शब्दाली - ज्युनिअर मास्टरशेफ - पुरणपोळी - रेवती - वय ६.५ वर्षे

Submitted by शब्दाली on 30 August, 2017 - 08:18

रेवतीची गेल्या वर्षीच्या गणपतीपासुनच वेगवेगळ्या आकाराचे उकडीचे मोदक करायाला सुरुवात झाली होती. यावर्षी बाप्पाला चिरणे वापरुन केलेले स्टार फिश, सर्कल, आयत असे नवीन आकारातले मोदक खायला मिळाले.

आज तर सकाळपासुन "मी तुला मदत करणार" असा घोशा सुरु होता, इतके कि आन्घोळ झाल्याशिवाय मदतीला घेणार नाही सांगितल्यावर रोजची अर्ध्या तासाची आंघोळ आज १० मिनिटात आवरली. Happy

तोपर्यंत कणिक सारखी करुन पुरण वाटाण्यापर्यंत गाडी आली होती, मग आईच्या हाताला थोडा हात लावला Wink पोळ्या करायला सुरुवात केल्यापासुन मी उंडा करते, मी पोळी लाटते सुरु होते. शेवटची पोळी तिला करायला द्यायची - या प्रॉमिसवर मांडवली झाली आणि त्यातुन हे झाले -

revatee pupo1.jpg

कशी झाली आहे मी केलेली पुरणपोळी ?

revatee pupo2.jpg

टीप - यात पुरणयन्त्रातुन पुरण वाटणे आणि प्रत्यक्ष पोळी लाटणे हे रेवतीने केले आहे, बाकी उंडा भरुन देणे आणि पोळी भाजणे हे मी केले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच की रेवती!! ही पोळी नक्कीच इतर पोळ्यांपेक्षा जास्त गोड झाली असणार, अगदी तुझ्यासारखी!!

सगळ्यांना कौतुकाबद्द्ल धन्यवाद !

नक्की बाबांनी खाल्ली असणार. लाडक्या लेकीच्या हातच्या पोळ्यांचे पैले गिर्‍हाईक, अन कौतुककर्ते बाबाच असतात. हो ना? भरपूर शाबासकी मिळाली असणारे. >>> सगळ्यांनी पोळी शेअर करायची असे लेकीने आधीच सांगुन ठेवल्यामुळे बाबाच्या वाटणीला फक्त एक घासच आला Happy

मस्तच की रेवती!! ही पोळी नक्कीच इतर पोळ्यांपेक्षा जास्त गोड झाली असणार, अगदी तुझ्यासारखी!!>>+१

Pages