स्वाध्याय बद्दल

Submitted by मेधा on 12 March, 2009 - 12:30

गेल्या वर्षभरात कमीतकमी चार पाच वेळा शनिवारी किंवा रविवारी अनपेक्षित बेल वाजते . दार उघडलं तर चार भारतीय मंडळी उभी . तोंडभर हसून आम्ही स्वाध्यायी आहोत, या भागातल्या भारतीय लोकांशी बोलायला आलोत अशी प्रस्तावना.

दर वेळेस वेगळी पण चार जणं येतात. दोन बुवा, दोन बाया. आपापली नावं सांगतात अन न्यू जर्सीहून आलो म्हणतात. (जर्सी राज्याच्या सगळ्यात जवळच्या भागातनं आमच्या इथे यायला ४०-५० मिनिटं लागतात . )
'आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या भागातल्या भारतीय लोकांकडे जातो. तुमच्या भागात स्वाध्याय चे क्लासेस/ मीटिंग्स' अमक्या ठिकाणी होतात. तिथे मुलांकरता बेबी सीटिंग्ची सोय आहे' वगैरे सांगतात. 'तुम्ही तिथे जावं' असं थेट सांगत नाहीत.
आमचा पत्ता कसा कळला ते सांगत नाहीत. तुमचे फोन नंबर द्या म्हटलं तर देतात.
त्यांना सांगितलं की आम्हाला माहित आहेत क्लासेस कुठे आहेत पण आम्हाला जमणार नाही, आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही तरी नुस्तं हसतात . पण परत चार सहा आठवड्याने दुसरी चार मंडळी हजर.

तुम्हाला कोणाला असा अनुभव आलाय का? माझ्या ओळखीच्या आणखीन दोन जणांकडेही हाच प्रकार चालू आहे. यांची काही डु नॉट कॉल लिस्ट कशी करता येईल ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शोने,

स्वाध्यायी याला भावफेरी म्हणतात. माणसाने माणसाची आपुलकीने विचारपूस (जेवणाची, चहाची अपेक्षा न ठेवता) करण्याचा तो एक स्वाध्याय चा फॉर्म्युला आहे. सध्याच्या धावपळीच्या जमान्यात माणसाला माणसाची पडलेली नाही, त्या पार्श्वभूमीवर आपला वेळ काढून ते सर्वांकडे जातात याच कौतुक वाट्त पण this is my time, my space अशी आपली पण अमेरिकन mentality झाल्यामुळे त्यांच अचानक टपकण खटकत. काहींना जास्त प्रमाणात. संदीपची तर जाम हटते. मला एवढा त्रास नाही होत.

एकदा मी चक्क सांगितल की हा माझ्या मुलांबरोबरचा वेळ आहे. आपण नंतर भेटूया का? जरा वाईट वाटल पण मी अगदी दमले होते आणी पोरांबरोबर लोळत होते. घरातला पसारा दाखवायची इछा नव्हती हा दुसरा मुद्दा.

शिष्ट मराठी मंडळीकडून reject झालेल्या खूप मराठी कुटंबाना स्वाध्याय मधे आपलस वाट्त. Though svadhyaay is really propogated by Gujarati community.

असो. दादा, म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या कार्याचा आढावा घेणार एक सुरेख पुस्तक आहे. देह चंदनाचा झाला. जरूर वाच. फंडा असा आहे की माणसाला त्याच्यामधल्या देवत्वाची जाणीव करून द्या. Everything else will fall in place. Swadhyay does it very beautifully.

तळटीपः मी स्वाध्याय परिवाराची सदस्य नाही. असो.

