक वाचलंय. त्यामुळे इतर मुद्द्यांबद्दल मी काही बोलू शकत नाही. तुम्ही जमिनीबद्दल लिहिलाय, त्या विषयाबद्दल थोडी माहिती होती (स्वाध्यायच्या जमिनीबद्दल नाही तर सर्वसाधारण जमिनीबद्दल जे कायदे आहेत त्याबद्दल) त्यामुळे लिहिले.

तुम्ही आता सविस्तर लिहिले त्यावरून त्यांच्या जमिनीबद्दल कळले. ते वाचून शास्त्रींनी योग्य केले असेच वाटले. त्या जमिनीवर इतर वारसांचाही हक्क होता. फारतर जमिनीच्या वाटण्या करवून घेऊन त्यातला आपला भाग त्यांना विकता आला असता.

एखाद्या माणसाचे अनुयायी स्वतःला त्या माणसाचे तत्वज्ञान कळले नाही तरीही इतरांना आपल्या कळपात घेण्यासाठी आतुर असतात हे मला कधीही आवडत नाही.>>>>

प्रत्येकाचा स्वभाव. काहींना कळपात असल्यावरच बरे वाटते. आपल्या विचारांचे चारचौघे आहेत किंवा चारचौघे करताहेत तोच विचार आपण करतोय असे दिसले की सुरक्षित वाटते.

तुम्हाला आवडत नाही तर सोडून द्या. अन्य काही कारणांमुळे कळपात राहवेसे वाटत असेल तर कळपातील लोकांच्या भावना न दुखावता त्यांच्यातले दोष कसे दाखवता येतील हे शोधा. तोंडावर दोष दाखवलेले कुणालाही आवडत नाही. असे दोष दाखवणाऱ्याला शत्रू निर्माण होतात.

माणूस कळपात राहणारं जनावर आहे, आणि जो कळप मोठा त्याचीच सत्ता चालणार या तत्वावर सगळे बाजार चाललेत! स्वाध्यायची मार्केट स्ट्रॅटेजी आवडली बुवा मला, इतर कळपात लोक न जाण्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या अनुयायांनी कंपूबाहेरील लोकांना केलेली एक्सेसिव्ह जबरदस्ती हे लक्षात आल्याने त्यांनी तो मुद्दा कटाक्षाने वगळला.. मला देखील काही भेटले होते, आणि त्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊन मी देखील त्या कळपात जाणारच होतो, पण माझा दुसरा मोठा गुरू आळस आडवा आला. (पहिला गुरू मीच!)

>> सगळे असेच आप्ल्या कृष्ण कृत्यांवर पांघरुण घालत असतात.
स्वाध्याय परिवाराचे लोक कृष्णाने सांगितलेल्या गीतेचे विचार ऐकतात आणि त्याचा स्व-अध्याय करतात, पांघरूण नाही घालत. Lol
असो, ज्यांना सविस्तर काही माहिती नाहीये आणि तरीही निगेटीव्हच मते बनवायची आहेत त्यांना कोणीच अडवू शकत नाही.

Pages