वदनी कवळ...

Submitted by अविनाश जोशी on 31 August, 2017 - 07:40

मला प्रवास करायला फार आवडतो आणि तो सुद्धा रेल्वेने .
रेल्वे कशी ढकलगाडी नको दर दोन तासानी स्टेशन येणारी पाहिजे.
प्रवासात मला गडबड, गोंधळ अजिबात आवडत नाही. त्यामुळे मी नेहमीच प्रवास फर्स्ट क्लास कुपेने करतो
किंवा फारच झाला तर फर्स्ट क्लास कम्पार्टमेन्ट मधून करतो.
खिडकीशी बसून रात्रीचा अंधार, लांबवर लुकलुकणारे दिवे हे बघत बसायला मला फार फार आवडत.
बरोबर एखादा सहप्रवासी असावा पण गोंधळ घालणारे नसावेत.
त्या दिवशी असेच झाले.
रात्री नऊ वाजता गाडी थांबली तेव्हा डब्यात मी एकटाच होतो.
पुढचे स्टेशन रात्री एक ला येणार होते.
गाडी सुटण्याच्या वेळेला एक गुजराती गृहस्थ धापा टाकत आत आला आणि माझ्या समोरच बसला.
छान गोल मटोल होता. गुजराथी लोकांचं एक बर असत खायला प्यायला भरपूर मिळत . त्याची धाप कमी लागल्यावर एकमेकांची ओळख करून घेतली आणि अप्पा सुरु झाल्या. आता तीन चार तास तरी कुणी येण्याची शक्यता नव्हती. गप्पा मारताना त्याचा व्यवसाय माझा व्यवसाय अशा विषयांवरून गप्पांची गाडी भलत्याच विषयाकडे वळली. त्याच नाव हिरालाल होत.
;काय संजयजी, तुम्ही या गाडीने बऱ्याच वेळेला प्रवास करता का ?. 'हिरा'
'हो असं होत खरं, मला जरुरी असेल तेव्हा मी याच गाडीने जातो 'मी'
मग तुम्हाला कधी भूत भेटली कि नाही 'हिरा'
त्यांनी भलताच विषय काढल्यावर मी गप्पच बसलो. पण त्यांनी विषय सोडला नाही'
'मला असे कळले आहे कि या गाडीने भूतपण प्रवास करतात आणि मध्येच एखाद्या प्रवाशाला संपवतात. दुसऱ्या दिवशी त्याच रक्त शोषलेलं प्रेत सापडत म्हणे 'हिरा'
' मी गप्पच होतो. पण तो विषय काही केल्याने सोडायला तयार नव्हता. थोड्यावेळाने तो कंटाळला आणि झोपायला अंथरुणावर पसरला. त्याने माझ्याकडे पहिले मी काहीतरी पुटपुटत होतो
'वा!! संजयजी, भीती वाटायला लागली वाटत. करा करा देवाचा जप करा असं म्हणून तो झोपी गेला.
त्याला काय माहिती कि मी
''वदनी कवळ घेता' म्हणतोय ते.
[नादभय ह्या आगामी संग्रहातून]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Uh! Oh!! छोटीशी कथा!
अजून वाढवता आली असती...

मस्त...
अहो, स्नेहनिल जेवायच्या आधी आप्ण काय म्हणतो??

मस्त आहे कथा!!
अजून वाढवता आली असती... >> +१

भारीये.

अजून वाढवता आली असती... >> मला उलट वाटते. थोडक्यातच मजा आहे.