कल्पू

हे एक प्रकारचं अनावश्यक सॉलिसिटिंग झालं! 'आमचा चर्च जॉइन करा' किंवा 'आमच्या स्वाध्याय मधे सहभागी व्हा' ह्यात मला काही फरक वाटत नाही. अश्या प्रकारे केलेल्या सोशल नेटवर्कींगची 'गरज नाही' म्हंटल्यावर पुन्हा तेच? लोकांना तुमच्याबद्दल माहिती कळावायची आहे का? तुम्ही वर्तमान पत्रात जाहीरात द्या, देवळात फ्लायर्स लावा, पोस्टाने पाठवा. ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक संपर्क साधतील. पण ठराविक लोकांचे पत्ते शोधून अगदी 'चांगल्या हेतूनं चालणार्‍या संस्थेचा' असला तरी असला प्रकार मला व्यक्तीशः नकोसा वाटतो. ह्यात तुटक मेंटॅलिटीचा प्रश्ण नाही, तर आपले विचार, कार्य किंवा इतर काही गोष्टी बळजबरीनं दुसर्‍याच्या गळी उतरवण्याच्या ह्या वृत्तीचा राग येतो.

मृ, तुला १०० मोदक!
मला बर्‍यापैकी असा प्रकार एका वेगळ्या संस्थेचा आला,पण आमच्या ओळखीच्या वेगवेगळ्या लोकांकडून.
घरी आले किंवा कधिही फोन करून ही मंडळी फक्त आणी फक्त त्या संस्थेची, आणी त्यांच्या गुरुजींची जाहिरात.
बर, समोरची व्यक्ती त्या गप्पा ऐकायला किंवा ते संस्थेचे जे काही खर्चिक कोर्स करायला उत्सुक नाही हे समजून पण तेच रेकॉर्ड दर वेळी चालू Sad

शोनू, स्सेम टू स्सेम अनुभव मला बर्‍याचदा आलाय! सुरुवातीला एक दोन वेळा भीडेखातर आत बोलावून चहा पाणी पण दिलं. पण नंतर नंतर या प्रकाराची अडचण वाटायला लागली. एक मात्र खरं की हे लोक कसलीही अपेक्षा ठेवत नाहीत, काहीही मागत नाहीत, आम्हाला जॉइन व्हा असंही म्हणत नाहीत. एकदाच स्वाध्याय परिवाराबद्दल माहिती सांगितली. बाकी नंंतरच्या भेटींमधे नुस्तीच, विचारपूस , समाज, संस्कृती इ बद्दल गप्पा वगैरे! एखाद वेळी आले तर ठीक पण दर महिन्या दोन महिन्यातून एकदा त्यांनी बळेच अचानक येऊन वीकेन्डचा वेळ घेणे मला पसंत नाही Sad

<<लोकांना तुमच्याबद्दल माहिती कळावायची आहे का? तुम्ही वर्तमान पत्रात जाहीरात द्या, देवळात फ्लायर्स लावा, पोस्टाने पाठवा. ज्यांना इंटरेस्ट आहे ते लोक संपर्क साधतील.>>

स्वाध्याय चा जो फंडा आहे, डायरेक्ट माणूस ते माणूस मार्केटिंग, त्यात हे बसत नाही ना. माझा अनुभव आहे की फारसा रस दाखवला नाही की ते घरी येण बंद करतात. मात्र लोक वाईट नाहीत. मृदुभाषी, प्रेमळ आणि मदतीला धावून येणारी असतात. Aggresive churchee लोकांशी त्यांची तुलना नाही होत पण एक खर ...both are looking for market expansion.

कदाचित हिंदू धर्माचा, संस्कृतीचा प्रचार(?) करत असल्याने स्वाध्यायी माझ्या एवढे डोक्यात जात नाहीत. धर्मांतर करणार्‍या चर्ची लोकांशी मी जबरा वाद घालते.

कल्पू

लालू, अग स्वाध्याय बद्दल नव्हे तर वर मृ जे चर्चबद्दल म्हणालीय त्या संदर्भात तुझ्या रंगीबेरंगीबद्दल लिहिलं मी.

मी इतके दमून आलेल्या मंडळींना घटकाभर बसायला सांगेन, मस्तपैकी बीयर ऑफर करेन आणी स्वाध्याय ट्रस्ट च्या कोट्यावधी रुपयांसाठी पांडुरंगशास्त्रींची मानसकन्या आणी इतर भक्त यांच्यात कशी कोर्टबाजी झाली ती चुरचुरीत हकीकत सांगेन.

