अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक 'आज Cup-a-day उद्या कपडे'

Submitted by मामी on 1 September, 2017 - 13:58

आधुनिक आयुर्वेद रसशाळा, पुणे तर्फे सिध्द केलेला अभिनव आणि हमखास परिणामकारक आरोग्यदायी प्रयोग

आयुर्वेदाचार्या आनंदी सदाफुले यांच्या अथक परिश्रमानं तयार झालेले आयुर्वेदीक फॉर्म्युला- कप्स - ' आज Cup-a-day उद्या कपडे' - आता सर्वत्र उपलब्ध !!!

'आज Cup-a-day उद्या कपडे' ची वैशिष्ट्ये

आमचे हे कप्स ज्यूट आणि काही खास जडीबुटींपासून बनवले आहेत. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे की सकाळी उठल्या उठल्या या कपामध्ये पाणी घालून ठेवायचं आणि दिवसाभरात घोट घोट पीत रहायचं. यामुळे तुमची सगळी थकावट दूर करून, तुम्हाला सतत उत्साही वाटेल. तुमच्या कामात एकाग्रता वाढेल आणि तुम्ही ताजेतवाने रहाल. दर आठवड्याला फक्त एक दिवस हा काढा प्राशन केल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाईल.

इतकंच नाही, तर दुसर्‍या दिवशी हा कप उलगडून त्याचा हातरूमाल तयार करून त्यानं चेहरा पुसा आणि बघा तुमच्या त्वचेत किती फरक पडतो ते! आतून उत्साही अन तजेलदार चेहर्‍याचे मालक मालकीण व्हा आणि आजच आमचे कप्स मागवून घ्या.

हे हातरुमाल इको-फ्रेंडली देखिल आहेत बरं का. रुमाल वापरून झाल्यावर झाडाच्या मुळाशी मातीत घाला आणि तुमची बागही तजेलदार बनवा. ताजी टवटवीत फुलं आणि भाज्या मिळवा.

तर, जीवनात आनंदी आणि उत्साही रहाण्यासाठी आजच मागवा 'आज Cup-a-day उद्या कपडे'. आपलं जीवन आंतर्बाह्य बदलून टाका आणि आपला परिसर हिरवाईनं नटवा.

अनेक रंगात उपलब्ध!

#आजCup-a-dayउद्याकपडे #ताजीमुलेताजीफुले #AyurvedaRocks #चेहरापुसाआणिहसा #आयुर्वेदिकपेलेआणिआजारपणगेले
#थांबवातुमचीपकपककाढाप्याकपकप #कपसेकपडेतक #कपआलाकंटाळागेला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Lol
आधी ते पाणी प्यायलं की दुसऱ्यादिवशी साप कात टाकतो तसं एक कपड्याचं आवरण अंगावर होतंय का वाटलेलं. Lol

सही आहे.. Proud
हॅशटॅग्ज्स पण भारी !

कसलं सॉलिड
मला पण अमितव सारखंच वाटलं होतं Happy
ते रेलीस्प्रे वापरून बँडेज चा थर तयार होतो तसं कपा अ डे कप वापरून झाल्यावर अंगावर क्रीम सारखा चोळला की सकाळी कपडे तयार होणार
(आता ते तयार होईपर्यंत प्रायव्हसी मधये राहावं लागेल इतकंच काय ते.)