पांडुरंगशास्त्रींची मानसकन्या कोण?
ती दीदी आहे (नाव विसरले) ती त्यांची खरीखुरी मुलगी आहे. पण खरच त्यांच्यात कोर्टबाजी इ. झाली? अरेरे, तसे असेल तर जे तत्वज्ञान स्व. पांडुरंगशास्त्री आयुष्यभर जगले त्याचा तो प्रचंड पराभव मानावा लागेल. Sad

>>ती दीदी आहे (नाव विसरले) ती त्यांची खरीखुरी मुलगी आहे.
नाही. ती दत्तक घेतलेली आहे.
>>तसे असेल तर जे तत्वज्ञान स्व. पांडुरंगशास्त्री आयुष्यभर जगले त्याचा तो प्रचंड पराभव मानावा लागेल
काहीतरीच ! इतके श्रेष्ठ तत्वज्ञान सांगणार्‍या शास्त्रींना आपल्या ट्रस्ट च्या वारसदार म्हणून मुलगी आणी जावई यांना नेमण्याचा मोह सुटला नाही ?

कुलकर्णी, तुम्ही 'देह झाला चंदनाचा' वाचले आहे का? नसेल तर कुठलीही बेजबाबदार विधाने करण्याआधी तेव्हढं वाचा प्लीज.

मी असं ऐकलंय की पांडुरंगशास्त्री आठवले यांनी जितका स्वाध्याय फुलवला, चांगली कामं केली तितकच नंतर त्यांच्या अनुयायांनी (का शिष्यांनी, काय म्हणायचे कळत नाही.. ) त्यांनी तो बिघडवला.. मानसकन्येबद्दलही ऐकले होते..
एखाद्या चांगल्या कामाची ,कार्याची, माणसाची त्याचे अनुयायी कसे वाट लावतात ते खूपदा ऐकल्यामुळे असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही..

तरीही पांडुरंगशास्त्रींनी खूप चांगले काम केलेय यात शंकाच नाही.. मी शाळेत असताना देह झाला चंदनाचा वाचले होते.. आणि ते खूप प्रभाव टाकणारे आहे यात वादच नाही..

'देह चंदनाचा' झाला हे जरी खरं असलं तरी शेवटी ते पण एक माणुसच होते.. मी स्वत त्या माणसाला माझ्या लहानपणापासून जवळुन पाहिलय.. माझे काका तत्वज्ञान विद्यापिठात अनेक वर्षं धर्मशास्स्त्र शिकवत होते.. ते स्वत 'तर्कतीर्थ' होते.. पांडुरंग शास्त्रींच्या राज्यात घडणार्‍या अनेक घटना ऐकल्या आहेत.. indirectly अनुभवल्या आहेत विजयच्या मताशी मी बरिच सहमत आहे..

एकुण हे स्वाध्यायी प्रचार फारच जोरात सुरु आहे असं दिसतय. अगदि परवाच phoenix ला मैत्रिणीच्या घरी सकाळी सकाळी हे लोक आले होते.. आणि तिने आधिच्या रविवारच्या अनुभवावरून दरवाजा उघड्लाच नाही.. शेवटी ते लोक निघून गेले..

>>मी स्वत त्या माणसाला माझ्या लहानपणापासून जवळुन पाहिलय..
खरं की काय?
तू म्हणतेस ते खरं असेलही. माझी माहिती पूर्णपणे ऐकीव आहे. बहुतांशी पुस्तक वाचूनच. ते वाचून मात्र अतिशय भारावून गेले होते. असो. किमान त्यांनी अनेक विधायक कामे तरी केली आहेत. प्रत्यक्ष कार्यावर आणि बदल घडवण्यावर भर दिला आहे. नाहीतर नुसती बुवाबाजी करणार असतातच की.

माझ्या एका मैत्रिणीचे वडील दादांचे खूप जुने अनुयायी होते. खूप साधे आणि हाडाचे कार्यकर्ते आहेत. वागणूक आणि विचारांनी He is Swadhyay personified! मात्र स्वाध्यायच नेतृत्व बदलल्यावर चक्क बाजूला झाले. कोणावर ही व्यक्तिगत टीका न करता ते भारतीयांच्या रक्तात भिनलेल्या घराणेशाही बद्दल बोलतात. कुठल्याही अध्यात्मिक चळवळीचा गुरू संन्यासी असावा अस त्यांच ठाम मत झाल आहे. मात्र दादा, दिदी, स्वाध्याय, स्वाध्यायी यांच्याबद्दल एक चकार वाईट शब्द उच्चारत नाहीत.

दादांच सामाजिक योगदान भक्कम आहे यात वाद नाही. गुजरातच्या किनारपट्टीवर असलेली महादेव कोळ्यांची गावच्या गाव स्वाध्याय चळवळीमुळे दारुमुक्त झाली आहेत. भारतात विशेषतः गुजरातेत तळागाळातला समाज स्वाध्यायी आहे. ईशान्य भारतात स्वाध्याय रुजला असता तर चित्र वेगळ असत. असो.

ही शोनू कुठे गेली....काडी टाकून?

कल्पू

दारुमुक्तीबाबत सहमत कल्पू.
शिष्ट मराठी मंडळीकडून reject झालेल्या खूप मराठी कुटंबाना स्वाध्याय मधे आपलस वाट्त>>> अगदी. अगदी परफेक्ट कल्पू.
माणसं शेवटी स्वतःची बेटं/ किंवा स्वतःच व्यसन शोधणार याबद्दल माझी खात्री होत चालली आहे. स्वाध्याय काय किंवा अ‍ॅमवे काय. कोण्या एका भावनिक क्षणी माणसं अशा उपक्रमांमध्ये खेचली जातात वगैरे ठीकच. ती बाहेर पडतात का आणि पडल्यावर आयुष्यात काय करतात हा एक संशोधनाचा विषय आहे.
आणि कुठल्याच सो कॉल्ड प्रलोभनांना कधीही बळी न पडणारी माणसंही तीच चुक (सगळ्याच कल्ट ना बळी पडणा-या माणसांइतकीच) करत नाही का? नाण्याची निव्वळ दुसरी बाजू. आपलं तथाकथीत व्यवहारचातुर्य प्राणपणानी जपता जपता ती किती भयानक तुटक आणि शुष्क होऊन जातात, आणि समाज आपल्याला समजून घेत नाही ही त्यांची प्राणांतिक लाडकी खात्री असते.
आपणच ओढवून घेतलेला एकटेपणा साहवत नाही, मग सारखी ओरड करायची, जग जाळायला निघायच नाहीतर सदोदित जगाची ओझी लादल्यासारखा चेहरा करुन वाकड्या तोंडानी वावरायचे.
संशोधक वॄत्तीचे व्रतस्थ मस्त फकीर आणि त्यांत खरोखरी आनंद मिळणारे फारच थोडे.
बाकी सगळे तळ्यात मळ्यात.

तटी- माझा स्वाध्याय किंवा तत्सम कुठल्याही आणि कसल्याही प्रकारावर विश्वास नाही.

विकु आणि सुप्रिया- सहमत.

>>कुठल्याही अध्यात्मिक चळवळीचा गुरू संन्यासी असावा अस त्यांच ठाम मत झाल आहे.
हे तितकेसे खरे नाही. संन्यासी गुरु असलेल्या चळवळी/संघटना नंतर वहावत गेल्या अशीही बरीच उदाहरणे आहेत.
संन्यासी असो वा संसारी, एखाद्या संघटनेत विचारापेक्षा व्यक्ती मोठी झाली की असेच होते.

>>संन्यासी असो वा संसारी, एखाद्या संघटनेत विचारापेक्षा व्यक्ती मोठी झाली की असेच होते.
हं...भारतिय समाजाला विभूतीपूजेचा फार मोठा शाप आहे. बावनकशी सोन्यासारखं लखलखीत तत्वज्ञान सोडून द्यायचे आणि त्याचे उत्तरदायित्व कुणाकडे यावरून भांडत बसायचे. समजण्याच्या पलीकडे आहे हे! Sad

अगदि परवाच phoenix ला मैत्रिणीच्या घरी सकाळी सकाळी हे लोक आले होते.. आणि तिने आधिच्या रविवारच्या अनुभवावरून दरवाजा उघड्लाच नाही..
----------------------------------------------
हे जरा अति झाले असे वाटते. जेहोवाज विटनेस ना पण तुमची मैत्रीण अशीच वागणुक देते का?

मला बर्‍याच वेळा अ‍ॅमवे आणि इतर काही मार्केटिंग वाल्यानी गळ्यात पडायचा प्रयत्न केला होता. त्याना मी स्पष्ट शब्दात सांगितले की "मला हे सेल वगैरे करणे जमत नाही आणि माझा विचारही कधी बदलणार नाही त्यामुळे कृपया माझ्याशी यापुढे संपर्क करु नका". त्यानंतर कोणी माझ्या फंदात पडले नाही.

मी स्वाध्यायचा सदस्य नाही, किंवा त्याबद्दल मला विशेष माहितीही नाही. पण कधीतरी वीकेंडला समजा दारात चार (सभ्य) माणसे आली आणि त्यानी एक १०/१५ मिनिटे वेळ घेतला तर इतका आपला संपुर्ण वीकेंड स्पॉइल होतो? इतके आपण अमेरिकन झालो आहोत का?
अतिथी देवो भवः वगैरे अमेरिकेत लागु नाही बहुतेक..

मनस्मि - वीकेंड बिघडला वगैरे मी म्हटलं नाही. मी कोणाच्या दारात ' तुम्ही सिद्धीविनायकाला जा' असे सांगायला जात नाही. माझ्या दारात असे कोणी येऊ नये. अतिथी कधीही आलेच तर त्यांचं स्वागत आहे.
एकदा आले तेही ठीक. पण तरिही आम्ही स्वाध्यायला जात नाही म्हटल्यावर सोडून द्या ना आम्हाला आमच्या नशिबार. एवढीच अपेक्षा आहे.

>>दारात चार (सभ्य) माणसे आली
हे कसं ठरवायचं? कारण तान्हं पोर काखोटीला मारून दारात आलेली बाई घर लुटून जाण्याच्या घटना पण घडतात!! Sad

पण तरिही आम्ही स्वाध्यायला जात नाही म्हटल्यावर सोडून द्या ना आम्हाला आमच्या नशिबार. एवढीच अपेक्षा आहे. >> प्रचंड अनुमोदन...

पण तरिही आम्ही स्वाध्यायला जात नाही म्हटल्यावर सोडून द्या ना आम्हाला आमच्या नशिबार. एवढीच अपेक्षा आहे.
------------------------------------------------------------------------------
मला वाटते हा मेसेज लाउड आणि क्लीयर ज्याना पोहोचायला हवा त्याना पोहोचत नाही.
एकदा रोखठोक आणि स्पष्ट शब्दात सांगुन टाकल्यावर परत दारात येण्याएवढे कोणी कोडगे नसावेत (बहुतेक). माझ्या स्पष्ट आणि थोड्याशा कठोर शब्दाने अ‍ॅमवेची पीडा येत नाही.

बावनकशी सोन्यासारखं लखलखीत तत्वज्ञान सोडून द्यायचे आणि त्याचे उत्तरदायित्व कुणाकडे यावरून भांडत बसायचे >>> अगदि खरं!!!

>>माझ्या स्पष्ट आणि थोड्याशा कठोर शब्दाने अ‍ॅमवेची पीडा येत नाही.
हो, पण बरेच लोक भिडस्त असतात. त्यांना कठोर बोलता येत नाही. ई मेल , नेट, फ्लायर्स, फोन असे अनेक मार्ग उपलब्ध असताना आगंतुक पणे घरी येणे, तेही पुन्हा पुन्हा?

Pages